Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » शैक्षणिक गुणवत्तावाढीचे जिल्हा परिषदेचे मिशन !! | ZP Nashik Bharti 2026
Last Updated:

शैक्षणिक गुणवत्तावाढीचे जिल्हा परिषदेचे मिशन !! | ZP Nashik Bharti 2026

ZP Nashik Bharti 2026

नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची देण्याच्या दिशेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘जिल्हास्तरीय कामगिरी श्रेणी निर्देशांक’ (PGI-D) मध्ये नाशिक जिल्ह्याला पहिल्या पाच क्रमांकांत स्थान मिळवून देण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे.

नाशिक जिल्ह्याला शैक्षणिक गुणवत्तेच्या आघाडीवर नेण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली असून, ‘पीजीआय-डी’ क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविण्याच्या उद्दिष्टाने विशेष नियोजनाला सुरुवात झाली आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मध्यवर्ती सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

‘पीजीआय-डी’साठी ‘यू-डायस व वेबपोर्टल’, ‘परख’ आणि ‘प्रबंध’ यांसारख्या अधिकृत माहिती स्रोतांचा वापर केला जातो. सहा कार्यक्षेत्रे आणि ७० घटकांच्या आधारे एकूण ६०० गुणांमध्ये जिल्ह्याचे मूल्यांकन करण्यात येते. सन २०२५-२६च्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्याला ३६५ गुणांसह १२वा क्रमांक मिळाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या वर्षी नाशिक जिल्हा ३५५ गुणांसह नवव्या क्रमांकावर होता.

Advertisement

तालुक्यांचा घेणार आढावा

पीजीआय-डीच्या क्रमवारीत झेप घेण्यासाठी नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आता कमी गुणांच्या, पण सहज साध्य करता येणाऱ्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला आहे. कार्यशाळेत या घटकांमध्ये तातडीने सुधारणा घडवून आणण्यासाठी सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला. यामध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षण नोंदणी, शिक्षक प्रशिक्षण, केंद्रप्रमुखांच्या शाळाभेटी, संगणकीय शिक्षण, विद्यार्थी उपस्थिती, पोषण आहार आणि शाळेतील सुरक्षा यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.


ZP Nashik Bharti 2026 : ZP Nashik invites Applications from eligible candidates for the respective department for the vacant posts of “Lawyer” . There are various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their application to the given address before the last date. The last date of application is 08th of July 2026. For more details about ZP Nashik Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .

ZP नाशिक अंतर्गत “वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ZP नाशिक भरती 2026 करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

ZP नाशिक भरती 2026

  • पदाचे नाव वकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या नावाने नवीन प्रशासकीय इमारत, एबीबी सर्कल, पारिजात नगर, नाशिक – 422005
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

How To Apply For ZP Nashik Recruitment 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 जुलै 2026 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/C1Y2M
👉अर्जाचा नमुना
https://shorturl.at/CnfW3
✅ अधिकृत वेबसाईट zpnashik.maharashtra.gov.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदाचे नाव काय आहे?

वकील

अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या नावाने नवीन प्रशासकीय इमारत, एबीबी सर्कल, पारिजात नगर, नाशिक – 422005

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती काय आहे?

ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

08 जुलै 2026