जिल्हा परिषद मध्ये साडेअकरा हजार पदे रिक्त, नवीन पदभरती जाहिरात..!! – ZP Bharti 2026
Jilha Parishad Bharti New Update
आपल्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदे विभागात रिक्त पदाच्या आणि मनुष्यबळा अभावी नागरिकांना सेवा, सुविधेच्या अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा परिषदेतंर्गत या दहा विभागात मिळून ११ हजार ८०९ पद मंजूर आहेत. सद्यास्थितीत ९ हजार ६७७ जागा 3 भरलेले असून २ हजार १३२ पदे रिक्त अल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात वर्ग ३ ची १ हजार ८८१ तर वर्ग ४ ची २५१ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाची ७१२ पदे रिक्त गावांमध्ये आरोग्य सेवा तात्काळ पोहचण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या विविध विभागातून कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर तितक्या जागा लागलीच भरल्या जात नाही. यामुळे रिक्त जागांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. १५२५ मंजूर पदांपैकी ४० टक्के म्हणजे ७१२ पदे रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कमी मनुष्यबळावर आरोग्य सेवा सुरू आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ सहाय्यक, लिपिकां आणि अन्य महत्वाची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी पदे सन २०२३ पासून रिक्त असून, त्यामुळे कार्यरत लिपिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही पदे तातडीने भरावीत, अशी ठाम मागणी होत आहे .
कृषी विभागात सरळ सेवेची १५ पदे भरली, तर पदोन्नतीची २१ पैकी १४ भरली असून ७ रिक्त आहेत, बांधकाम विभागातही रिक्त पदांची संख्या मोठी आहे. सरळ सेवेची १३० मंजूर पदांपैकी ८९ भरली. ४१ रिक्त अहेत. पदोन्नतीची ६३ पैकी २१ भरली, तर ४२ रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागात सरळ सेवेची ५८ पैकी ३५ पदे भरली, तर २३ रिक्त आहेत. पदोन्नतीची २९ पैकी १७ भरली, तर १२ रिक्त आहेत. महिला व बालकल्याण विभागात सरळ सेवेची ३१ पैकी २९ पदे भरली, तर पदोन्नतीची ३१ पैकी २० पदे भरली. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा. भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सर्वाधिक रिक्त पदे शिक्षण विभागात – शिक्षण विभागात जिल्ह्यात ५१३० पदे मंजूर असून ४८०४ पदे भरली आहेत, तर ३२६ पदे रिक्त आहेत. या विभागात पदोन्नतीची ६५० पदे असून ५५९ भरली आहेत. ९१ रिक्त आहेत.
सरळसेवेच्या ९१०, तर पदोन्नतीच्या २९१ जागा रिक्त – जिल्ह्यात वर्ग ३ व ४ च्या सरळ सेवेच्या एकूण ७२६७ जागा मंजूर असून ६३५७भरल्या. ९१० जागा रिक्त आहेत. पदोन्नतीच्या १२७५ जागा मंजूर असून १००८ भरल्या. अजून २९१ रिक्त आहेत.
वर्ग ४ च्या पदांची अडचण
सध्या शासनाने वर्ग ४ ची पदे भरण्यास मनाई केली आहे. यात सरळ सेवेची ६१८ पैकी ३५२ भरली असून २६६ रिक्त आहेत. यात प्रामुख्याने शिपाई व वाहनचालकांची पदे आहेत. या पदांची भरतीच होत नसल्याने या रिक्त जागा केवळ दाखविण्यापुरत्याच राहिल्या आहेत.
Changes In ZP Bharti Education Criteria
| संवर्गाचे नाव | सुधारणा |
| विस्तार अधिकारी (कृषि |
विस्तार अधिकारी (कृषि) या संवर्गामध्ये ज्यांनी
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केली असेल असे उमेदवार अर्ज करू शकतील असे जाहिरातीत नमूद केले आहे. तथापि आता त्यामध्ये खालील पदवी धारण केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतील. १) बी.एससी (ऑनर्स) उद्यानविद्या २) बी.एससी (ऑनर्स) वनविद्या ३) बी.एससी (ऑनर्स) समाजिक विज्ञान ४) बी. एफ. एससी (मत्स विज्ञान) ५) बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) ६) बी.टेक (अन्न तंत्रज्ञान) ७) बी.टेक (जैव तंत्रज्ञान) ८) बी.एससी (एबीएम) / बी.बी.एम.(कृषि) / बी.बी.ए. (कृषि) / बी.एससी (ऑनर्स) कृषि व्यवसाय व्यवस्थापन |
| तारतंत्री |
तारतंत्री या संवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतील असे जाहिरतीत नमूद केलेले आहे. परंतू ऑनलाईन अर्ज सादर करताना I. T. I. झालेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यास अडचण निर्माण झालेली होती.
तथापि आता त्यामध्ये सुधारणा करणेत आलेली असून महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र धारण केलेल्या उमेदवारांसोबत इतर अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी Other असा पर्याय उपलब्ध करून देणेत आलेला आहे. |
| विस्तार अधिकारी (शिक्षण) |
विस्तार अधिकारी (शिक्षण) या संवर्गामध्ये ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराचा अनुभव हा सदर पदाची शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतरचा ग्राह्य धरला जात होता.
तथापि आता सदर पदाचा ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराचा अनुभव हा सदर पदाची शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीचा असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे. |
|
कनिष्ठ सहाय्यक / (लेखा)
कनिष्ठ सहाय्यक |
कनिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गासाठी मराठी टंकलेखन आवश्यक करण्यात आलेले आहे, असे जाहिरातीत नमूद आहे.
तथापि माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन १९९१ चे जनगणना कर्मचारी, सन १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी, पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी व अनाथ मधून अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांकडे मराठी टंकलेखन नाही, असे उमेदवार देखील अर्ज करू शकतील. |
|
स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाचा ऑनलाईन अर्ज करताना Have you passed recognized equivalent two Years Course in Construction Supervisor ? असा प्रश्न विचारणेत आला होता. परंतू सदरचा कोर्स हा एक वर्षाचा असल्यामुळे त्या पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकत नव्हते.
तथापि त्यामध्ये सुधारणा करणेत आली असून आता Have you passed recognized equivalent Course in Construction Supervisor ? असा प्रश्न विचारणेत येत आहे. त्यामुळे सदर पदासाठी इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतील. |
| कंत्राटी ग्रामसेवक / पशुधन पर्यवेक्षक |
कंत्राटी ग्रामसेवक / पशुधन पर्यवेक्षक या संवर्गामध्ये संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात असे जाहिरातीत नमूद आहे.
आता त्याचबरोबर जे उमेदवार दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतील. किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) मार्फत मान्यताप्राप्त सर्व पदवी व पदवीका (सर्व अभियांत्रिकी शाखा) प्राप्त उमेदवार किंवा इंडियन सटिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन (ICSC) यांच्या मार्फत मान्यताप्राप्त इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतील. वरीलपैकी कोणत्याही एक प्रकारे संगणक व माहिती तंत्रज्ञानाबाबतचे प्रमाणपत्र धारण करीत असतील असे उमेदवार सदर पदासाठी अर्ज करू शकतात. |
Who Can Apply For Maha RDD ZP Bharti
अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) यामध्ये कोण अर्ज करू शकतात.
जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, असे उमेदवार आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. मकसी १००७/ प्र.क्र.३६/का. ३६ दिनांक १० जुलै २००८ अन्वये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) पदांसाठी अर्ज करू शकतात.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) यामध्ये कोण अर्ज करू शकतात.
१. शासन अधिसूचना दि. २९/०८/२०१९ नुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.
२. स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ, जे उमेदवार स्वत: किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे मातापिता किंवा आजी-आजोबा हे दिनांक २६ जानेवारी १९५० पासून आजपर्यंत संबंधित जिल्ह्यांच्या अनुसूचित क्षेत्रांत सलगपणे राहत आले आहेत, असे अनुसूचित जमातीचे उमदेवार, असा आहे.
३. अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांकडे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक (मूळ) रहिवासी असल्याबाबतचा महसूली पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमदेवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांनी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसूली पुराव्याबाबत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रात (पेसा) नियुक्ती दिली जाईल.
४. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची पदे ही स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली नसून परिशिष्ठ – १ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणात एकत्रित दर्शविण्यात अलेली आहेत.
५. महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक आविवि – २०२३/ प्र.क्र.१३२/का-१४, दि. १६/०६/२०२३ अन्वये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचा रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक राहील.
६. ज्या उमेदवारांची पेसा क्षेत्रामध्ये निवड होईल त्या उमेदवारांची बिगर पेसा क्षेत्रामध्ये बदली करता येणार नाही.
७. जाहिरातीमध्ये अनुसूचित क्षेत्रातील भरावयाची पदे ही महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८ / प्र.क्र.४२७/१६-ब, दि. १० मे, २०२३ नुसार दर्शविणेत आलेली आहेत.
Important Dates For ZP Recruitment 2026 |
|
| Event | Dates |
| ZP Recruitment Notification | NA |
| Starting Date to Apply Online for ZP Recruitment | — |
| Last Date to Apply Online for ZP Recruitment | — |
| ZP Recruitment Admit Card | — |
| ZP Recruitment Exam Date | Updated Soon |
| ZP Recruitment Result | Updated Soon |
राज्यात तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती असणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. डेमो लिंकनंतर अंतिम लिंक पाठवण्यासाठी ग्रामीण विकास विभागाकडून सूचना येताच, जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे डेमो लिंक पाठवण्यात आली होती. त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे.
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Maharashtra ZP Education Qualification – शैक्षणिक पात्रता
| Post Name | Educational Qualification |
| Pharmacist (औषध निर्माता) | औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार |
| Health workers (Male) (आरोग्य सेवक) | विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. |
| Health workers (Female) (आरोग्य सेविका) | ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील |
| Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
| Gram Sevak (ग्रामसेवक) | किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम |
| Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
| Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) | यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
| Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) | विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
| Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
| Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
| Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक) | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र |
| Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल. |
| Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
| Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
| Jodari (जोडारी) | जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील. |
| Electrician (तारतंत्री) | महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार |
| Supervisor (पर्यवेक्षिका) | ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. |
| Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) | संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम |
| Laboratory Technician Mechanics (प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी) | ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
| Rigman (रिगमन) | शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. |
| Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
| Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
| Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | पदवीधर |
| Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा) | पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव |
| Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)) | ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. |
| Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) | जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य |
| Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, |
| Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल |
| Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार |
Zilla Parishad Maharashtra Required Age Limit – वयोमर्यादा
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या/१२, दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाळी ४५ वर्षे) देण्यात आलेली आहे.
ज्या पदासाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत देण्यात आलेली शिथिलता ही दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच लागू राहिल.
सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा
दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.
ZP Maharashtra Group C Age Limit 2026 |
|
| सर्वसाधारण प्रवर्ग | 18 ते 40 वर्षे |
| मागास प्रवर्ग | 18 ते 45 वर्षे |
मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून फक्त या परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे. परंतू यासाठी उमेदवारांने नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
त्यानुसार सन २०२३ मध्ये घेणेत येणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेकरीता ज्यांनी मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज भरलेले होते व त्यांचे वयाधिक्य झालेले आहे, अशा उमेदवारांना वयामध्ये सूट देणेत येऊन या परीक्षेकरीता पात्र समजणेत येईल.
सन २०२३ च्या जाहिरातीनुसार वयामध्ये सूट मिळविण्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केला असलेबाबत अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
ZP Maharashtra Online Application Fee – अर्ज शुल्क
Zilla Parishad Maharashtra Arj Shulk |
|
| सर्वसाधारण प्रवर्ग | रु. 1000 |
| मागास प्रवर्ग | रु. 900 |
| माजी सैनिक | अर्ज शुल्क नाही |
Other Essential Qualification For ZP Maharashtra Online Apply 2026
वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामाईक अर्हता खालील प्रमाणे असेल.
| सामाईक अर्हता | तपशिल |
| संगणक अर्हता | कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस – २०१२/प्र.क्र.२७७/३९, दि. ०४/०२/२०१३ मध्ये नमूद | केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक | आहे. परंतू इतर पदांसाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि. १९/०३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. |
| लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन |
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापन नियुक्ती वेळेस हजर होतांना विवाहीत उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील.
प्रतिज्ञापनामध्ये नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोन | पेक्षा अधिक असेल तर दिनांक २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या, अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेच्या नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल. या नियमातील व्याख्येनुसार लहान कुटूंब याचा अर्थ, दोन अपत्ये यांसह पत्नी व पती असा आहे. |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाचा ऑनलाईन अर्ज करताना Have you passed recognized equivalent two Years Course in Construction Supervisor ?
असा प्रश्न विचारणेत आला होता. परंतू सदरचा कोर्स हा एक वर्षाचा असल्यामुळे त्या पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकत नव्हते. तथापि त्यामध्ये सुधारणा करणेत आली असून आता Have you passed recognized equivalent Course in Construction Supervisor ? असा प्रश्न विचारणेत येत आहे. त्यामुळे सदर पदासाठी इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतील.
ZP Bharti 2026 Application Form Documents – कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे : ZP Bharti 2026
सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे.
1.कागदपत्रे / प्रमाणपत्रे
2.अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र
3.शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
4.वयाचा पुरावा
5.जन्माचा पुरावा
6.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
7.राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील)
8.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
9.पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
10.खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
11.अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
12.महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र
13.महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला
14.विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
15.मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन
16.पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र
17.MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
18.टंकलेखन प्रमाणपत्र
19.लघुलेखन प्रमाणपत्र
20.अनुभव प्रमाणपत्र
Steps to Apply for the Maharashtra ZP Recruitment 2026
- Go to the IBPS website and create an account.
- Login to your account and click on the “Apply Online” link for ZP Recruitment 2026.
- Select the post you want to apply for and fill out the application form.
- Upload your scanned documents.
- Pay the application fee.
- Submit your application.
Maharashtra ZP Bharti 2026 Post Name
Posts Related to Health Services
- Pharmacist
- Laboratory Technician
- Health workers (Male) (आरोग्य सेवक)
- Health workers (Female)
- Health Supervisor
Other Posts
Gram Sevak (Gram Sevak)
Junior Engineer (GPP)
Junior Engineer (Mechanical)
Junior Engineer (Electrical)
Junior Engineer (Civil)
Junior Engineer (Civil) (LP)
Junior Draftsman
Junior Mechanic (Mechanical Assistant)
Junior Accounts Officer
Junior Assistant (Clerk)
Junior Assistant Accounts
tuna (जोडारी)
Electrician
Supervisor
Livestock Supervisor
Laboratory Technician Mechanics
Rigman (Rigman)
Stenographer (Higher Grade)
Stenographer (Lower Grade)
Senior Assistant (Clerk)
Senior Assistant Accounts
Extension Officer (Agriculture)
Extension Officer (Panchayat)
Extension Officer (Education)
Extension Officer (Statistics)
Civil Engineering Assistant..
Zilla Parishad Bharti 2026 – The preparation for new recruitment of Yavatmal employees has reached the final stage and the Ministry level is also pursuing for the recruitment of employees. Therefore, to remove the errors in the recruitment process, Dist. W. All the department heads have become active, so in any case, the activities in the district have been accelerated in accordance with the announcement for the recruitment in the month of July. An advertisement was released in 2024 for the recruitment of employees in Yavatmal Zilla Parishad. At that time, lakhs of unemployed youths had filed applications for recruitment by withdrawing up to 1000 rupees.