वनार्टी वनार्टी परीक्षा वेळापत्रक जाहीर !!!- VANARTI Training Programme 2026
VANARTI Training Programme 2026
VANARTI Training Programme 2026 – महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन-क्रिमिलेअर गटातील विद्यार्थ्यांना वनार्टी मार्फत IBPS-PO/Banking/LIC/AAO २०२६-२७, पोलीस / लष्कर भरती – २०२६-२७, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२६-२७ प्रशिक्षण, कर्मचारी निवड आयोग संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा ऑनलाइन प्रशिक्षण २०२६-२७, आरआरबी (रेल्वे भरती मंडळ) प्रशिक्षण २०२६-२७, MBA-CAT/CMAT-CET 2026-27 प्रशिक्षण, MPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा प्रशिक्षण २०२६-२७, MPSC गट-ब आणि गट-क परीक्षा प्रशिक्षण २०२६-२७ या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येते. 2026-27 या आर्थिक वर्षात वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खाली आपण वेळापत्रक बघू शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
1. आधार कार्ड
2. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र)
4. पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका
5. दिव्यांगाचे प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास)
6. अनाथ असल्यास दाखला (अनाथ असल्यास)
अर्ज कसा करावा :-
1. वनार्टीच्या www.vanarti.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for IBPS-PO/Banking/LIC/AAO, Police/Army Recruitment, TAIT (Teacher Aptitude and Intelligence Test), SSC-CGL (Staff Selection Commission – Combined Graduate Level), RRB (Railway Recruitment Board), MBA-CAT/CMAT-CET, MPSC Engineering Services, or MPSC Group-B and Group-C ” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.
3. विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही.
अटी व शर्ती :-
1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 25/06/2026 राहील.
2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, वनार्टी यांचे राहतील.
4. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्याने यापूर्वी वनार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘सारथी’ या संस्थेकडून योजनेचा लाभघेतलेला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत केवळ वनार्टीच्या Call Centre वर संपर्क करावा.
संपर्क क्रमांक :- 7887882026
E-mail Id :-
[email protected]
या ईमेलवर संपर्क साधावा
संस्थेचे संकेतस्थळ (Website) :- www.vanarti.in
Important Links Vanarti
| Title | Date | Link |
|---|---|---|
|
Application for IBPS-PO/Banking/LIC/AAO Training 2026-27
|
08-06-2026
|
|
|
Application for Police / Military Bharti – 2026-27
|
08-06-2026
|
|
|
Application for Application for Teachers Aptitude and Intelligence Test (TAIT)-2026-27 Training
|
08-06-2026
|
|
|
Application for Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Online Training 2026-27
|
08-06-2026
|
|
|
Application for RRB (Railway Recruitment Board) Training 2026-27
|
08-06-2026
|
|
|
Application for MBA-CAT/CMAT-CET 2026-27 Training
|
08-06-2026
|
|
|
Application for MPSC Engineering Services Examination Training 2026-27
|
08-06-2026
|
|
|
Application for MPSC Group-B & Group-C Examination Training 2026-27
|
08-06-2026
|
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
How to Apply?
1. वनार्टीच्या www.vanarti.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for IBPS-PO/Banking/LIC/AAO, Police/Army Recruitment, TAIT (Teacher Aptitude and Intelligence Test), SSC-CGL (Staff Selection Commission – Combined Graduate Level), RRB (Railway Recruitment Board), MBA-CAT/CMAT-CET, MPSC Engineering Services, or MPSC Group-B and Group-C ” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ‘वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (वनार्टी) तर्फे ‘जेईई’, ‘नीट’ आणि ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना आता १५ जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील.
राज्यातील विमुक्त जाती; तसेच भटक्या जमाती ब, क व ड नॉन-क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी ‘वनार्टी’ कार्यरत आहे. २०२६-२८ या शैक्षणिक सत्रासाठी ‘वनार्टी’ तर्फे जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या www.vanarti.in या संकेतस्थळावर अर्ज करावे. अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत ३० मे २०२६ होती. मात्र, विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या ७८८७८८२०२६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाची दखल घेऊन आता अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, असेही वावगे यांनी नमूद केले.