राज्यात वन विभागात भरती कधी सुरु होणार, नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच! – Forest Guard Bharti 2026
Van Rakshak Bharti 2026
महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असली, तरी व्याघ्र प्रकल्पांना मनुष्यबळाच्या कमतरतेचा आहे राज्यातील फटका बसत आहे. राज्यातील वनविभागात आरएफओंच्या तब्बल ९८१ पदांची टंचाई आहे, त्यातच ३५० पदांची भरती रखडली आहे. परिणामी, वने व वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ १८ टक्के वनक्षेत्र शिल्लक असून, गेल्या दशकात वनवाढीचा आलेख अत्यंत मंदावलेला आहे. पोलिस खात्यात जवळपास दोन लाखांचा ताफा कार्यरत असताना वनविभागातील अधिकारी व कर्मचारीसंख्या नगण्य आहे. त्यामुळे वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेच्या रक्षणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. तसेच, या भरतीचा पूर्ण अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया या लिंक वर उपलब्ध आहे.
RFO ची पदे अत्यंत कमी
राज्यात व्याघ्र प्रकल्पांची संख्या ६ असून, अभयारण्यांची संख्या ४८ पेक्षा अधिक आहे. असे असताना केवळ ९८१ पदांवर वनविभागाचा डोलारा उभा आहे. आरएफओ हे वनविभागातील महत्त्वाचे पद असून, प्रादेशिक, वन्यजीव, मूल्यांकन, सामाजिक वनीकरण आणि शिक्षण अशा विविध उपविभागांत ही पदे विभागली गेल्याने कामकाजावर गंभीर परिणाम झाल्याचे चित्र समोर आले आहे.
३५० पदे सामाजिक वनीकरणात अडकली
वनविभागातील सामाजिक वनीकरण विभागात ठोस कामे नसतानाही तब्बल ३५० आरएफओ कार्यरत आहेत. तर दुसरीकडे वन्यजीव, प्रादेशिक विभागामध्ये आरएफओंची शेकडो पदे रिक्त आहेत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक वनीकरणात १० ते १४ आरएफओ कार्यरत आहेत. सामाजिकमध्ये तालुकास्तरावरही आरएफओ आहेत. याउलट, वन्यजीव व प्रादेशिक विभागात जिथे जबाबदारी अधिक आहे, तिथेच शेकडो आरएफओंची पदे रिक्त असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.
प्रादेशिक परिक्षेत्राची पुनर्रचना केव्हा?
वनविभागात प्रादेशिकची केवळ २५० परिक्षेत्रे असून, अनेक ठिकाणी एका परिक्षेत्रात दोन ते तीन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे वनसंरक्षणाच्या कामावर थेट परिणाम होत आहे. काही काळापूर्वी प्रादेशिक परिक्षेत्राची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता; मात्र त्यावर पुढील पाठपुरावा न झाल्याने सध्या एका परिक्षेत्राला तीन तालुक्यांचा व्याप सांभाळावा लागत आहे. विशेष म्हणजे, प्रादेशिक परिक्षेत्रांची वाढ सामाजिक वनीकरणातील परिक्षेत्र कमी करून केली, तर शासनावर नवीन पदे भरण्याचा बोजा पडणार नाही.
राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वनविभागात लवकरच मोठ्या प्रमाणात भरती होणार असून, तब्बल 900+ वनरक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी ते लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक परीक्षार्थी तयारीला लागले आहेत.
Advertisement
विभागनिहाय पदसंख्या अशी आहे:
-
नागपूर – १८५२
-
ठाणे – १५६८
-
छत्रपती संभाजीनगर – १५३५
-
गडचिरोली – १४२३
-
कोल्हापूर – १२८६
-
अमरावती – ११८८
-
धुळे – ९३१
-
नाशिक – ८८७
-
चंद्रपूर – ८४५
-
पुणे – ८११
-
यवतमाळ – ६६५
पात्रता व अटी:
या भरतीसाठी उमेदवाराने इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरतील. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. अर्ज सादर करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रके आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
अर्जाची प्रक्रिया:
संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून, अर्ज करण्यासाठी वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. भरती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवारांना पुरुषांसाठी ५ किमी आणि महिलांसाठी ३ किमी धावण्याची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तयारीस देखील सुरुवात करावी.
इतर पदांच्या संधीही शक्य:
वनरक्षक पदांव्यतिरिक्त वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार आदी पदांची भरती होण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती वनविभागातील सूत्रांनी खासगीत दिली आहे.
उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे आणि तयारी सुरू ठेवावी.
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Van Rakshak Bharti 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सहायक वनरक्षक |
|
How To Apply For Van Vibhag Forest Guard Notification 2026
- सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.maharashtra.gov.in Bharti 2026
|
|
| ???? PDF जाहिरात | Coming Soon |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.maharashtra.gov.in |
Maharashtra Vanrakshak Recruitment 2026 Details |
|
|---|---|
|
Department
Name |
MahaForest Bharti Application Form |
|
Recruitment
Name |
Van Vibhag Bharti 2026 |
|
Total
Vacancy |
2138+ Vacancies |
| Educational Qualification | Read PDF |
| Age Limit | 18 to 27 |
|
Apply
Last Date |
NA |
| Fee |
General: Rs.1000
Backward: Rs.900 Ex-ser: No Fee |
|
Job
Location |
Maharashtra |
|
Official
Website |
mahaforest.gov.in |
Van Vibhag Bharti Exam List Of Documents – वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
Educational Qualification For Van Vibhag Forest Guard Recruitment
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वनरक्षक |
1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( १० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 3. माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.) 5. अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 6. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे. |
Salary Details For MAHA Forest Forest Guard Recruitment 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वनरक्षक | Rs. 29,200 – 92,300/- per month |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शैक्षणिक पात्रता काय आहे?
Read PDF
वयोमर्यादा किती आहे?
18 to 27
नोकरी ठिकाण कुठे आहे?
Maharashtra
प्रादेशिक परिक्षेत्राची पुनर्रचना केव्हा?
वनविभागात प्रादेशिकची केवळ २५० परिक्षेत्रे असून, अनेक ठिकाणी एका परिक्षेत्रात दोन ते तीन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे वनसंरक्षणाच्या कामावर थेट परिणाम होत आहे. काही काळापूर्वी प्रादेशिक परिक्षेत्राची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता; मात्र त्यावर पुढील पाठपुरावा न झाल्याने सध्या एका परिक्षेत्राला तीन तालुक्यांचा व्याप सांभाळावा लागत आहे. विशेष म्हणजे, प्रादेशिक परिक्षेत्रांची वाढ सामाजिक वनीकरणातील परिक्षेत्र कमी करून केली, तर शासनावर नवीन पदे भरण्याचा बोजा पडणार नाही.
वयोमर्यादा :- Maha Forest Recruitment Age Limit 2026
उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
Selection Process For Forest Department Forest Guard Recruitment 2026
- उमेद्वारंची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल.
- ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
- ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.
- ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
- परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
- परीक्षा ही २ तासाची राहील.
- उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.