UPSC Mains मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, २१ ते ३० ऑगस्ट परीक्षा!- UPSC Annual Calendar 2027
UPSC Exam Timetable 2027
UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा २०२६ची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या तारखांची अधिकृत घोषणा केली असून, ही परीक्षा २१ ते ३० ऑगस्टदरम्यान आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेची तयारी वेगाने करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य परीक्षेचे हॉलतिकीट पुढील आठवड्यात जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच परीक्षा सुरू होण्याच्या साधारण एक ते दोन आठवडे आधी हे कार्ड उपलब्ध होईल. पूर्वपरीक्षेत यशस्वी झालेले उमेदवारच हे हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतील. त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in नियमितपणे तपासावी, जेणेकरून हॉलतिकीट जाहीर होताच ते वेळेवर मिळवता येईल. हॉलतिकीट डाऊनलोड केल्यानंतर त्यावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासणे. नाव, फोटो, रोल नंबर, परीक्षा केंद्र आणि परीक्षेच्या तारखा यांची खातरजमा करावी. कोणतीही चूक आढळल्यास त्वरित आयोगाशी संपर्क साधावा. परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी हॉलतिकिटाची कॉपी आणि एक वैध ओरिजिनल फोटो ओळखपत्र (जसे की मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा इतर मान्य ओळखपत्र) अनिवार्यपणे सोबत नेणे आवश्यक आहे. या दोन्ही कागदपत्रांशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या किमान एक तास आधी पोहोचावे. यामुळे शेवटच्या क्षणी होणारी गर्दी, तपासणी आणि अनावश्यक तणाव टाळता येईल असे देखील UPSC ने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वर्ष २०२७ या वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस, एनडीए, सीडीएस, अभियांत्रिकी सेवा, सीएपीएफ यांसह तब्बल २७ परीक्षा आणि भरती प्रक्रियांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या वेळापत्रकामुळे लाखो उमेदवारांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन करण्यास मोठी मदत होणार आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार, संयुक्त भू-वैज्ञानिक पूर्वपरीक्षा १० जानेवारी २०२७ रोजी होणार असून, १३ जानेवारीला यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२७ चे अधिकृत नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. तसेच ३१ जानेवारीला अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा होणार असून, यूपीएससी सीएसईसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ फेब्रुवारी २०२७ निश्चित करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित एनडीए आणि एनए परीक्षा आणि सीडीएस परीक्षा या दोन्ही परीक्षा ११ एप्रिल २०२७ रोजी होणार आहेत.
देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२७ ही परीक्षा २३ मे २०२७रोजी पार पडणार असून, त्यानंतर २० ऑगस्ट २०२७पासून मुख्य परीक्षा सुरू होणार आहे. केंद्रीय सुरक्षा दलांमधील अधिकारी पदांसाठीची सीएपीएफ परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, एनडीए, एनए परीक्षा, सीडीएस परीक्षा या १९ सप्टेंबर २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभराचा अभ्यास आराखडा तयार करण्यासाठी हे वेळापत्रक महत्त्वाचे मानले जाते. नोटिफिकेशन आणि परीक्षा तारखा आधीच स्पष्ट झाल्याने उमेदवारांना अभ्यास, टेस्ट सीरिज आणि रिव्हिजनचे नियोजन करणे सोपे होणार आहे. आवश्यक परिस्थितीनुसार, परीक्षा तारखांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे तपासता राहावे, असे यूपीएससीकडून कळवण्यात आले आहे.
MPSC 2027 in Marathi
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार, उमेदवारांची १९, २० आणि २१ जून रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
Advertisement
पहिल्या दिवशी शुक्रवारी १९ जून रोजी जनरल इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल. जनरल स्टडीज डिस्क्रिप्टिव्ह पेपर दुपारी २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होईल. जनरल इकॉनॉमिक्स-१ पेपर देखील सकाळच्या सत्रात नियोजित आहे. २० जून रोजी स्टॅटिस्टिक्स-१ ऑब्जेक्टिव्ह पेपर सकाळी ९ ते ११ या वेळेत होईल. जनरल इकॉनॉमिक्स – २ डिस्क्रिप्टिव्ह पेपर दुपारी २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होईल. स्टॅटिस्टिक्स-१ ऑब्जेक्टिव्ह पेपर दुपारच्या सत्रात, तर जनरल इकॉनॉमिक्स -१ पेपर सकाळच्या सत्रात होईल. २१ जून रोजी सांख्यिकी ३ चा वर्णनात्मक पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल. भारतीय अर्थशास्त्र आणि सांख्यिकी ४ चे पेपर दुपारी २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होतील, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
UPSC CGS Prelims Exam 2026 Timetable
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या सर्व प्रमुख परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नागरी सेवा, एनडीए, सीडीएस, अभियांत्रिकी सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षांचे नियोजन करण्यासाठी २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस (आयएएस/आयपीएस) परीक्षेची अधिसूचना १४ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२६ ठेवण्यात आली आहे. त्याची प्रिलिम्स परीक्षा २४ मे २०२६ रोजी होईल, तर मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ पासून होणार आहे. त्याच वेळी, सैन्यात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी, एनडीए, सीडीएस परीक्षा २०२६ ची अधिसूचना १० डिसेंबर २०२५ रोजी येईल आणि दोन्हीसाठी लेखी परीक्षा १२ एप्रिल २०२६ रोजी होईल. त्याचवेळी, सैन्यात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी, एनडीए, सीडीएस-। परीक्षा २०२६ ची अधिसूचना १० डिसेंबर २०२५ रोजी येईल आणि दोन्हीसाठी लेखी परीक्षा १२ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुधारित वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एनडीए, एनए १ भरती परीक्षेसाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाईट https://upsc.gov.in/ exams/exam-calendar वर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ते डाऊनलोड करू शकतात.
सुधारित वार्षिक कॅलेंडरनुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षेची अधिकृत अधिसूचना ११ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. ही परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. दरवर्षी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १४ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परीक्षेची अधिसूचना २८ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, १७ जून २०२५ पर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा २०२५ साठी अर्ज प्रक्रिया २२ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. ११ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ही भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी घेतली जाईल. शिवाय, भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२५ ही १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. नागरी सेवा परीक्षा २२ ऑगस्ट २०२५ रोजी घेतली जाईल. यूपीएससीद्वारे पहिल्या टप्प्यासाठी ११ डिसेंबर २०२४ रोजी सीडीएस परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली जाईल.
UPSC 2025 Exam Schedule: Union Public Service Commission (UPSC) has declared the Geo Scientist Prelims Exam 2025 Time Table. The exam schedule is available on upsc.gov.in. Click on the below link to download the timetable.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत भू शास्त्रज्ञ (CGS) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. वेळापत्रक अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उपलब्ध आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने भू शास्त्रज्ञ (CGS) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जारी केले आहे. UPSC ने अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर हे वेळापत्रक जारी केले आहे.
वेळापत्रक डाउनलोड करा