Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » TRTI भरतीपूर्व प्रशिक्षण रखडले- १८ हजार उमेदवारांना फटका! | TRTI Training Program
Last Updated:

TRTI भरतीपूर्व प्रशिक्षण रखडले- १८ हजार उमेदवारांना फटका! | TRTI Training Program

TRTI Training Program

अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना पोलीस व लष्कर भरतीसाठी पूर्वतयारी करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येणारे प्रशिक्षण अद्याप सुरू न झाल्याने हजारो विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. निवड प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास दोन महिने होऊनही प्रशिक्षणाला प्रारंभ न झाल्याने ‘TRTI’च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ‘टीआरटीआय’ने २६ सप्टेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवक-युवतींकडून अर्ज मागवले होते. या योजनेअंतर्गत राज्यभरातील १८ हजार लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर २१ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन चाळणी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर ८ एप्रिलला जिल्हानिहाय गुणवत्ता व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. प्रशिक्षणासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना २२ मे ते २ जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

TRTI ने ४ जूनला प्रसिद्धीपत्रक जारी करून निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे व शारीरिक पात्रतेची तपासणी संबंधित संस्थांमध्ये ६ जून ते २ जुलै या कालावधीत केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले नाही. राज्य शासनाकडून आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी भरतीपूर्व प्रशिक्षण हे उमेदवारांसाठी महत्त्वाचे मानले जाते. मात्र, प्रशिक्षण रखडल्याने अनुसूचित जमाती प्रवर्गातील हजारो युवक-युवती आवश्यक मार्गदर्शन व शारीरिक तयारीपासून वंचित राहत असल्याची खंत उमेदवारांनी व्यक्त केली. दरम्यान, शासनाच्या बार्टी व सारथीसह अन्य संस्थांमार्फत राबवण्यात येणारी भरतीपूर्व प्रशिक्षण योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात असताना टीआरटीआयच्या योजनेला अद्याप सुरुवात न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

Advertisement

‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (TRTI) लालफितशाहीमुळे आणि डिसाळ कारभारामुळे गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अखेर सुरू झाले. सरकारच्या निर्देशानंतर ‘टीआरटीआय’ प्रशासनाला जाग आली असून, प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून सोमवारपासून (ता. ४) प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू झाले आहे. यामुळे राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टीआरटीआय’तर्फे राबविल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), बैंकिंग (IBPS) अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाची प्रवेशप्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प होती. सामाईक प्रवेश परीक्षेचा (CET) निकाल लागून चार महिने उलटले तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नव्हते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे उमेदीचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. यासंदर्भात ‘सकाळ’ने  २० एप्रिल रोजी ‘लालफितशाहीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेत ‘टीआरटीआय’च्या आयुक्तांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला तसेच आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी तातडीने उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान
टाळण्यासाठी सर्व प्रशिक्षण कार्यक्रम नियोजित वेळेतच सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

एकूण जागा: २,७००
एकूण प्राप्त अर्ज: १,०३,७४२
प्रत्यक्ष परीक्षा दिलेले विद्यार्थी : ७२,९७३
राबविल्या जाणाऱ्या योजना :यूपीएससी, एमपीएससी, एमईएस, जेएमएफसी, आयबीपीएस, टीईटी, एसएससी

Advertisement

TRTI Result 2025 – 2026

सन २०२५-२६ करीता महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून PSI/STI/ASO, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आणि पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात आले होते. उपरोक्त नमूद पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनांच्या लाभार्थी निवडीकरीता दि.२०/११/२०२५ ते दि. २४/११/२०२५ या कालावधीत ऑनलाईन सामायिक चाळणी परीक्षा (CET) आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.

TRTI Results 2025

Check Your Results