Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » खुशखबर! – आदिवासी मोठी मेगाभरती; २,४२१ पदांची भरती प्रक्रिया!! | Tribal Ashram School Recruitment 2026
Last Updated:

खुशखबर! – आदिवासी मोठी मेगाभरती; २,४२१ पदांची भरती प्रक्रिया!! | Tribal Ashram School Recruitment 2026

Ashram School Bharti 2026

Tribal Ashram School  Bharti 2026 : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांवर आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील चारही आदिवासी विकास विभागांमधील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, तसेच शिक्षण सेवक संवर्गातील एकूण २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तथापि, सर्वाधिक रिक्त पदे ठाणे, नाशिक विभागात आहेत. आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चार विभागांतील शासकीय आश्रमशाळांमध्ये ही भरती होणार आहे. यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ८२६ पदे, तर त्याखालोखाल ठाणे विभागात ६१३, नागपूर विभागात ५१४ आणि अमरावती विभागात ४६८ पदे रिक्त आहेत. आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला असून, शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त शिक्षकपदे भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील तब्बल २ हजार ४२१ रिक्त शिक्षकपदांची भरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वर्ग तीन संवर्गातील शिक्षण सेवक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास आयुक्तालयाच्या उपायुक्त शशिकला अहिरराव यांनी दिली. रिक्त पदांमुळे प्रभावित होणाऱ्या विद्यार्थ्यांना या भरतीमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, आश्रमशाळांमधील शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

आदिवासी भागांतील शैक्षणिक व्यवस्थेला बळ देणाऱ्या या महत्त्वपूर्ण भरतीत नाशिक विभागाला सर्वाधिक ८२६ शिक्षकपदांचा वाटा मिळाला आहे. त्यापाठोपाठ ठाणे विभागात ६१३, नागपूर विभागात ५१४, तर अमरावती विभागात ४६८ पदे भरली जाणार आहेत. मराठी आणि इंग्रजी माध्यमातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह उच्च माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या शिक्षण सेवक पदांचाही या भरतीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पेसा क्षेत्रातील ८८५, तर नॉन-पेसा क्षेत्रातील तब्बल १ हजार ५३६ रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्राथमिक तसेच माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या शिक्षकांची निवड होणार असल्याने आदिवासी भागांतील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे राज्यातील आश्रमशाळांमधील सर्वाधिक रिक्त पदे नाशिक आणि ठाणे विभागात असल्याचे स्पष्ट होते. या भरतीमध्ये प्राथमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम), माध्यमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम) तसेच उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशा विविध पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही पदे पेसा आणि बिगर पेसा अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत. शासकीय आश्रमशाळांतील एकूण २,४२१ रिक्त पदांपैकी ८८५ पदे पेसा (पंचायत अनुसूचित क्षेत्रांवरील विस्तार अधिनियम, १९९६’) क्षेत्रासाठी, तर १,५३६ पदे बिगर पेसा क्षेत्रासाठी आहेत. प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) पदासाठी बिगर पेसा क्षेत्रात ८६२, तर पेसा क्षेत्रात ४३६ जागा उपलब्ध आहेत. प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदासाठी पेसा क्षेत्रात ६७ आणि बिगर पेसा क्षेत्रात १६१ जागा आहेत. माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) पदासाठी बिगर पेसा क्षेत्रात ३५२, तर पेसा क्षेत्रात १३८ पदे उपलब्ध आहेत. माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदासाठी पेसा क्षेत्रात ५ आणि बिगर पेसा क्षेत्रात २२ पदे आहेत. उच्च माध्यमिक शिक्षकांच्या एकूण ३५७ जागा भरण्यात येणार असून, त्यापैकी २५१ पदे पेसा क्षेत्रात आणि १०६ पदे बिगर पेसा क्षेत्रात आहेत. यामध्ये मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे.

Advertisement

उमेदवारांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू

गुणवत्ता, पारदर्शकता आणि स्थानिक उमेदवारांच्या हिताचा समतोल साधत आदिवासी विकास विभागाने शिक्षक भरतीचे नियोजन केले आहे. पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रांसाठी स्वतंत्रपणे पदांचे नियोजन करण्यात आले असून, स्थानिक तसेच आदिवासी भागातील उमेदवारांना योग्य संधी मिळावी, याचा विशेष विचार करण्यात आला आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्ता आणि शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने राबविली जात असल्याचे आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले. तसेच, उमेदवारांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आदिवासी शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी होणाऱ्या या भरतीत प्राथमिकपासून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या मराठी माध्यमासाठी नॉन-पेसा क्षेत्रात ८६२, तर पेसा क्षेत्रात ४३६ पदे उपलब्ध आहेत. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी पेसा क्षेत्रात ६७, तर नॉन-पेसा क्षेत्रात १६१ जागा भरल्या जाणार आहेत. माध्यमिक स्तरावर मराठी माध्यमातील शिक्षकांची नॉन-पेसा क्षेत्रातील ३५२ आणि पेसा क्षेत्रातील १३८ पदे भरण्यात येणार असून, इंग्रजी माध्यमासाठी पेसा क्षेत्रात ५ आणि नॉन-पेसा क्षेत्रात २२ पदांचा समावेश आहे. याशिवाय उच्च माध्यमिक स्तरावरील तब्बल ३५७ शिक्षण सेवक पदांची भरती होणार असून, त्यापैकी २५१ पदे पेसा, तर १०६ पदे नॉन-पेसा क्षेत्रातील आहेत. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागांतील शाळांना आवश्यक शिक्षकबळ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Ashram School Bharti 2026


Educational Qualification For Tribal Ashram School Chowkidar Recruitment 2026

Advertisement
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चौकीदार Have passed Secondary School Certificate Examination

Salary For Tribal Ashram School Chowkidar Arj 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
चौकीदार S1 : 15000/- 47600/-

How To Apply For Tribal Ashram School Chowkidar Bharti 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अर्ज प्रक्रिये संदर्भात महत्वाची माहिती

१) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
२) ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच चौकीदार पदाचा प्रकल्पनिहाय भरावयाची पदे, पदाचा तपशिल, वेतनश्रेणी, विहीत वयोमर्यादा क्योमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदाचा ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
३) स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अर्शतः बदल करणे, पदांच्या एकूण व सामाजिक समांतर आरक्षणनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल, याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहीत नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी, उदभवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/0Kwk63cGF
👉  ऑनलाईन अर्ज करा https://lnk.ua/9EHnVbXoc
✅ अधिकृत वेबसाईट
https://tribal.maharashtra.gov.in/