खुशखबर! – आदिवासी मोठी मेगाभरती; लवकरच २,४२१ पदांची भरती प्रक्रिया!! | Tribal Ashram School Recruitment 2026
Ashram School Bharti 2026
Tribal Ashram School Bharti 2026 : आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला असून, शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त शिक्षकपदे भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील तब्बल २ हजार ४२१ रिक्त शिक्षकपदांची भरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वर्ग तीन संवर्गातील शिक्षण सेवक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास आयुक्तालयाच्या उपायुक्त शशिकला अहिरराव यांनी दिली. रिक्त पदांमुळे प्रभावित होणाऱ्या विद्यार्थ्यांना या भरतीमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, आश्रमशाळांमधील शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
आदिवासी भागांतील शैक्षणिक व्यवस्थेला बळ देणाऱ्या या महत्त्वपूर्ण भरतीत नाशिक विभागाला सर्वाधिक ८२६ शिक्षकपदांचा वाटा मिळाला आहे. त्यापाठोपाठ ठाणे विभागात ६१३, नागपूर विभागात ५१४, तर अमरावती विभागात ४६८ पदे भरली जाणार आहेत. मराठी आणि इंग्रजी माध्यमातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह उच्च माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या शिक्षण सेवक पदांचाही या भरतीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पेसा क्षेत्रातील ८८५, तर नॉन-पेसा क्षेत्रातील तब्बल १ हजार ५३६ रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्राथमिक तसेच माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या शिक्षकांची निवड होणार असल्याने आदिवासी भागांतील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
उमेदवारांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू
गुणवत्ता, पारदर्शकता आणि स्थानिक उमेदवारांच्या हिताचा समतोल साधत आदिवासी विकास विभागाने शिक्षक भरतीचे नियोजन केले आहे. पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रांसाठी स्वतंत्रपणे पदांचे नियोजन करण्यात आले असून, स्थानिक तसेच आदिवासी भागातील उमेदवारांना योग्य संधी मिळावी, याचा विशेष विचार करण्यात आला आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्ता आणि शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने राबविली जात असल्याचे आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले. तसेच, उमेदवारांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आदिवासी शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी होणाऱ्या या भरतीत प्राथमिकपासून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या मराठी माध्यमासाठी नॉन-पेसा क्षेत्रात ८६२, तर पेसा क्षेत्रात ४३६ पदे उपलब्ध आहेत. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी पेसा क्षेत्रात ६७, तर नॉन-पेसा क्षेत्रात १६१ जागा भरल्या जाणार आहेत. माध्यमिक स्तरावर मराठी माध्यमातील शिक्षकांची नॉन-पेसा क्षेत्रातील ३५२ आणि पेसा क्षेत्रातील १३८ पदे भरण्यात येणार असून, इंग्रजी माध्यमासाठी पेसा क्षेत्रात ५ आणि नॉन-पेसा क्षेत्रात २२ पदांचा समावेश आहे. याशिवाय उच्च माध्यमिक स्तरावरील तब्बल ३५७ शिक्षण सेवक पदांची भरती होणार असून, त्यापैकी २५१ पदे पेसा, तर १०६ पदे नॉन-पेसा क्षेत्रातील आहेत. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागांतील शाळांना आवश्यक शिक्षकबळ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आश्रम शाळेत नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या नवीन अपडेट मुळे वशिलेगिरीला चाप बसणार असून उमेदवारांना हक्काची नोकरी मिळणार आहे. राज्यातील बेरोजगार आणि शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील रिक्त पदे आता थेट ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पदभरतीची संपूर्ण कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, आज मंगळवार, ९ जून रोजी याबाबतचा अधिकृत शासनादेश जारी करण्यात आला आहे. यामुळे आता शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून बोगसगिरीला पूर्णपणे लगाम बसणार आहे. या नवीन नियमानुसार, ही संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया राज्यभरात नागपूर, अमरावती, ठाणे व नाशिक या चारही अप्पर आयुक्त (अप्पर आदिवासी आयुक्त) कार्यालय स्तरावर राबविली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि वेळापत्रक संबंधित एटीसींद्वारे घोषित केले जाईल. उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची कसून तपासणी करण्यासाठी अप्पर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष पाच सदस्यीय निवड समिती गठीत करण्यात येणार आहे. राज्य शासनाने या भरतीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
- समाविष्ट संवर्ग: प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक.
- भरतीचे माध्यम: ‘पवित्र’ संगणकीय प्रणाली.
- अप्पर आयुक्त क्षेत्रे: अमरावती, नागपूर, नाशिक आणि ठाणे.
- शिक्षण सेवक कालावधी: सर्वसाधारणपणे ३ वर्षे (शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १३/१०/२००० आणि २७/०२/२००३ च्या शासन निर्णयानुसार).
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शासकीय आश्रमशाळांमधील ज्या पदांना ‘शिक्षण सेवक’ कालावधी लागू आहे, त्यांचा परीविक्षाधीन कालावधी नियमानुसार ३ वर्षांचा राहील. पवित्र पोर्टलच्या वापरामुळे वकिली व राजकीय शिफारसींना वाव राहणार नाही. गुणवत्तेच्या आधारावरच पात्र उमेदवारांची निवड होईल. आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा यामुळे तातडीने भरल्या जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या शिक्षक भरतीचा मार्ग सुकर झाल्याने डी.टी.एड, बी.एड आणि टीईटी/टीएआयटी धारक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Tribal Ashram School Bharti 2026 : Tribal Ashram School has invited applications for the various vacant posts of “ Chowkidar” . There are a total of 478 vacancies available. Applicants need to apply online mode. Eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for filling up the applications for posts is 27th of May 2026 . F or more details about Tribal Ashram School Bharti 2026, visit our website policebharati.co.in .
आदिवासी आश्रमशाळा अंतर्गत “चौकीदार” पदांच्या 478 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आदिवासी आश्रमशाळा चौकीदार भरती 2026 करीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२६ आहे. सादर भरती प्रक्रिया हि TCS द्वारे राबविण्यात येणार असल्याचे समजते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
आदिवासी आश्रमशाळा चौकीदार भरती 2026
- पदाचे नाव – चौकीदार
- पदसंख्या – 478 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे
-
परीक्षा शुल्क
–
- अमागास रुपये १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग – रुपये ९००/- (१० टक्के सुट)
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही
- परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे.
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ०६ मे २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मे २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in/
Tribal Ashram School Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| चौकीदार | 478 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Tribal Ashram School Chowkidar Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| चौकीदार | Have passed Secondary School Certificate Examination |
Salary For Tribal Ashram School Chowkidar Arj 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| चौकीदार | S1 : 15000/- 47600/- |
How To Apply For Tribal Ashram School Chowkidar Bharti 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज प्रक्रिये संदर्भात महत्वाची माहिती
१) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
२) ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच चौकीदार पदाचा प्रकल्पनिहाय भरावयाची पदे, पदाचा तपशिल, वेतनश्रेणी, विहीत वयोमर्यादा क्योमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदाचा ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
३) स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अर्शतः बदल करणे, पदांच्या एकूण व सामाजिक समांतर आरक्षणनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल, याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहीत नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी, उदभवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tribal.maharashtra.gov.in Arj 2026 |
|
|
📑 PDF जाहिरात
|
https://lnk.ua/0Kwk63cGF |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://lnk.ua/9EHnVbXoc |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://tribal.maharashtra.gov.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
नोकरी ठिकाण कुठे आहे?
महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
२७ मे २०२६
पदाचे नाव काय आहे?
चौकीदार
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)