ठाणे महानगरपालिका भरती परीक्षा तारखा प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा! – Thane Mahanagarpalika Admit Card 2026
Thane Mahanagarpalika Hall Ticket Download – Thane Mahanagarpalika Bharti 2025 – 2026 Latest Update is released. As per the latest Recruitment news, this process for 1773 Vacancies is under process. Last date to submit Application Forms was 17th Sept 2025. Now the good news is that the Exam Date of Thane Mahanagar Palika is declare by Thane Mahanagarpalika Recruitment Details, The exam Schdule if given below in following GR . Also the Admit Cards or Hall tickets are now available on given Link. More updates will be available on this under MahaBharti.in.
मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, ठाणे महानगरपालिका १७७३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज भरण्याचा टप्पा आताच पूर्ण झाला आहे. ठाणे महापालिकेने ऑगस्ट २०२५ मध्ये जाहीर केलेल्या १७७३ पदांच्या मेगाभरती प्रक्रियेसाठी महापालिकेकडे सुमारे ७५ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरतीची परीक्षा तारीख आणि प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. खालील लिंक वरून लॉगिन करून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच या भरतीच्या संदर्भातील पूर्ण सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.
Advertisement
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
हि भरती गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे) इत्यादी पदांसाठी होत आहे. तसेच, या भरती अंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२५ होती. आता उमेदवार या भरती मोहिमेच्या परीक्षांची वाट पाहत आहेत. नवीनतम अपडेटनुसार, ठाणे महानगरपालिकेच्या परीक्षा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अपेक्षित आहेत. ठाणे महानगरपालिकेने अद्याप अचूक तारीख जाहीर केलेली नाही. परंतु उमेदवारांनी त्यांच्या परीक्षेसाठी तयार राहावे. तसेच प्रवेशपत्रे किंवा हॉल तिकिटे परीक्षेच्या तारखेच्या १ आठवडा आधी उपलब्ध असतील. याबद्दल अधिक अपडेट्स MahaBharti.in वर उपलब्ध असतील.
जाहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करुन अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ५०% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. सरळसेवा भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची /उत्तरपुस्तिकांची गुणपडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही. अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित/बुध्दीमत्ता चाचणी व विषयज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरीता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील.प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. परंतु अग्निशमन सेवेतीलसहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक-यंत्रचालक व फायरमन या संवर्गाचे परीक्षेचे गुण १०० व परीक्षेचा कालावधी एक तास राहील.
तसेच शारिरीक व मैदानी चाचणीकरीता १०० गुण असतील. ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरुप, तांत्रिक ज्ञान यांचेशी संबंधित राहील.जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेच्या ७ (सात) दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र स्वतः संकेतस्थळावरून काढून घ्यावे. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा (छायाप्रतीसह) सोबत ठेवणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही उमेदवारांस परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वतःजवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेशपत्र व ओळखीच्या पुराव्याची छायाप्रत जमा करावी.परीक्षा केंद्राची शहरे उपलब्धतेनुसार निश्चित केली जातील.