Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » ठाणे अग्निशमन दलात ६०१ पदांची भरती लवकरच सुरु होणार! – Thane Fire Department Recruitment 2026
Last Updated:

ठाणे अग्निशमन दलात ६०१ पदांची भरती लवकरच सुरु होणार! – Thane Fire Department Recruitment 2026

Thane Fire Department Recruitment 2026

ठाणे अग्निशाम दल विभागात नवीन पदभरती प्ररकीय लवकरच सुरु होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे. गावदेवी मंडईतील आगीनंतर अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत आयुक्त सौरभ राव यांनी अग्निशमन दल आणि अभियांत्रिकी विभागातील भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याची घोषणा केली. या प्रक्रियेला प्राधान्य देत पुढील दोन दिवसांत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे राव यांनी नमूद केले. अग्निशमन विभागातील रिक्त पदे या माध्यमातून भरण्यात येणार आहे. शहरातील आगीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या सूचनेनुसार भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनुसार ‘टीसीएस’ कंपनी या प्रक्रियेत महापालिका प्रशासनाला मदत करणार आहे. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. जुन्या जाहिरातीनुसारच भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात ‘टीसीएस’च्या पथकाशी चर्चा झाली असून लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या तीन महिन्यांत ही भरती पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी आग लागण्याची घटना, तिची तीव्रता, तसेच आग नियंत्रणात आणण्यासाठी लागलेला वेळ याबाबतची माहिती सभागृहासमोर मांडली. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले की, अग्निशमन विभागात ८३५ पदे मंजूर असताना केवळ ३२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ही तफावत दूर करण्यासाठी ६०१ पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महापालिकेच्या विविध इमारती, शाळा, रुग्णालये आणि मंडई यांमध्ये फायर सेफ्टी ऑडिटबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दरवर्षी नियमितपणे होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. आगीच्या घटना टाळण्यासाठी अद्ययावत मॉक ड्रिल घेणे आवश्यक असून त्यासाठीही कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. महिन्याभरात महापालिकेच्या सर्व प्रमुख वास्तूंचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली.

Advertisement

सुमारे २५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरात मोठ्या गृहसंकुलांसह दाटीवाटीच्या झोपडपट्ट्याही मोठ्या प्रमाणावर आहेत. शहर विस्तारत असताना आगीच्या घटनांमध्येही वाढ होत असून, काही घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. नुकत्याच नौपाडा येथील गावदेवी भाजी मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत एका अग्निशमन अधिकाऱ्यासह सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याने अग्निशमन यंत्रणेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात कुठेही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी धाव घेत असले, तरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने बचावकार्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकारी, फायरमन आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने अग्निशमन दलावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जात आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या मागणीनंतर तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर अद्याप कायमस्वरूपी मुख्य अग्निशमन अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांकडेच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

६५८ पदे रिक्त:
ठाणे अग्निशमन दलात मंजूर पदांची संख्या ८३५ असून त्यापैकी १७४ पदे भरलेली आहेत. रिक्त पदांमध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचे १, विभागीय अग्निशमन आणि अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची प्रत्येकी ९, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची ४८, चालक/यंत्रचालकांची २०३ आणि फायरमनची ३८८ पदे रिक्त आहेत. नऊ केंद्रातील रिक्त पदांमुळे जवानांवर कामाचा ताण वाढला आहे.

Advertisement

ठाणे महापालिकेने एकाच दिवसात तब्बल ९१ जणांना पदोन्नती दिली आहे. आता ठाणे महापालिकेत रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवेतील जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभियांत्रिकीची ६६ आणि अग्निशमन विभागातील ३८२ फायरमनची पदे टप्प्याटप्प्याने भरण्याचा निर्णय घेतला आहे. मागील कित्येक वर्षांपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग रखडला होता. मागील तीन ते चार महिन्यांपासून हा मार्ग मोकळा झाला. आतापर्यंत १५८ जणांना महापालिकेने पदोन्नती दिली. त्यानंतर आता मागील कित्येक वर्षे रखडलेला भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकीची तसेच अग्निशमन दलातील महत्त्वाची मानली जाणारी फायरमनची पदे भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या भरतीसाठी नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित होणे अपेक्षित आहे. अग्निशमन दलातील फायरमन आणि अभियांत्रिकीची ६६ पदे कायमस्वरूपी भरली जाणार आहेत. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच या भरती प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

ठाण्यात नवनवीन गृहसंकुले येथे उभी राहत आहेत. तेथे आगीची घटना घडल्यास अग्निशमन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. महापालिकेत कार्यकारी ०५, उपअभियंता (नागरी) ०७, कनिष्ठ अभियंता (नागरी) ७७ आणि कनिष्ठ अभियंता २ ची ६६ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंत्याची पदे २०१६ पासून कमी-अधिक प्रमाणात रिक्त राहिलेली आहेत. ती भरली गेली नसल्याने त्याचा ताण आता जे कार्यरत कर्मचारी आहेत, त्यांच्यावर येत आहे. आरोग्य सेवेतील महत्त्वाची पदे मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने भरली जात आहेत. त्यात आता अभियांत्रिकी (कनिष्ठ अभियंता) यांची शिल्लक असलेली ६६ पदे भरली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

फायरमनसाठी मंजूर असताना केवळ ६८ पदे भरण्यात आली होती. आता शिल्लक असलेल्या ३८२ फायरमनची भरती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १८० फायरमन कायमस्वरूपी घेतले जाणार आहेत. आगीची घटना घडल्यास अग्निशमन विभागाकडे आजही अपुरे मनुष्यबळ आहे. सद्य:स्थितीत या विभागात १८५ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटी स्वरूपातील १२३ असे ३०८ जणांचे मनुष्यबळ कार्यरत आहे.