Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » हिंजवडीला टक्कर देणाऱ्या IT पार्क, लवकरचं ‘या’ शहराची ‘IT HUB’कडे झेप – Solapur IT Park Jobs
Last Updated:

हिंजवडीला टक्कर देणाऱ्या IT पार्क, लवकरचं ‘या’ शहराची ‘IT HUB’कडे झेप – Solapur IT Park Jobs

Solapur IT Park Jobs – The country’s third-largest and Maharashtra’s second-largest IT park after Hinjawadi in Pune will soon be established. Chief Minister Devendra Fadnavis had made an announcement regarding this. Following Pune, another city in Maharashtra is set to get an IT park. Notably, this IT park will be the second largest in Maharashtra and the third largest in India. The groundwork for establishing the new IT park has accelerated following the announcement by Chief Minister Devendra Fadnavis. A significant update has emerged, indicating that the land in Solapur has been nearly finalized for the IT park. This new IT park in Solapur will be developed as an alternative to the world-famous Hinjawadi IT Park in Pune.

सोलापूर शहरासाठी दीर्घकाळापासून चर्चेत असलेले आयटी पार्कचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आहे. होटगी येथील गट क्रमांक ५७६ मधील सुमारे २० हेक्टर (५० एकर) जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडे हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे प्रकल्पाची प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पुढे सरकणार आहे.राज्यात हिंजवडी आयटी पार्क नंतरचे मोठे आयटी हब म्हणून सोलापूरची ओळख निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला आयटी पार्क देण्याचे आश्वासन दिले होते. जमीन हस्तांतरणाचा निर्णय म्हणजे त्या आश्वासनाच्या पूर्ततेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यालाही यामुळे बळ मिळाले आहे.  देशातील तिसरं सर्वात मोठं आणि पुण्यातील हिंजवडीनंतर दुसरं आयटी पार्क लवकरच उभारण्यात येणार आहे (Solapur IT Park Jobs). याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. पुण्यानंतर महाराष्ट्रातील आणखी एका शहरात आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे आयटी पार्क महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं तर भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं आयटी पार्क ठरेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार नवे आयटी पार्क उभारण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. याबाबत महत्त्वाचं अपडेट समोर आलं असून आयटी पार्कसाठी सोलापुरात जागा जवळपास निश्चित झाली आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी आयटी पार्कला पर्याय म्हणून सोलापुरात हे नवे आयटी पार्क उभारण्यात येईल.

Advertisement

Solapur IT Park Jobs

हा प्रकल्प का महत्त्वाचा?

  • सोलापूर पारंपरिकरीत्या वस्त्रोद्योगासाठी ओळखले जाते. मात्र आयटी क्षेत्रातील गुंतवणूक झाल्यास शहराची अर्थव्यवस्था अधिक विविध आणि आधुनिक होऊ शकते.
  • स्थानिक तरुणांना पुणे, मुंबईकडे स्थलांतर न करता शहरातच रोजगाराच्या संधी
    सहाय्यक उद्योग, स्टार्टअप्स आणि सेवा क्षेत्राला चालना
    निवासी व व्यावसायिक पायाभूत सुविधांचा विकास
  • तसेच, सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला इचलकरंजीच्या धर्तीवर सवलती देण्याबाबत लवकरच बैठक होणार असल्याचे संकेत आहेत. शहरातील विमानसेवा, समांतर जलवाहिनी आणि अंतर्गत पाणीपुरवठा योजना यांसारखी पायाभूत कामेही प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले.
  • आयटी पार्कची उभारणी प्रत्यक्षात कधी सुरू होईल, किती कंपन्या येतील आणि किती रोजगार निर्माण होतील, याची स्पष्ट रूपरेषा पुढील टप्प्यात समोर येईल. मात्र जमीन हस्तांतरणाचा निर्णय हा सोलापूरच्या औद्योगिक भवितव्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो.

सोलापुरातील नव्या आयटी पार्कमुळे पुण्याच्या IT पार्कवरील ताण कमी होईल. तसेच नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. मागील तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आयटी पार्कसाठी जागा शोधून प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते.सोलापुरातील जलसंपदा विभागाच्या मालकीची असलेले 50 एकर जागेवर आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. ही जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तसेच सुविधांसाठी राज्य सरकारला 38 कोटी रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे.होटगी रोडला बांधण्यात येणाऱ्या 50 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतीला विमानतळ प्रशासनाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे. यामुळे विमानतळावरून निघणाऱ्या विमानाच्या फनेलमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.

या आयटी पार्कचे काम दीड वर्षामध्ये पूर्ण होणार असून जवळपास 45 हजार पेक्षा जास्त कर्मचारी येथे काम करू शकतात. आयटी पार्कमधील अंतर्गत रस्ते, पाणी, पथदिवे यासारख्या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अंदाजे 38 कोटी पर्यंतचा खर्च येणार आहे. दरम्यान, पुण्यामधील हिंजवडी येथील आयटी पार्क महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आयटी पार्क आहे. त्यानतंर सोलापूरच्या आयटी पार्कची उभारणी करण्यात येणार असून याचा फायदा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होणार आहे.

Advertisement