Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महाराष्ट्र कर्ज माफी यादी डाउनलोड 2026: शासन निर्णय (GR) PDF – Shetkari Karj Mafi List 2026
Last Updated:

महाराष्ट्र कर्ज माफी यादी डाउनलोड 2026: शासन निर्णय (GR) PDF – Shetkari Karj Mafi List 2026

Shetkari Karj Mafi List 2026 – पहिल्या यादीत १७ लाख शेतकरी, प्रोत्साहन लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी सप्टेंबरमध्ये जाहीर होणार.- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी तयार झाली असून, १० ऑगस्टला दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यातील ५६ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ३२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, तर २४ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. प्रोत्साहन लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात येईल. कर्जमाफी योजनेंतर्गत २० लाख २१ हजार शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून, तर सुमारे ६ लाख शेतकऱ्यांनी व्यावसायिक बँकांकडून पीक कर्ज घेतले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांचा डेटा आयकर विभागाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आला आहे. व्यावसायिक बँकांकडून कर्ज घेतलेल्या आणि थकीत (NP) खात्यांमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विशेष पुढाकार घेतला आहे. अशा खात्यांवर १५ ते ३५ टक्क्यांपर्यंतची सवलत देण्याची विनंती सरकारने व्यावसायिक बँकांना केली आहे. या यावीचे लाभार्थी आपण आहेत का असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल, किंवा या यादी मध्ये माझे नाव आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. चला तर पूर्ण माहिती यादी बघूया.

Shetkari Karj Mafi List 2026
आता या योजनेचं लाभ नेमका कुणाला होणार किंवा सध्या कोणते म्हत्वाचेंनिकष आहेत ते बघूया. या वरून आपल्याला यादी बद्दल पूर्ण माहिती मिळेल. तर समजा, एखाद्या शेतकऱ्याचे १ लाख रुपयांचे कर्ज एक वर्षापासून थकीत असेल, तर संबंधित बँकेने १५ टक्के रक्कम माफ करावी, तर उर्वरित ८५ टक्के रक्कम सरकार अदा करेल. यामुळे बँकांचे थकीत कर्ज कमी होईल, शासनावरील आर्थिक भारही कमी राहील आणि शेतकरीही कर्जमुक्त होईल, असा दावा मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. १७ हजार शाखा व्यवस्थापकांना प्रशिक्षण या नव्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरातील व्यावसायिक बँकांच्या सुमारे १७ हजार शाखा अधिकारी व व्यवस्थापकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी विशेष सेमिनार आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. २ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वनटाईम सेटलमेंट योजना १० ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या थकबाकीच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी, ओटीसी आणि प्रोत्साहन लाभ या तिन्ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहितीही सहकारमंत्र्यांनी दिली.

Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील सुमारे १७ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या यादीत अहिल्यानगर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि जालना या पाच जिल्ह्यांतील प्रत्येकी एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि धुळे या जिल्ह्यांत तुलनेने कमी शेतकरी पात्र ठरले आहेत. याशिवाय, २०१९ मधील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे सुमारे चार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असून, एकूण खर्च सुमारे ४० हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली होती. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ३२ हजार ७३४ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ बुलढाणा (१,१६,४३६), जालना (१,०७,५०५) आणि यवतमाळ (१,०१,४७०) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्याही एक लाखांहून अधिक असल्याचे विभागीय आकडेवारीत नमूद आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पात्र कर्जदारांची संख्या तुलनेने कमी आहे. सिंधुदुर्गमध्ये केवळ ३,७०८, रायगडमध्ये ७,५४४, रत्नागिरीत ७,०७८ आणि ठाण्यात १०,९६७ शेतकरी पात्र ठरले आहेत.

Shetkari Karj Mafi Government Resolution – GR 2026 PDF

कोणत्याही सरकारी योजनेसाठी, विशेषतः कर्जमाफी 2026 महाराष्ट्र GR, ‘शासन निर्णय’ (Government Resolution – GR PDF) हा सर्वात महत्त्वाचा आणि अधिकृत दस्तऐवज असतो. हा GR योजनेची कायदेशीर वैधता, अंमलबजावणीचे नियम, पात्रता निकष, लाभाची रक्कम आणि प्रक्रिया यासारख्या सर्व बाबी स्पष्ट करतो. karjmafi gr 2026 pdf मध्येच योजनेची प्रत्येक अट आणि तपशील नमूद केलेला असतो. त्यामुळे, योजनेची अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी GR वाचणे अत्यंत आवश्यक आहे. या GR मध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कोणत्या बँकांमधील कर्जे विचारात घेतली जातील, कोणत्या प्रकारची कर्जे माफ केली जातील, अर्ज करण्याची किंवा लाभ मिळवण्याची अंतिम मुदत काय असेल, आणि प्रोत्साहनपर अनुदानाची नेमकी प्रक्रिया काय असेल, या सर्व गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या जातात.

थकीत कर्जातील सरकारी वाटा नेमका किती असणार आहे?

  • १ वर्षापर्यंत थकीत कर्ज: सरकारचा वाटा ८५, बँक १५.
  • २ वर्षे थकीत कर्ज : सरकारचा वाटा ७०, बँक ३०.
  • ३ वर्षे थकीत कर्ज : सरकारचा वाटा ५५, बँक ४५.
  • ४ वर्षे थकीत कर्ज : सरकारचा वाटा ४५, बँक ५५.
  • ४ वर्षांपेक्षा जास्त थकीत कर्ज : सरकारचा वाटा ३५, बँक ६५.

जिल्हानिहाय पात्र शेतकरी (निवडक)

जिल्हा – पात्र शेतकरी

Advertisement
  • अहिल्यानगर १,३२,७३४
  • बुलढाणा १,१६,४३६
  • जालना १,०७,५०५
  • यवतमाळ १,०१,४७०
  • बीड ९९,६३१
  • नांदेड ९९,०५४
  • परभणी ७९,८५५
  • अमरावती ७६,९७८
  • जळगाव ६५,३४३
  • पुणे ६४,६६४
  • लातूर ५४,६७१
  • वर्धा ५४,१०७
  • वाशिम ५४,१०७
  • अकोला ४९,२५०
  • धाराशिव ४७,८८६
  • हिंगोली ४४,२१३
  • चंद्रपूर ४३,९६८
  • सांगली ३८,४४०
  • नंदुरबार ३५,८९०
  • सातारा ३१,५५६
  • धुळे २९,०१२
  • कोल्हापूर २७,११०
  • सोलापूर २६,२५३
  • नागपूर २४,३३२
  • भंडारा २२,३६५
  • गोंदिया २१,६१६
  • ठाणे १०,९६७
  • पालघर १०,४८४
  • रायगड ७,५४४
  • रत्नागिरी ७,०७८
  • गडचिरोली ६,४२३
  • सिंधुदुर्ग ३,७०८