शिक्षकेतर भरती प्रक्रियेची पडताळणी करूनच निर्णय होणार! – School Non Teaching Staff Recruitment
School Non Teaching Staff Recruitment
राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरती संदर्भातील सुरू असलेल्या प्रक्रियेची संपूर्ण पडताळणी करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच बदलत्या शैक्षणिक व प्रशासकीय गरजांनुसार सेवा नियम सुधारित करून भविष्यातील भरती प्रक्रिया नव्या निकषांनुसार राबविण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षकेतर पदांच्या भरतीसंदर्भात अखेर सरकारने स्पष्ट निकष जाहीर केल्याने दीर्घकाळ रखडलेली भरती प्रक्रिया आता वेग घेण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या महत्त्वाच्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता निश्चित करत सुधारित नियम जाहीर करण्यात आले आहेत. निकष जाहीर झाले असले, तरी अद्याप भरती प्रक्रियेचे वेळापत्रक किंवा त्याबाबतच्या सूचना न झाल्याने संस्थाचालकांची प्रतीक्षा कायम आहे.
शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुधारित नियमांनुसार, महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये बदल करत शिक्षकेतर पदांसाठी सुस्पष्ट अर्हता निश्चित करण्यात आली. यामध्ये कनिष्ठ लिपिकापासून ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यकांपर्यंत विविध पदांसाठी आवश्यक शिक्षण, टंकलेखन कौशल्य, तसेच पदोन्नतीची पद्धत नमूद करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक वर्षे भरती प्रक्रियेतील अस्पष्टता आणि कायदेशीर अडचणींमुळे हजारो पदे रिक्त राहिली होती. आता नव्या नियमांमुळे भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शाळांच्या दैनंदिन प्रशासनावरचा ताण कमी होणार आहे. दरम्यान, संस्थाचालकांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारने केवळ निकष जाहीर न करता प्रत्यक्ष भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
पदनिहाय निकष
कनिष्ठ लिपिक
–
कोणत्याही शाखेतील पदवी. मराठी (३० शब्द प्रतिमिनिट) किंवा इंग्रजी (४० शब्द प्रतिमिनिट) टंकलेखन प्रमाणपत्र
वरिष्ठ किंवा प्रमुख लिपिक –
कनिष्ठ अथवा वरिष्ठ लिपिक पदावर किमान तीन वर्षे सेवा. ज्येष्ठता व गुणवत्ता यांचा विचार
ग्रंथपाल
–
ग्रंथालय विज्ञानातील पदवी किंवा पदविका आणि कोणत्याही शाखेची पदवी प्रयोगशाळा सहाय्यक – विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण
शिपाई –
किमान बारावी उत्तीर्ण
School Non Teaching Staff Recruitment – मित्रांनो, एक मोठी बातमी समोर येत आहे. नवीन माहिती नुसार महाराष्ट्र राज्य सरकारने मेगाभरतीची घोषणा केली आहे. यामध्ये विविध शासकीय विभागातील पदांची भरती होणार आहे. राज्यातील शिक्षक भरतीचा मार्गही मोकळा झाल्याने शिक्षण विभागातील १७,५०० पदांसाठी जाहिरात येणार असल्याची माहिती आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मुहूर्त मिळाला असून त्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रशासकीय कामकाजास दिलासा मिळाल्यामुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. शाळांमध्ये २००५ नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. पूर्वी या पदांबाबत माजी शिक्षण संचालक चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. राज्यभरात १ लाख १५ हजार विविध पदे भरली जाणार लिपिक, ग्रंथपाल तसेच प्रयोगशाळा सहायक अशी विविध पदे भरली जाणार आहेत. त्यानुसार कनिष्ठ लिपिक १७ हजार ६९५ पदे, वरिष्ठ लिपिक चार हजार ९१२ पदे, मुख्य लिपिकांची ९२३ पदे, ग्रंथपालांची दोन हजार ११८ पदे भरली जाण्याची शक्यता आहे. तसेच नववी ते दहावी स्तरासाठी चार हजार ६८५ व उच्च माध्यमिक स्तरासाठी दोन हजार ४० प्रयोगशाळा सहायक पदे निर्माण केली जाणार आहेत.
पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला. पुन्हा नव्याने आढावा घेण्याच्या निमित्ताने ही पदे प्रसिद्ध केले असून लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक पदासाठीची शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे. कनिष्ठ लिपिक नाहीत. शासनाने नुकतेच राजपत्र पदासाठी शासनमान्य विद्यापीठाची शिक्षकेतर पदांची भरती, शिक्षकेतर आजपर्यंत भरली गेली शाळांना मिळणार कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक असणार आहे; तर वरिष्ठ व मुख्य लिपिक पदे पदोन्नतीच्या आधारे भरली जाणार आहेत. त्यासाठी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असणार आहे. या निर्णयामुळे शाळा प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे. चतुर्थ श्रेणी शिपाई सेवकपद रद्द केल्याने शाळांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुला-मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काम करणारा काका, मामा, मावशी म्हणणारा घटक शाळेत भविष्यात राहिला नाही तर ही धोक्याची घंटा ठरणार आहे.
आता ही भरती पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार असल्याने, शाळांमधील व्यवस्थापनाला मोठा आधार मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या शिक्षकांवर टाकण्यात येणाऱ्या शिक्षकेतर जबाबदाऱ्या देखील कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय मंजूर झालंय?
राज्य सरकारने खासगी अनुदानित शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात सुधारित आकृतीबंध (Revised Staffing Pattern) लागू केला आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:
- कनिष्ठ लिपिक
- वरिष्ठ लिपिक
- मुख्य लिपिक
- पूर्णवेळ ग्रंथपाल
- प्रयोगशाळा सहाय्यक
या सर्व पदांवर “१०० टक्के नामनिर्देश” (Nomination-Based Recruitment) पद्धतीने भरती केली जाणार आहे. अनुपात तत्त्वानुसार ही पदं वितरित करण्यात येणार असल्यामुळे योग्य संस्थांना त्यांचा हिस्सा मिळेल आणि पारदर्शकतेला चालना मिळेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
काय मंजूर झालंय?
राज्य सरकारने खासगी अनुदानित शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात सुधारित आकृतीबंध (Revised Staffing Pattern) लागू केला आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे: