Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर! शिक्षण विभागाचे परिपत्रक प्रकाशित! – School Diwali Vacation Schdule 2026
Last Updated:

दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर! शिक्षण विभागाचे परिपत्रक प्रकाशित! – School Diwali Vacation Schdule 2026

School Diwali Vacation Schedule 2026 – शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची दीर्घ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ पासून दुसरे सत्र सुरू होईल. माध्यमिक शाळा संहितेनुसार वर्षभरात ७६ दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या न देण्याचे आणि किमान २३० कामाचे दिवस पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्राबाबत आणि विविध सुट्ट्यांबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीची दीर्घ सुट्टी २ नोव्हेंबर २०२६ पासून मिळणार असून, सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. चला तर या वेळापत्रकाबाबदल तपशीलवार माहिती बघूया!!

School Diwali Vacation Schdule 2026

माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सत्रांची रचना स्पष्ट करण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र हे सोमवार, १५ जून २०२६ पासून सुरू झाले असून ते शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहील. विद्यार्थी व शिक्षकांसाठी दिवाळीची सुट्टी सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहील. या कालावधीत दिवाळी सणाचे विविध दिवस जसे की धनत्रयोदशी (६ नोव्हेंबर), दिवाळी पाडवा/बलिप्रतिपदा (१० नोव्हेंबर) आणि भाऊबीज (११ नोव्हेंबर) या सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

Advertisement

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होतील आणि येथून द्वितीय सत्राला सुरुवात होईल. द्वितीय सत्र हे १६ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार, १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर सोमवार, ३ मे २०२७ ते सोमवार, १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी राहील. माध्यमिक शाळा संहितेनुसार संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.