पुढील वर्षी पडणार विविध सरकारी विभागात नोकऱ्यांचा पाऊस, जाणून घ्या पूर्ण माहिती! – Sarkari Naukari 2027 Recruitments
Sarkari Naukari 2027 Recruitments – राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी असून, महाराष्ट्र शासनाकडून आगामी काळात विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणावर नवीन नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच यात केंद्र सरकार सुद्धा मागे नाही, पुढील वर्षी साठी केंद्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे. या भरती कोणत्या आहे या बसल पूर्ण माहिती आपण बघूया. गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या आणि फेरबदलांच्या टप्प्यात असलेल्या या भरती मोहिमेमुळे राज्यभरातील लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय पातळीवर प्रशासनिक यंत्रणा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, विविध विभागांमधील कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपातील नेमणुकांपेक्षा सरळसेवा व एमपीएससीमार्फत (MPSC) स्थायी व भरभक्कम पदांची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, गृह विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास, शिक्षण तसेच कृषी आणि सार्वजनिक आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांची वर्गवारी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विशेषतः पोलीस दल, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक-टंकलेखक तसेच शालेय व उच्च शिक्षण विभागातील शिक्षकांच्या हजारो जागांसाठीचे सुधारित वेळापत्रक लवकरच अधिकृतपणे जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही परीक्षांमधील त्रुटी दूर करून पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय ‘टास्क फोर्स’ व सुधारित मार्गदर्शक तत्त्वांची आखणी केली असून, ‘वन टाईम रजिस्ट्रेशन’ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना होणाऱ्या मनस्तापातूनही मुक्ति मिळणार आहे. त्यामुळे आता शासकीय सेवेत अधिकारी किंवा कर्मचारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र कसून अभ्यास करणाऱ्या राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील तरुण-तरुणींनी कोणतीही अफवा किंवा संभ्रमात न पडता आपल्या अभ्यासाची तयारी अधिक तीव्र करावी, कारण ही आगामी मेगाभरती राज्यातील युवकांसाठी सुवर्णसंधी ठरणार यात शंका नाही.
तसेच प्राप्त माहिती नुसार, देशातील कंपन्यांच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता असल्याने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये संघटित क्षेत्रातील रोजगारनिर्मितीला पुन्हा गती मिळू शकते. त्याचबरोबर वाहन उद्योग, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि पर्यटन क्षेत्रातील मागणी सर्वसाधारण बाजारपेठेच्या तुलनेत अधिक वाढण्याचा अंदाज आहे. जेफरीज या वित्तीय सेवा संस्थेने आपल्या संशोधन अहवालात हा निष्कर्ष व्यक्त केला आहे. देशातील सुमारे २,२०० सूचिबद्ध कंपन्यांमधील १ कोटी ४ लाख कर्मचाऱ्यांच्या आकडेवारीच्या विश्लेषणावर हा अहवाल आधारित आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संघटित क्षेत्रातील रोजगारनिर्मितीचा वेग मंदावला होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. रोजगार आणि ग्राहकांच्या खर्चातील संभाव्य वाढीसमोर काही आव्हानेही आहेत. कमकुवत मान्सूनमुळे ग्रामीण भागातील उत्पन्न आणि मागणीवर परिणाम होऊ शकतो. तसेच वस्तू व सेवा करातील (जीएसटी) कपातीमुळे मिळालेली सुरुवातीची चालना कमी झाल्यास बाजारातील मागणीवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात रोजगारनिर्मिती आणि ग्राहकांच्या खर्चातील वाढ ही प्रामुख्याने कंपन्यांच्या महसुलातील सुधारणा, ग्रामीण मागणीची स्थिती आणि आर्थिक धोरणांच्या परिणामांवर अवलंबून राहणार आहे.
आठव्या वेतन आयोगामुळे खर्चाला चालना?
- आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आर्थिक वर्ष २०२८ च्या उत्तरार्धात अपेक्षित आहे. त्यातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारपेठेतील मागणी वाढण्यास आणि ग्राहकांच्या खर्चाला चालना मिळण्यास मदत होऊ शकते, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः वाहन खरेदी, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ग्राहकांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रांची कामगिरी एकूण उपभोगाच्या तुलनेत अधिक चांगली राहू शकते.
- वित्तीय सेवा क्षेत्रात सर्वाधिक कर्मचारी सूचिबद्ध कंपन्यांमध्ये वित्तीय सेवा क्षेत्राचा रोजगारातील वाटा सर्वाधिक आहे. या क्षेत्रात एकूण संख्येच्या सुमारे २८ टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या तुलनेत वित्तीय सेवा क्षेत्रातील कर्मचारी संख्या ५० टक्क्यांनी अधिक आहे. तथापि, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वित्तीय सेवा क्षेत्रातील रोजगारवाढ १.७ टक्क्यांपर्यंत घसरली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारवाढही मंद राहिली.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संघटित क्षेत्रातील रोजगारवाढ वार्षिक तुलनेत केवळ १.८ टक्क्यांवर आली. गेल्या पाच वर्षांतील हा नीचांक असल्याचे जेफरीजने म्हटले आहे. विशेषतः वित्तीय सेवा क्षेत्रातील नोकरभरती मंदावल्याचा परिणाम एकूण रोजगारवाढीवर झाला. मात्र, आगामी आर्थिक वर्षात कंपन्यांच्या महसुलात वाढ झाल्यास नोकरभरतीतही सुधारणा होऊ शकते. ज्या वित्तीय क्षेत्राबाहेरील कंपन्यांच्या महसुलात २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली, त्यांच्या कर्मचारीसंख्येत ९.१ टक्क्यांनी वाढ झाली. याउलट, महसुलात १० ते २० टक्के वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांमध्ये कर्मचारीसंख्येची वाढ ४.४ टक्के राहिली. यावरून कंपन्यांची आर्थिक कामगिरी आणि रोजगारनिर्मिती यांचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट होते.