सांगली DCC बँकेच्या ४४४ लिपिक पदभरतीसाठी १९ हजार अर्ज,आता लेखी परीक्षेचे वेळापत्रक… – Sangli Urban Bank Admit card download
Sangli Urban Bank Hall Ticket, Call Latter 2026 Download Print Online – सांगली DCC बँक भरती संदर्भात एक महत्वाचा नवीन अँड आम्ही समोर घेऊन घेऊन आलो आहे (Sangli DCC Bank Call Letter Download). जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४४४ लिपिक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपेपर्यंत, म्हणजेच १० जुलै २०२६ पर्यंत तब्बल १९ हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले नव्हते. आता अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, परीक्षेच्या तारखेची घोषणा कधी होणार याकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या लिपिक भरतीची संपूर्ण प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. बँकेने २४ जूनपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. या भरतीत एकूण ४४४ पदांपैकी ७० टक्के जागा सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी, तर उर्वरित ३० टक्के जागा इतर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आता या भरती साठी लेखी परीक्षा लवकरच होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक आणि अन्य महत्वाची माहिती बघूया. तसेच या परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या महाभरतीच्या या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या परीक्षेस उपयुक्त सराव पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहे.
तर मित्रांनो, सांगली DCC बँक भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यात IBPS कडून सर्व अर्जांची सविस्तर छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटींची पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी निश्चित केली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून प्रवेशपत्र (Sangli DCC Bank Admit Card, Hall Ticket Download Link) उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भरतीसाठीची लेखी परीक्षा सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अकोला आणि बीड या सहा जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतील उमेदवारांना परीक्षेसाठी या केंद्रांवर जावे लागणार आहे.
भरती प्रक्रिया सुरू असतानाच आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी भरती प्रक्रियेतील काही बाबींवर आक्षेप घेत शासनाकडे ती स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने काही काळासाठी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र, या निर्णयाविरोधात जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय दिल्यानंतर अर्ज प्रक्रिया पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली. अर्ज दाखल करण्याची मूळ अंतिम मुदत ८ जुलै होती. मात्र, स्थगितीमुळे काही उमेदवारांना अर्ज करता न आल्याने बँकेने दोन दिवसांची मुदतवाढ देत अंतिम तारीख १० जुलै निश्चित केली. या मुदतवाढीचा लाभ घेत मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्जांची संख्या तब्बल १९ हजारांवर पोहोचली असून, प्रत्येक एका जागेसाठी सरासरी ४३ हून अधिक उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.