Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » सांगली DCC बँक प्रवेशपत्र लिंक, परीक्षा ३१ ऑगस्टला होणार! – Sangli DCC Bank Hall Ticket Download
Last Updated:

सांगली DCC बँक प्रवेशपत्र लिंक, परीक्षा ३१ ऑगस्टला होणार! – Sangli DCC Bank Hall Ticket Download

Sangli DCC Bank Hall Ticket Download – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीसाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून येत्या ३१ ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तब्बल १९ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या सहा जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या आठ दिवस आधी उमेदवारांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी ‘IBPS’ कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. २४ जूनपासून अर्ज मागवण्यात आले होते, मात्र मध्यंतरी राज्य शासनाने या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. याविरोधात बँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली असता, न्यायालयाने या भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली. त्यानंतर बँकेने अर्ज करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदतीत विक्रमी अर्ज प्राप्त झाले. अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर महिनाभर परीक्षेची तारीख जाहीर झाली नव्हती. बँकेच्या संचालक मंडळाचे ऑगस्टच्या पंधरवड्यात भरती पूर्ण करण्याचे नियोजन होते, परंतु अर्जदारांची संख्या मोठी असल्याने IBPS ला नियोजनासाठी काहीसा वेळ लागला. अखेर कंपनीने ३१ ऑगस्ट ही परीक्षेची तारीख निश्चित केली आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने गेल्या महिन्याभरापासून तयारी करणाऱ्या उमेदवारांची उत्सुकता संपली असून त्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच सांगली DCC बँक ज्युनिअर असिस्टंट परीक्षा २०२६: फ्री ऑनलाईन मॉक टेस्ट सिरीज या लिंक वर उपलब्ध आहे आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२६ चा अधिकृत अभ्यासक्रम या लिंक वरून आपण बघू शकता.

The Sangli District Central Co-operative Bank (Sangli DCC Bank) has announced that the written examination for 444 Junior Clerk positions will be conducted on August 31st via IBPS. The Sangli DCC Bank Hall Ticket Download link will be active soon for downloading & printing hall tickets for exam.  Over 19,000 candidates have applied for this recruitment drive, which initially faced temporary state government restrictions before being cleared by the Kolhapur Circuit Bench of the High Court. Exam centers have been scheduled across six key districts: Sangli, Kolhapur, Satara, Pune, Akola, and Beed. Candidates will be able to download their admit cards directly from the official IBPS portal eight days prior to the examination date.

Advertisement

Sangli DCC Bank Admit Card Download 2026

  • परीक्षा दिनांक: ३१ ऑगस्ट

  • हॉल तिकीट (Hall Ticket): परीक्षेच्या ८ दिवस आधी उपलब्ध (आयबीपीएस पोर्टलवरून)

  • एकूण अर्ज: १९,०००+ उमेदवार

    Advertisement
  • परीक्षा केंद्र: सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड