समाज कल्याण विभाग भरतीचा नवीन आकृतिबंध, नवीन अपडेट जाहीर! | Samaj Kalyan Vibhag Recruitment 2026
Samaj Kalyan Vibhag Bharti 2026
समाज कल्याण विभागाचा सरकारकडून परत आलेला आकृतीबंध समाज कल्याण निरीक्षक व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक संवर्गाच्या अपेक्षांनुसार नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संवर्गाच्या मागण्यांचा समावेश करून सुधारित आकृतीबंध तातडीने सरकारला सादर करावा, अशी मागणी समाज कल्याण कर्मचारी संघटनेने समाज कल्याण आयुक्तांकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष शांताराम शिंदे यांनी महिन्याभरापूर्वी दिलेल्या निवेदनात संवर्गाच्या जबाबदाऱ्यांशी सुसंगत वेतनश्रेणी व पदाचा दर्जा निश्चित करावा, योग्य पदसोपान व पदोन्नतीच्या संधी निर्माण कराव्यात, तसेच विभागीय स्पर्धा परीक्षा व सेवा प्रवेशाबाबत आवश्यक तरतुदी कराव्यात, अशी मागणी केली आहे. सुधारित आकृतीबंध तातडीने अंतिम करून सरकारकडे सादर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. समाज कल्याण निरीक्षकांवर विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, प्रस्तावांची छाननी, विभागीय पाहणी, वसतिगृह व योजनांचे निरीक्षण तसेच प्रशासकीय जबाबदाऱ्या सोपवल्या जातात.
‘एमपीएससी’कडून २०२३ मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागातील २६ सहाय्यक संचालक तर सामाजिक न्याय विभागातील १४० सहाय्यक आयुक्त पदासाठी जाहिरात देण्यात आली. दरम्यानच्या काळात मराठा आरक्षण लागू झाल्याने या दोन्ही पदाच्या आरक्षणात बदल झाल्याने भरती प्रक्रियेला विलंब झाला. त्यानंतर दोन्ही विभागातील पदे समकक्ष आणि शैक्षणिक पात्रता एकच असल्याने २५ डिसेंबर २०२४ ला दोन्ही पदांसाठी एकत्र परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर दोन्ही पदांसाठी मुलाखती झाल्यावर सुरुवातीला सामाजिक न्याय आणि त्यानंतरही बहुजन कल्याण विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य लोकसेवा आयोगाने १० एप्रिलला शासनाकडे शिफारस केली. सामाजिक न्याय विभागातील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती दिली. मात्र, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यांपासून नियुक्त्या रखडल्या आहेत.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2026 : Samaj Kalyan Vibhag Recruitment notification has published for “Computer Operator” posts. There are 02 vacant post available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents on the 17th April 2026. For Samaj Kalyan Vibhag Bharti 2026. More details are as follows:-
समाज कल्याण विभाग मुंबई अंतर्गत “संगणक ऑपरेटर” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी समाज कल्याण विभाग मुंबई भरती २०२६ मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 एप्रिल 2026 आहे.
समाज कल्याण विभाग मुंबई भरती २०२६
- पदाचे नाव – संगणक ऑपरेटर.
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर बी विंग पहिला माळा रु. नं. १०१.
- मुलाखतीची तारीख – 17 एप्रिल 2026
- अधिकृत वेबसाईट – https://sjsa.maharashtra.gov.in/en
Samaj Kalyan Vibhag Pune Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| संगणक ऑपरेटर | 02 |
How To Apply For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2026
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता उपस्थित राहावे
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 17 एप्रिल 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www. sjsa.maharashtra.gov.in Pune 2026 |
|
| 💳 PDF जाहिरात | https://freeshort.info/Pa0esR |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://sjsa.maharashtra.gov.in/en |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
संगणक ऑपरेटर.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण कुठे आहे?
मुंबई
निवड प्रक्रिया काय आहे?
मुलाखती
पदसंख्या किती आहे?
02 जागा