महिला व बाल विकास विभागात ८ हजार ६६९ पदांसाठी भरती सुरु होणार; जाणून घ्या निवड प्रक्रिया! – Mahila Balvikas vibhag Bharti 2026
Mahila Balvikas vibhag Bharti 2026 – As per the Latest Updates WCD Maharashtra Bharti 2026 is starting soon for large number of vacancies. ICDS Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra (Women & Child Development Department Maharashtra) announces new Recruitment to FullFill the Vacancies For the posts “Various posts Like Sevika / Supervisor Group-C” unde this bharti process. Large Number of vacancies will be filled under this recruitment drive of WCD Maharashtra . So now, Eligible candidates are directed to submit their application Offline through www.maharashtra.gov.in this Website. Total More Than 8 Thousand Vacant Posts have been announced by Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra (WCD Maharashtra) Recruitment Board, Mumbai in the advertisement April 2025. After a gap of 23 years, a staggering 8,669 regular posts are set to be filled within the Department of Women and Child Development. Women and Child Development Minister Aditi Tatkare stated that this decision will provide a significant boost to the department’s empowerment. A comprehensive review of the total posts within the department was conducted. Consequently, while certain posts were abolished (cancelled), 165 new posts were added. As a result, a total of 8,669 regular posts have been sanctioned for the department. Furthermore, approval has been granted to fill 2,843 posts through external agencies to support the department’s operations. Under the Integrated Child Development Services (ICDS) scheme, a total of 221,328 honorarium-based posts—comprising 110,664 Anganwadi Workers and 110,664 Anganwadi Helpers—have also been sanctioned. Minister Aditi Tatkare remarked that this pivotal decision, taken after 23 years, will prove immensely beneficial for strengthening the department. She added that this initiative will ensure the more effective implementation of women and child welfare schemes. Recruitment for various posts within the Government of Maharashtra’s Department of Women and Child Development is set to be announced shortly. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding WCD Maharashtra Recruitments will be published on time to time on MahaBharti.
महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत. २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. या भरतीत अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व कार्यपध्दती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित), बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) गट-ब या पदांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी wcd.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
पदांची माहिती आणि वेतन
पदे: अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपद्धती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)
संवर्ग: गट-ब (राजपत्रित)
वेतन: पगार मॅट्रिक्स ९-१५, 41,800-1,32,300 + महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते
नियुक्तीचे ठिकाण: महाराष्ट्र राज्यातील कुठेही
परीक्षा प्रक्रिया
लेखी परीक्षा: ४०० गुण
मुलाखत: ५० गुण
अंतिम निवड: लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार
पात्रता अटी
महिला व बाल विकास विभाग किंवा ग्रामविकास विभागातील संबंधित संवर्गातील कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याची पात्रता आहे.
अर्ज करण्यासाठी 01 जानेवारी रोजी सादर केलेल्या पदावर सलग सात वर्षे नियमित सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे.
संगणक प्रमाणपत्र तसेच मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शुल्क
सामान्य प्रवर्ग: 719
मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: 449
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासन आदेशानुसार सवलत
परीक्षा योजना
पेपर १: सामान्य ज्ञान, शासनाशी संबंधित कायदे, संस्था, विभागीय ज्ञान – २०० गुण, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पेपर २: पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान – २०० गुण, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
मुलाखत: ५० गुण
परीक्षा केंद्र: फक्त नवी मुंबई
निकाल आणि मूल्यांकन
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपरमध्ये चुकीच्या उत्तरावर २५% नकारात्मक गुण वजा
एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रमानुसार यादी तयार
समान गुण असलेल्या उमेदवारांसाठी आयोगाच्या नियमांनुसार प्राधान्यक्रम ठरवला जाईल
शिफारस व प्रमाणपत्र पडताळणी
लेखी परीक्षा व मुलाखतीच्या निकालानंतर शिफारस पात्र उमेदवारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
पात्र उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी संबंधित विभागाकडून आयोजित केली जाईल
Mahila Balvikas vibhag Bharti 2026 Details
- पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षिका
- एकूण रिक्त पदे – ४०,०००
- वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
- पदवी – ( राज्यानुसार बदलेल)
- अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन/ ऑफलाईन
- पगार – ८,००० ते १८,०००
- निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)
अधिकृत संकेतस्थळ – www.wcd.nic.in अथवा https://wcdcommpune.comया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.
अन्य जिल्ह्यांच्या भरती लिंक
-
12वी उत्तीर्णांना संधी – अहमदनगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाकरिता भरती;अशी होणार भरती – जाणून घ्या!!
-
12 वी उत्तीर्णांना संधी!! अमरावती जिल्ह्यात ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांच्या 50 जागांसाठी नवीन भरती सुरु
- नाशिक अंगणवाडी अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिलांना नोकरीची संधी; 15 पदांची भरती; त्वरित अर्ज करा !!
-
12 वी उत्तीर्णांना उत्तम संधी – अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज सुरु!!
- 12वी उत्तीर्णांना संधी – नागपूर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाकरिता भरती;अशी होणार भरती – जाणून घ्या!!
-
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती
परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत संगणकीकृत बहुपर्यायी स्वरूपात होणार असून, बायोमेट्रिक, आय स्कॅनिंग आणि फेस रिडींग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि सिग्नल जॅमर बसविण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक केंद्रावर पर्यवेक्षक आणि निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि गैरमार्गाने नोकरी किंवा परीक्षा पास करण्याचे आमिष दाखवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे. अधिक माहितीसाठी महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे येथे संपर्क साधावा किंवा 020-26333812 या क्रमांकावर फोन करावा. इच्छुक उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी शुभेच्छा!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
अंगणवाडी पर्यवेक्षिका
वयोमर्यादा किती आहे?
१८ ते ४५ वर्ष
निवड प्रक्रिया काय आहे?
गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)