Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » ४ थी पास उमेदवारांना पुणे महानगर पालिकेत सरळ नोकरीची संधी – Pune Mahanagar Palika Interviews
Last Updated:

४ थी पास उमेदवारांना पुणे महानगर पालिकेत सरळ नोकरीची संधी – Pune Mahanagar Palika Interviews

Pune Mahanagar Palika Interviews  – पुण्यात नोकरी शोधत आहात? शिक्षण पण कमी आहे? काळजी करू नका, पुण्यात एक सरकारी नोकरीची मस्त संधी चालून आली आहे. चला या बद्दल पूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया समजून घेऊया!! मित्रांनी,  PMC म्हणजेच पुणे महानगर पालिकेत पगार पण मस्त राहणार आहे. चला तर जाणून घेऊया पूर्ण माहिती! पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या कामांना गती देण्यासाठी आणि शहरातील स्वच्छता व इतर संबंधित व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी “मुलाणी (सफाईसेवक)” या पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतींद्वारे आणि ऑफलाइन पद्धतीने राबवली जात असून, पुणे परिसरात सरकारी किंवा महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणेत काम करण्याची ही एक चांगली संधी उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण पुणे हेच असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ www.pmc.gov.in ला भेट देऊन भरती संदर्भातील सविस्तर माहिती तपासून घ्यावी किंवा आम्ही खाली सुद्धा PDF आणि अर्जाचा नमुना दिला आहे. मित्रांनो,  या पदासाठी निवडल्या गेलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा एकूण २३,७८२/- रुपये एवढे निश्चित वेतन किंवा मानधन दिले जाणार आहे.

Pune Mahanagar Palika Interviews

या PMC च्या नवीन भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रतेचे निकष अतिशय सुटसुटीत ठेवण्यात आले असून, उमेदवार किमान इयत्ता ४ थी (चौथी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक पात्रतेसह उमेदवाराकडे आवश्यक तो शारीरिक अनुभव आणि कामाची आवड असणे गरजेचे आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर, अर्ज करणाऱ्या खुल्या वर्गातील (Open Category) उमेदवारांचे वय जाहिरातीच्या दिनांकास ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर, मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत ०५ वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे, म्हणजेच मागासवर्गीय उमेदवार ४३ वर्षांपर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात. तस अधिक महती साठी आपण दिलेली PDF जाहिराती वाचावी.  उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि इतर अटींची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यावी. या पदासाठी नियुक्त होणाऱ्या सेवकांना पुणे महानगरपालिकेच्या कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) या ठिकाणी आपले कर्तव्य बजावावे लागणार आहे. कामाचे नेमके स्वरूप, वेळ आणि जबाबदाऱ्या ठरविण्याचे सर्व सर्वाधिकार मा. खातेप्रमुख यांच्याकडे सुरक्षित राहतील. त्यामुळे या कामाची पूर्वकल्पना घेऊनच उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घ्यावा, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण किंवा गैरसमज निर्माण होणार नाही. आणि हो अर्ज प्रक्रिया पण सोपीच आहे!!

मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपल्या सोबत सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे मूळ दाखले (Original Documents) आणणे बंधनकारक आहे. यासोबतच उमेदवारांनी स्वतःचा एक अद्ययावत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सर्व मूळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतींचा (Attested Xerox Copies) एक पूर्ण संच सोबत सादर करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता किंवा खर्च महानगरपालिकेकडून दिला जाणार नाही, उमेदवारांना स्व-खर्चाने हजर राहावे लागेल. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा नियुक्तीनंतर जर उमेदवार अपात्र आढळला, त्याने गैरवर्तन केले अथवा दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची उमेदवारी त्वरित रद्द केली जाईल. तसेच, निवड झालेल्या उमेदवारास प्रत्यक्ष सेवेत रुजू होण्यापूर्वी एक महिन्याचे मानधन अनामत रक्कम (Security Deposit) म्हणून जमा करावे लागेल , ज्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. उमेदवारास नियुक्ती देण्याबाबतचे आणि अपात्र उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार न करण्याचे सर्व अधिकार मा. खातेप्रमुख यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून आणि अटी मान्य करूनच उमेदवारांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे. तथापि, उमेदवारांनी एक गोष्ट विशेष लक्षात घेतली पाहिजे की, ही पदे तात्पुरत्या (अस्थायी) स्वरूपाची आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला विहित नमुन्यात करारनामा करून सुरवातीला ०६ महिन्यांच्या कालावधीसाठीच नेमणूक दिली जाणार आहे. ही नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी व अस्थायी स्वरूपाची असल्यामुळे उमेदवारांना भविष्यात या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती मिळवण्याचा किंवा सेवेत सामावून घेण्याचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही, याची स्पष्ट नोंद जाहीर करण्यात आली आहे. तरी या नंतर सुद्धा एक्सटेंशन मिळण्याचे चान्सेस सुद्धा असतातच हे पण खरं आहे.

पुणे महानगरपालिकेच्या या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या (PMC Bharti Direct Interviews) माध्यमातून केली जाणार असून, यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह थेट निश्चित केलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीसाठी आणि नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ जुलै २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी दि. ०७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या दिलेल्या अधिकृत पत्त्यावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे . उमेदवारांनी एक गोष्ट अत्यंत गांभीर्याने लक्षात ठेवली पाहिजे की, मुलाखतीच्या नियोजित वेळेच्या किमान एक तास आधी, म्हणजेच सकाळी १०.०० वाजता तेथे पोहोचून आपली अधिकृत नोंदणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. निश्चित केलेल्या वेळेनंतर आलेल्या कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि त्यांना प्रक्रियेतून बाद केले जाईल. या भरतीसाठी लागणारा विहित नमुन्यातील अर्ज उमेदवारांना कार्यालयामार्फत त्याच ठिकाणी थेट उपलब्ध करून दिला जाईल, त्यामुळे उमेदवारांना आधीच कोणताही अर्ज विकत घेण्याची किंवा बाहेरून आणण्याची आवश्यकता भासणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/HSPU0lnOe
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmc.gov.in