महत्वाचे! राज्यातील सर्व विद्यालयातील प्राध्यापकांची भरती सुरु, लवकरच प्रक्रिया पूर्ण होणार! – Professors Bharti 2026
Professors Bharti 2026
महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदाच्या ६५९ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्ररकीय साठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहे. तसेच, डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच विद्यापीठांचे रँकिंग सुधारण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे.२,९०० शिक्षकेतर पदांना तत्त्वतः मंजुरी दिली असून निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यांची भरतीही सुरू करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. प्राध्यापक भरतीबाबतचा प्रश्न विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी २,९७३ प्राध्यापक पदांच्या भरतीला मंजुरी दिली होती. मात्र कोविड-१९ महामारीमुळे ही प्रक्रिया थांबली होती. नवीन सरकारच्या कार्यकाळात ही भरती पूर्ण केली असून त्यानंतर आता ५,०१२ नव्या पदांची भरती सुरू केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर आवश्यक बदलांचा समावेश करून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी रिक्त प्राध्यापक पदे तातडीने भरण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री म्हणाले.. जिल्हा परिषदांच्या शाळांमधील केंद्रप्रमुख भरती करिता परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम डाउनलोड करा .
विद्यार्थीसंख्येनुसार पदांचे वाटप
महाविद्यालयातील विद्यार्थीसंख्या, विषयनिहाय गरज आणि शासनाच्या निकषांनुसार प्रत्येक महाविद्यालयाला पदांचे वाटप करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने केली असून सर्व महाविद्यालयांना त्यांचे पदवाटप संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. महाविद्यालयांतील सुमारे २,९०० शिक्षकेतर पदांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मात्र अंतिम भरतीसाठी राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त जागां पैकी तब्बल ५०९२ प्राध्यापकांच्या जागा भरण्यास उच्चशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी डीएचई एनओसी हे विशेष पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती दिली. या पोर्टलमुळे महाविद्यालयांना आवश्यक असणारे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे सुलभ व पारदर्शक होणार आहे. पहिल्या टप्यात अनुदानित कॉलेजातील रिक्त जागांचा आढावा घेऊन, विभागीय सहसंचालकांनी कोणत्या विषयाच्या किती जागा भरायच्या, याला विषय निहाय मंजुरी दिली आहे. संबंधित शैक्षणिक संस्थांना त्यांच या महाविद्यालयाची बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्या महाविद्यालयांची बिंदुनामावली तपासून पूर्ण झाली आहे, त्यांना पद भरतीची जाहिरात काढण्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून या नवीन पोर्टलद्वारे ना-हरकत प्रमाणपत्र देणार आहे.
Advertisement
पोर्टलवर रिक्त जागा अन् माहिती
उच्च शिक्षण विभागाने विकसित केलेल्या या डीएचई एनओसी पोर्टलवर सर्व महाविद्यालयांत भरण्यात येणाऱ्या जागा आणि एकूण रिक्त जागांची विषयनिहाय माहिती नेहमी अपडेटेड असणार आहे. सध्या अल्पसंख्याक दर्जा असलेल्या संस्थांच्या महाविद्यालयांना या पोर्टलचा वापर करण्यासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Professors Bharti 2026
राज्यातील विविध विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली असून ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक यांची रिक्त पदेही भरावीत, या संदर्भातील परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांबरोबरच शिक्षण संस्थांना या दोन पदांची रोस्टर तपासणी करावी लागणार आहे. राज्य शासनाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील साडेपाच हजार प्राध्यापकांची पदे पुढील काळात भरली जाणार आहेत. 1 ऑक्टोबर 2025 च्या विद्यार्थी संख्येवर आधारित ही पदे भरली जातील. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना विषयनिहाय पदांचा तपशील कळविण्यात आला आहे. परिणामी आता महाविद्यालयाकडून रोस्टर तपासणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण होणे अपेक्षित आहे.
शासनाने सहाय्यक प्राध्यापक पदांबरोबरच ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदभरतीस मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या तिन्ही संवर्गाची एकत्रित बिंदू नामावली अर्थात रोस्टर तपासणी करून घ्यावी लागणार आहे. या तिन्ही संवर्गाच्या एकत्रित बिंदू नामावलीचे आरक्षण निश्चित करताना मागासवर्ग कक्षाकडून या तिन्ही संवर्गातील एकत्रित रिक्त पदांचे आरक्षण आणि प्रत्यक्ष भरावयास शासनाने मान्यता दिलेल्या पदांचे आरक्षण स्वतंत्ररीत्या दर्शविले जाते. प्रत्यक्षात भरावयाच्या पदांचे आरक्षण निश्चित करताना शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयाचा विचार प्रत्यक्ष भरावयाच्या पदांची बिंदू नामावली प्रमाणित करताना करणे आवश्यक आहे. पुणे विभागीय उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक या पदांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी मंजूर भरलेल्या व रिक्त असलेल्या ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे रोस्टर तपासणीत शैक्षणिक संस्थांना कोणतीही अडचण येणार नाही. बिंदू नामावली पूर्ण झाल्यानंतरच रिक्त जागांचा अधिकृत तपशील समोर येणार असून, त्यानुसार भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
प्राध्यापक भरती संदर्भात नवीन महत्वाचा अपडेट जाहीर झाला आहे. प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी साडेपाच हजार प्राध्यापकांची भरती मार्चअखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सप्टेंबर २०२५ मध्ये देण्यात आले होते. मात्र, आता ही भरती प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, त्यासंदर्भात विद्यापीठांना सूचना दिल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे, प्राध्यापक भरतीला ‘तारीख पे Deva jadhavar तारीख’ मिळत आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा विद्यापीठे, महाविद्यालयांच्या कामकाजाला फटका बसत आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीची मागणी राज्यातील पात्रताधारक उमेदवारांनी अनेकदा केली आहे, त्यासाठी आंदोलनेही झाली पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, “विद्यापीठे अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या २०-२५ वर्षांतील ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापक तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे भरण्यासही मंजुरी दिली आहे. प्राध्यापक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, अर्ज दाखल झाले आहेत, छाननीही झाली आहे. आता मुलाखती आणि नियुक्तीचा टप्पा बाकी आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये ५,५०० प्राध्यापक आणि २,९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी दिली.
उच्च शिक्षण सर्व विभागीय सहसंचालक यांच्याकडून प्राप्त आकडेवारीच्या संचालनालयाकडून आधारे अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील २०१७नंतरच्या प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या पदभरतीस मान्यता दिली आहे. यामध्ये राज्यातील १,१५४ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित असलेल्या पात्र उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शासनाकडे ३ नोव्हेंबर २०१८ मधील नमूद आकडेवारी व सादर विषयांकित प्रस्तावामधील आकडेवारीमध्ये तफावत आहे. त्यामुळे शासनाने अचूक आकडेवारी सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत. अनुदानित अशासकीय महाविद्यालयांतील एक ऑक्टोबर २०१७ रोजीच्या शिक्षक व शिक्षकेतर पदांचा आढावा शासनास सादर करण्यात आला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन निर्णय शिक्षकीय पदभरतीस मान्यता दिली. कोणत्या महाविद्यालयाला किती जागा भरायच्या, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वर्षे सीएचबीवर काम करणाऱ्या प्राध्यापकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.