Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » PMPML मध्ये मेगाभरती; ४ हजार कंत्राटी चालक-वाहक पदांची मोठी भरती होणार | PMPML Bharti 2026
Last Updated:

PMPML मध्ये मेगाभरती; ४ हजार कंत्राटी चालक-वाहक पदांची मोठी भरती होणार | PMPML Bharti 2026

PMPML Bharti 2026

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमीसमोर आली आहे. लवकरच पुण्यात नोकरीच्या मोठ्या संधी मिळणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात लवकरच १५०० नवीन बस दाखल होणार असून, या गाड्यांच्या नियोजनासाठी तातडीने २ हजार चालक आणि २ हजार वाहक अशी एकूण 4 हजार चालक-वाहक यांची कंत्राटी पद्धतीने मेगाभरती केली जाणार आहे. या भरतीसाठीची आवश्यक निविदा प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली असून, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी लवकरच अधिकृत एजन्सीची नियुक्त केली जाणार असल्याची माहिती आहे. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) मध्ये एकूण १५ हजार ५१९ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ७ हजार ४६८ पदे भरलेली असून, ८ हजार ५१ पदे रिक्त आहेत. त्यावर प्रशासनाकडून दिलेल्या महितीमधून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे एका बाजूला डबघाईला पीएमपीचा कारभार ठेकेदारांच्या खाद्यांवर असून, पीएमपीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. पीएमपीकडून दिलेल्या माहितीनुसार प्रशासन विभागात १ हजार ७९५ पैकी १ हजार १३५ पदे रिक्त असून, ६६० पदे भरलेली आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स PMPML मध्ये मेगाभरती; ४ हजार कंत्राटी चालक-वाहक पदांची मोठी भरती होणार | PMPML Bharti 2026

शहराचा वाढता विस्तार आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता सध्या अनेक मार्गावर बस अपुऱ्या पडत आहेत. हाच ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने चालू वर्षात १५०० नवीन गाड्या आणण्याचे नियोजन केले आहे. मात्र, गाड्या वाढवताना त्यांचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ४ हजार चालक वाहकांची भरती केली जाणार आहे. आणि ही भरती बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एजन्सीची नियुक्ती अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.  या भरतीमुळे पीएमपीच्या सेवेचा दर्जा तर सुधारेलच, शिवाय ४ हजार बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. नवीन चालक-वाहकांच्या नियुक्तीनंतर मार्गावरील बसेसच्या फेऱ्या वाढतील आणि प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


PMPML Bharti 2025

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय (पीएमपी) संचालकांची बदली होऊन सव्वा महिना झाला आहे; पण राज्य सरकारकडून या ठिकाणी नवीन कोणाची नियुक्ती झालेली नाही. तसेच, पीएमपी प्रशासनाकडून याचा पदभार दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे दिलेला नाही. त्यामुळे अनेक प्रशासकीय काम खोळंबण्याबरोबरच नियमभंग केल्यामुळे निलंबित केलेले कर्मचारी घरी बसून अर्धा पगार घेत आहेत. त्यामुळे हे पद का भरले जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांची पदोन्नतीने परभणीचे महापालिका आयुक्त म्हणून एक महिन्यापूर्वी बदली झाली. त्यानंतर या पदावर राज्य सरकारकडून कोणाचीही नियुक्ती झालेली नाही; तसेच पीएमपी अध्यक्षांनी सहव्यवस्थापकीयपदाचा कार्यभार कोणाकडेही दिलेला नाही. त्यामुळे अनेक प्रशासकीय कामांचा ताण अध्यक्षांकडे आला आहे. पीएमपी बस चालक व वाहकांनी नियभंग केल्यास वाहतूक विभाग त्यांच्यावर कारवाई करतो. त्यांची चारशीट तयार करून चौकशी होते. ही सर्व चौकशी सहव्यवस्थापकीय संचालक करतात आणि त्या वाहक व चालकाला दंड अथवा त्याच्या ‘जॉब शीट’वर त्याची नोंदणी केली जाते.

Advertisement

गेल्या महिनाभरात आणि त्याच्या काही पूर्वी नियमभंग केल्यामुळे ५० ते ६० चालक अथवा वाहक निलंबित केले आहेत. त्यांना सध्या घरी बसून अर्धा पगार दिला जात आहे. हे कर्मचारी त्यांची चौकशी पूर्ण करण्यासाठी आणि कामावर घेण्यासाठी पीएमपी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत; पण पद रिक्त असल्यामुळे काहीच होत नाही. यामध्ये पीएमपीचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने सहव्यवस्थापकीय संचालक पद भरण्याची मागणी केली जात आहे.


PMPML Bharti 2025 : Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited , Pune is going to conducted walk-in interview for interested and eligible candidates for the posts of “Vehicle Driver”. There are various vacancies available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview. For more details about Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited Bharti 2025 , visit our website policebharati.co.in .

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अंतर्गत “कंत्राटी वाहक चालक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

  • पदाचे नाव कंत्राटी वाहक चालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण पुणे (हडपसर डेपो)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे ४११०२८.
  • मुलाखतीची तारीख संपर्क 744779 5958/9145001734/9168002179
  • अधिकृत वेबसाईट – https://pmpml.org/

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For PMPML Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कंत्राटी वाहक चालक SSC/HSC Pass

Important Document For Walk in Interview PMPML Vehicle Driver Job 2025

(१) आधार कार्ड झेरॉक्स
(२) पॅन कार्ड झेरॉक्स
(३) ड्रायव्हींग लायसन्स झेरॉक्स
(४) बॅच क्रमांक
(५) शाळा सोडल्याचा दाखला
(६) पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
(७) SSC/HSC प्रमाणपत्र
(८) अॅड्रेस पुरावा
(९) रहिवासी दाखला
(१०) ट्रेनिंग सर्टिफिकेट
(११) पोलिस चारित्र पडताळणी दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन)
(१२) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट

Selection Process For Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited Walk in Application 2025

  • उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/x6qnB
✅ अधिकृत वेबसाईट https://pmpml.org/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदाचे नाव काय आहे?

कंत्राटी वाहक चालक

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण कुठे आहे?

पुणे (हडपसर डेपो)

निवड प्रक्रिया काय आहे?

मुलाखती

मुलाखतीचा पत्ता काय आहे?

श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे ४११०२८.