पुणे महानगर पालिका भरती लवकरच सुरु होणार, प्रस्ताव मंजूर – PMC Recruitment Updates
PMC Recruitment Updates – In a major update for job seekers tracking Pune Mahanagar Palika Jobs, the General Body meeting of the Pune Municipal Corporation (PMC) has officially approved a proposal to fill vacant positions across Class-1 to Class-3 cadres. This long-awaited recruitment drive will be conducted through direct service (Saral Seva) competitive examinations, clearing the path to fill 13 highly essential cadres within various administrative and technical departments. While the approval brings a wave of optimism for aspirants looking for stability in PMC Recruitment 2026, the decision-making process sparked intense political friction in the general assembly.
महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यामुळे महापालिकेतील १३ अत्यावश्यक पदे भरली जाणार आहे. परीक्षा घेऊन ही भरती केली जाणार असून, ही परीक्षा घेण्यासाठी केवळ ‘आयबीपीएस’ या संस्थेलाच प्राधान्य देण्यात आल्याने सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या विविध विभागांतील अत्यावश्यक १३ रिक्त पदे भरण्यासाठी ‘आयबीपीएस’ संस्थेमार्फत परीक्षा घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन प्रश्न उपस्थित केले. ‘महापालिकेचे नवीन भरती नियम अद्याप जाहीर का झाले नाहीत, भरतीची परीक्षा घेण्यासाठी ‘आयबीपीएस’ आणि टीसीएस या दोन्ही नामांकित संस्थांचे पर्याय उपलब्ध असताना केवळ एकाच संस्थेला वारंवार संधी का दिली जात आहे,’ अशी विचारणा त्यांनी केली.
Advertisement
यावर खुलासा करताना सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे म्हणाल्या, ‘यापूर्वीच्या तीन परीक्षा ‘आयबीपीएस’ मार्फत घेण्यात आल्या. त्यामुळे या संस्थेला प्राधान्य देण्यात आले.’ भरती नियम प्रक्रियेबाबत माहिती देताना उपायुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, ‘महापालिकेच्या भरती नियमांमध्ये काही तांत्रिक त्रुटी असून, त्या सुधारून आगामी सर्वसाधारण सभेत सुधारित नियम सादर केले जातील.’
या १३ पदांची होणार भरती
भरती प्रक्रिये अंतर्गत वर्ग-१ ते वर्ग-३ मधील १३ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वर्ग एक मधील त्वचारोग तज्ज्ञ, एड्स मॉडेल अधिकारी, न्यूरोसर्जन, युरोसर्जन, रक्तसंक्रमण अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी यांचा, वर्ग २ मध्ये भूलतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी / उपनगरसचिव, तर वर्ग ३ मधील सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी, मत्स्यालय पर्यवेक्षक, । सहाय्यक या पदांचा समावेश आहे.