Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » PDCC पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८९ शिपाई पदांची भरती, १२ वी पास उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी! – PDCC Bank Application Form
Last Updated:

PDCC पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८९ शिपाई पदांची भरती, १२ वी पास उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी! – PDCC Bank Application Form

PDCC Bank Application Form – मित्रांनो एक छान माहिती आपल्या समोर आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (PDCC Bank) द्वारे शिपाई (Peon) या पदाच्या तब्बल २८९ रिक्त जागांवर सरळसेवेद्वारे भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळां वरून (https://www.pdcc.bank.in/careers आणि https://www.punedccbank.com) केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू झाली असून उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. या भरतीसाठी उमेदवारांना १६५० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी (GST) आणि सर्व्हिस चार्ज इतके परीक्षा शुल्क ऑनलाईन माध्यमातून जमा करावे लागेल. भरतीची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असून परीक्षेचे प्रवेशपत्र व वेळापत्रक बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल.

PDCC Bank Application Form

  • पदाचे नाव – शिपाई (Peon)
  • पदसंख्या 289 जागा Vacancies
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • परीक्षा शुल्क -1650/-(अधिक १८% जी.एस.टी. व सर्व्हिस चार्ज)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख ऑगस्ट २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://pdcc.bank.in/
Advertisement

PDCC Bank Job Details

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता १ ऑगस्ट २०२६ रोजी किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) उत्तीर्ण किंवा समकक्ष पदविका (Diploma) असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, १ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तथापि, PDCC बँकेत कंत्राटी तत्त्वावर सलग ३ वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, ही पदे भरण्यासाठी उमेदवार हा पुणे जिल्ह्याचा किमान १५ वर्षांचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे सन २०१८ नंतरचे सक्षम प्राधिकरणाचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे अनिवार्य आहे. याशिवाय उमेदवारास मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

शिपाई पदाची संपूर्ण निवड प्रक्रिया एकूण १०० गुणांच्या निकषांवर आधारित असेल. यामध्ये प्रथम ७० गुणांची ऑफलाईन OMR (Optical Mark Recognition) आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा मराठी माध्यमातून होणार असून यात ७० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, ज्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमात शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना (२० गुण), बँकिंग व सहकार (१५ गुण), सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (१५ गुण), कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था (१० गुण) आणि बुद्धिमत्ता चाचणी (१० गुण) या विषयांचा समावेश आहे. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १:३ या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर ३० गुणांच्या मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. मुलाखतीत उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, संवाद कौशल्य, बँकिंग व पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान तपासले जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला ६ महिन्यांच्या तात्पुरत्या परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) कालावधीसाठी नेमणूक दिली जाईल, ज्यादरम्यान दरमहा १२,००० रुपये मानधन (एकवट पगार) दिले जाईल. प्रोबेशन कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर बँकेच्या सेवानियमानुसार नियमित वेतनश्रेणी (१९५-१०-२२५… ते ११७०) व नियमानुसार भत्ते लागू होतील. या भरतीमध्ये अंतिम निवड सूचीसोबतच २० टक्के उमेदवारांची १ वर्षासाठी प्रतीक्षा यादी (Waiting List) देखील तयार करण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचे छायाचित्र, स्वाक्षरी, आधार कार्ड व अधिवास प्रमाणपत्र नियमानुसार अपलोड करणे बंधनकारक आहे. एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद केले जातील. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी वेळेत बँकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/8Y013THqk
👉  ऑनलाईन अर्ज करा
https://lnk.ua/nVkOdmH37
✅ अधिकृत वेबसाईट
https://pdcc.bank.in/
Advertisement

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदसंख्या किती आहे?

289 जागा Vacancies

अर्ज पद्धती काय आहे?

ऑनलाईन

पदाचे नाव काय आहे?

शिपाई (Peon)

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

१० ऑगस्ट २०२६