पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत प्रतिक्षा यादीतील शिकाऊ उमेदवारांच्या तात्पुरत्या नियुक्तीबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर !! | PCMC Result 2026
PCMC Result 2026
PCMC Result 2026 : This official notification from the Pimpri Chinchwad Municipal Corporation announces the temporary, one-year apprentice appointment of waitlisted candidates for the 2026-27 session. Out of 159 selected candidates, 69 failed to report on time, creating vacancies that are now being filled by waitlisted candidates based on their ITI final year marks and category reservation. Selected candidates must report to the ITI Morwadi campus within 10 days of the order date to complete their online contract agreements. Trainees will receive a monthly stipend of either ₹10,560 or ₹11,040 depending on their specific ITI trade.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सन २०२६-२७ या सत्रासाठी प्रतिक्षा यादीतील शिकाऊ उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात एक वर्षासाठी नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. निवड यादीतील १५९ उमेदवारांपैकी ६९ उमेदवार वेळेत हजर न झाल्यामुळे, त्यांच्या रिक्त जागी गुणवत्तेनुसार प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या उमेदवारांनी आदेशाच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आय.टी.आय. मोरवाडी येथे प्रत्यक्ष हजर राहून ऑनलाईन करार नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षण कालावधीत ट्रेड्सनुसार उमेदवारांना दरमहा १०,५६० रुपये किंवा ११,०४० रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.
Advertisement
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ मधील उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक व हॉर्टीकल्चर सुपरवायझर या पदांचे कागदपत्रे पडताळणींचे वेळी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अनुभवांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणेकामी तसेच आरोग्य निरिक्षक पदाकरीता प्राप्त झालेल्या विविध संस्थाकडील स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी करणेकामी वाढीव कालावधीची आवश्यकता असल्याबाबत तसेच उद्यान विभागाकडील पदांचे अनुभव प्रमाणपत्र व स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी झालेनंतर या पदांकरीता उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल याबाबत जाहिर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक ०१/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेले आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रक खालील लिंक वर उपलब्ध आहे.
नवीन परिपत्रक पहा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement
उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉल्टीकल्चर सुपरवायझर व आरोग्य निरिक्षक या पदावरील उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करणेपूर्वी, ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीचे कागदपत्रांची पडताळणी करणेकामी गुणानुक्रमे संभाव्य निवड क्षेत्रात येणा-या (Zone Of Consideration) उमेदवारांचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी विषयक कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्याकरीता शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/ प्र.क्र.५४/का.१३-अ, दि.०४/०५/२०२२ अन्वये उमेदवारांना बोलविण्यात येत आहे. उमेदवारांची पदनिहाय यादी सोबत प्रपत्र “अ” मध्ये महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येत आहे.
उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, मुंबई-पुणे हाईवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे ४११ ०१८ येथे दिनांक २६/०६/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना प्रपत्र “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हतेची मूळ कागदपत्रे व प्रपत्र “क” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ अनुभव प्रमाणपत्रांची पडताळणी करणेकामी सक्षम प्राधिका- यांने (शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्र) साक्षांकित केलेला एक संच सोबत आणावा. कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित राहणा-या व अपूर्ण कागदपत्रे सादर करणा-या अथवा कागदपत्रे तपासणी अंती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबींची पुर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांचा पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, याबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
| 1 | कागदपत्र पडताळणी २ रा टप्पा राबविणेबाबत. जाहिर निवेदन व (Cut Off)- जाहिरात क्र.१८४/२०२२ | 14-06-2024 |
आरोग्य निरिक्षक या पदाच्या उमेदवारांनी स्वच्छता निरिक्षक पदविका प्राप्त केलेल्या संस्थेस शासन मान्यता असल्याची कागदपत्रे व संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या स्वच्छता निरिक्षक पदविका अभ्यासक्रमास शासन मान्यता असल्याची कागदपत्रे दिनांक २६/०६/२०२४ रोजी सादर करणे आवश्यक आहे.
PCMC Mega Bharti 2026 Cut Off
| Sr no | Post Name | Category | Cut Off | |
| 1 | उद्यान अधिक्षक (वृक्ष) | खुला (सर्वसाधारण) | 124 | |
| 2 | उद्यान निरिक्षक | खुला | सर्वसाधारण | 126 |
| महिला | 104 | |||
|
विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड
|
सर्वसाधारण | 112 | ||
Post Name – हॉर्टीकल्चर सुपरवायझर
| Sr no | Category | Reservation | Cut Off |
| 1 | खुला | सर्वसाधारण | 118 |
| महिला | 104 | ||
| 2 | ईडब्ल्यूएस | सर्वसाधारण | 100 |
| 3 | इमाव | सर्वसाधारण | 102 |
| 4 | विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड | सर्वसाधारण | 108 |
| 5 | अनु. जमाती | सर्वसाधारण | 92 |
| 6 | अनु. जाती | सर्वसाधारण | 90 |
पदनाम आरोग्य निरीक्षक
कागदपत्र पडताळणी अंतिम गुणरेषा (Cut Off)
| Sr no | Category | Reservation | Cut Off |
| 1 | खुला | सर्वसाधारण | 142 |
| अंशकालीन | – | ||
| माजी सैनिक | 112 | ||
| महिला | 120 | ||
| 2 | अनु. जाती | सर्वसाधारण | 136 |
| महिला | 112 | ||
| 3 |
दिव्यांग
|
110 | |
| 4 | भ.ज.(क) | सर्वसाधारण | 122 |
| 5 | विमाप्र | सर्वसाधारण | 124 |
| 6 | इमाव | सर्वसाधारण | 140 |
| महिला | 108 | ||
| 7 | ईडब्ल्यूएस | सर्वसाधारण | 134 |
| महिला | 106 | ||
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
हॉर्टीकल्चर सुपरवायझर
वाढीव कालावधीची आवश्यकता असल्याबाबत तसेच उद्यान विभागाकडील पदांचे अनुभव प्रमाणपत्र व स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी झालेनंतर या पदांकरीता उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल याबाबत जाहिर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक ०१/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
उद्यान विभागाकडील पदांचे अनुभव प्रमाणपत्र व स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी करण्याकरीता उमेदवारांना दिनांक २१/०२/२०२४ व दिनांक २२/०२/२०२४ रोजी बोलविण्यात आलेले होते. उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक व हॉर्टीकल्चर सुपरवायझर या पदांच्या अनुभव प्रमाणपत्रांची तसेच आरोग्य निरिक्षक पदाच्या स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी झालेली आहे. कागदपत्रे पडताळणी नंतर वरील पदांची निवड सुची तयार करणेकामी पर्याप्त मात्रेत उमेदवार उपलब्ध होत नाहीत. निवड तथा प्रतिक्षा यादीवर उमेदवार उपलब्ध होणे आवश्यक असल्याने उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे.
PCMC Lipik Bharti Result
PCMC Bharti Result : पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदावर भरती झालेल्या ९ उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. महापालिकेने विविध ११ पदांसाठी ३६२ जागांसाठी नोकर भरती राबवून ऑनलाईन परीक्षा घेतली. त्यात सर्वाधिक २१३ जागा लिपिक पदासाठी होत्या. आरक्षणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. निवड झालेल्यांना नियुक्ती पत्रही देण्यात आले. मात्र, त्यातीन ९ जणांनी चारित्र्य वर्तणूक पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपसाणी करून घेतली नाही. याबाबत त्यांनी पालिकेला देखील काही माहिती कळविली नाही. त्या उमेदवारांना नोकरीची आवश्यकता नाही, असे समजून त्यांची निवड रद्द करण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची लिपिक म्हणून निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी नव्याने रुजू झालेल्या १२ कर्मचाऱ्यांनी राजीनामे देऊन महापालिकेची नोकरी सोडली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची होणार निवड
दरम्यान, यापूर्वी ३ लिपिक, १ कनिष्ठ अभियंता, ८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर रूजू झालेल्या १२ कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा आयुक्त सिंह यांनी मंजूर केला. त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. दुसरीकडे चांगली संधी मिळाल्याने नोकरी सोडली. शासनाच्या इतर विभागात चांगल्या पदावर संधी मिळाल्याने त्या ९ जणांनी पालिकेची लिपिक पदाची नोकरी नाकारली आहे. त्याबाबत त्यांच्याशी दोन वेळा पत्रव्यवहार करून आवश्यक मुदत देण्यात आली आहे. त्यांचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना नोकरीची आवश्यकता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे, असे सामान्य प्रशासनचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
PCMC Bharti Result PDF
PCMC Bharti Result
: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकिय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफनर्स, आरोग्य सेविका (एएनएम), प्रयोगशाळा तंत्रज्ञ व टी.बी. हेल्थ व्हिजीटर या रिक्त पदांसाठी जाहिरात क्र.६५६/२०२४ दि.१४/०३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती.
सदर स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकिय अधिकारी (पूर्ण वेळ) या पदांची मुलाखतीस पात्र अपात्र यादी तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ व टी. बी. हेल्थ व्हिजीटर या पदाची प्राथमिक गुणांकन यादी प्रसिध्द करण्यात येत असून सदर यादीबाबत आक्षेप हरकती असल्यास याकामी ०३ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. त्यानुसार
दिनांक-१३/०६/२०२४ रोजी
सायं. ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत) लेखी स्वरुपात हरकतीचे पुराव्यार्थ आवश्यक कागदपत्रे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, २ रा मजला, वैद्यकिय मुख्य कार्यालय येथे सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही यांची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Download PCMC Eligible list and Non Eligible List
PCMC Recruitment Joining Date 2026
PCMC Bharti Result 2023 – The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is examining the documents of the candidates who have passed the recruitment examination. The final list of eligible candidates, including reservation, will be released later. The administration plans to recruit all 368 candidates to various posts by the 15th of next month. The online exam was conducted for three days in May at various centres across the state for 368 vacancies for 15 different posts in the civic body.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
त्यात प्रत्यक्षात 55 हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर 11 पदांसाठी 35 जागांचा निकाल 7 ऑगस्टला जाहीर करण्यात आला. त्यात अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी तब्बल 30 जार 581 अर्जदार बसले होते. त्यांचा निकाल 30 ऑगस्टला जाहीर करण्यात आला.
पहिल्या टप्प्यातील निकाल प्रसिद्ध करून आरक्षणासह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, दुसर्या टप्प्यातील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर नियुक्तीपत्र देऊन त्यांना कामावर रूजू करून घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
दुसर्या टप्प्यातील नोकरी भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी महाापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सध्या सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीसमोर अहवाल देऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
The online exam result for the posts of Clerk, Civil Engineering Assistant, Junior Engineer, Civil and Junior Engineer, Electrical is being declared post wise today on 30/8/2023. Please review it under the PCMC Bharti Result 2023. The schedule along with the names of the candidates for verifying the documents of the post wise candidates as mentioned in the advertisement for appointment to the above mentioned posts will be published through a public statement on the website of the Municipal Corporation. No correspondence will be sent to the candidates in this regard. So candidates should check the instructions on the website from time to time until the recruitment process is completed. Any complaint received on the ground that the instructions on the website have not been followed will not be entertained. All candidates should note this.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ नुसार अर्ज केलेल्या लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २७/०५/२०२३, दिनांक २८/०५/२०२३ व दिनांक १७/०७/२०२३ रोजी घेण्यात आली आहे. वरीलप्रमाणे नमूद पदांच्या उत्तरतालिका (Answer key ) मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करुन उत्तरतालिकेबाबत ०३ दिवसांचे मुदतीत उमेदवारांकडून हरकती / आक्षेप मागविण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी घेतलेल्या हरकत / आक्षेपांवर अंतिम निर्णय झालेला आहे. उमेदवारांनी घेतलेल्या हरकत / आक्षेपांवर अंतिम निर्णय झालेला झाल्यानंतर वरील पदांच्या ऑनलाईन परिक्षेचा पदनिहाय निकाल मनपा संकेतस्थळावर दिनांक ३०/०८/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.
उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करणेपूर्वी, ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीचे कागदपत्रांची पडताळणी करणेकामी गुणानुक्रमे संभाव्य निवड क्षेत्रात येणा-या (Zone Of Consideration) उमेदवारांचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी विषयक कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्याकरीता उमेदवारांना शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/ प्र.क्र.५४/का.१३-अ, दि. ०४/०५/२०२२ अन्वये १:३ प्रमाणात बोलविण्यात येत आहे. उमेदवारांची पदनिहाय यादी कागदपत्रे पडताळणीचे दिनांकासह सोबत परिशिष्ठ “अ” मध्ये महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येत आहे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी ऑटो क्लस्टर, मिटींग हॉल, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी पुणे ४११ ०१९ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना परिशिष्ठ “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच त्या कागदपत्रांचा सक्षम प्राधिका-यांने साक्षांकित केलेला एक संच सोबत आणावा. कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित राहणा-या व अपूर्ण कागदपत्रे सादर करणा-या अथवा कागदपत्रे तपासणी अंती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबींची पुर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांचा पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Document Verification List
PCMC कनिष्ठ अभियंता सिव्हिल निकाल पहा
PCMC कनिष्ठ लिपिक भरती निकाल पहा
PCMC कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल निकाल पहा
PCMC कनिष्ठ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक निकाल पहा
PCMC Bharti Result : The result of the examination held in May for 388 posts of 15 posts in B and C groups in various departments of the Municipal Corporation is being delayed. The result of 11 of these posts (on 7th) was announced on August while the date for the result of the remaining 4 posts is being processed by the administration. Therefore, more than 52 thousand students have turned their attention to when the municipal administration will release the results.