‘पवित्र’ पोर्टलमुळे शिक्षक भरती रखडली, लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!! | Pavitra Portal Shikshak Bharti 2026
Pavitra Portal Shikshak Bharti 2026
राज्य सरकारच्या ‘पवित्र पोर्टल’च्या संथ कारभारामुळे मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे 1,200 शिक्षकांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. नियमानुसार शिक्षकांची भरती केवळ या सर्वसमावेशक पोर्टलद्वारेच करणे बंधनकारक असल्याने महापालिकेचे हात बांधले गेले आहेत. पालिकेने आपला प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असला तरी तिथून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे पालिका शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षक भरती रखडल्याने पालिकेने ‘तासिका मानधन’ (घडय़ाळी तास) तत्त्वावर खाजगी शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती केली आहे. मात्र या कंत्राटी शिक्षकांमध्येही तीव्र असंतोष पसरला आहे. तासाला केवळ 150 इतके तुटपुंजे मानधन मिळत असल्याने ‘महागाईच्या काळात या दरात शिकवणे कसे परवडणार?’ असा संतप्त सवाल हे शिक्षक उपस्थित करत आहेत. यावर पर्याय म्हणून ‘महापालिकेने मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे, त्यानुसार शिक्षकांना दिले जाणारे मानधन वाढवण्यात येईल,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. मात्र हा प्रस्ताव कधी अमलात येणार आणि मानधनात नेमकी किती वाढ होणार, याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. पवित्र पोर्टलद्वारे नियमित भरती प्रक्रिया सुरू झाल्यास सध्या काम करत असलेल्या या कंत्राटी शिक्षकांचे काय करायचे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे. ‘‘आम्हाला 1,200 शिक्षकांची भरती तातडीने करायची आहे, पण पवित्र पोर्टलमुळे आमचे हात अडकले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच लवकरच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिली. पोर्टलच्या प्रक्रियेला वेळ लागणार असेल, तर महापालिकेला स्वतःच्या स्तरावर भरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे करणार असल्याचे शिरवडकर यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती केली जाणार असून, यासाठी महापालिका शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलवर जाहिरात दाखल करण्यात आली आहे. एकूण ४४ शिक्षकांची या अंतर्गत भरती केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी सांगितले.
महपाालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये २०१९ पासून संचमान्यता तसेच बिंदूनामावलीचे काम रखडले होते. यंदा हे काम पूर्ण करीत महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी नुकतीच पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यात आली आहे. या माध्यमातून माध्यमिकच्या मराठी माध्यम शाळांमध्ये १९, उर्दू माध्यम शाळांमध्ये १० शिक्षकांची भरती केली जाणार असून, प्राथमिक विभागाच्या हिंदी माध्यम शाळांमध्ये १५ विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण शाळांचा सर्वागीण विकास उज्वल भविष्यासाठी शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अशाप्रकारे या भरतीद्वारे महापालिकेच्या शाळांना ४४ नवीन शिक्षक मिळणार आहेत. महापालिकेच्या शहरात एकूण शंभर शाळा असून, त्यामध्ये ८०४ शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या वर्षी या शाळांमध्ये जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा ३० जूनपर्यंत पटनोंदणी अभियान राबविले जाणार असून, त्यानंतर यंदाची विद्यार्थीसंख्या निश्चित होणार आहे.
प्राथमिक शाळांमध्ये चाळीस पदांची वाढ
यंदा महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये ४० पदे वाढली असून, ती सुद्धा भरली जाणर आहे. बी. टी. पाटील महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी असताना त्यांनी नियमबाह्य पद्धतीने आंतरजिल्हा बदलीने ५२ शिक्षक भरल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या शिक्षकांचा खटका सध्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्याचा निकाल संबंधित शिक्षकांच्या बाजूने लागल्यास, त्यांना या पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. न्यायालयीन निकाल त्यांच्याविरोधात गेल्यास पुढील वर्षी या पदांच्या भरतीसाठी पुढील वर्षी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिली जाणार आहे.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026 Update
राज्यातील शिक्षक आणि शिक्षणसेवक पदभरती प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पवित्र’ पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिरात नोंदणीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र १५ जून २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, यामुळे खासगी, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व्यवस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १ मे २०२६ पासून पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. सुरुवातीला ३१ मे २०२६ ही अंतिम मुदत होती, नंतर ती १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, अनेक शाळा व्यवस्थापनांकडून बिंदुनामावली (रोस्टर) तपासणी, संच मान्यता आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात विलंब होत असल्याने मुदतवाढीची मागणी जोर धरत होती. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांसारख्या संघटनांनी प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, आता ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
अनेक शाळांमध्ये संचमान्यता प्रक्रिया, बिंदुनामावली तपासणी आणि रिक्त पदांची नोंदणी अपूर्ण राहिली होती. यामुळे पोर्टलवर अपेक्षित जाहिराती अपलोड होत नव्हत्या. शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून आणि २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षात रिक्त पदे भरण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे. अंदाजे ८ हजार ते १३ हजाराहून अधिक जागा पोर्टलवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे TAIT २०२५/२०२४ उत्तीर्ण उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.
शिक्षण आयुक्तालयाने सर्व विभागीय आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत की, बिंदुनामावली तपासणी १०० टक्के पूर्ण करून घ्यावी. या निर्णयामुळे रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्ती पारदर्शक पद्धतीने होईल. शाळा व्यवस्थापनांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026 Update
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ‘पवित्र’ प्रणालीवर जाहिराती नोंदविण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली असून, बहुतांश व्यवस्थापनांची बिंदुनामावली तपासणी अद्याप अपूर्ण असल्याने जाहिराती नोंदविण्याची प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी १५ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही राज्यस्तरावरून ‘पवित्र प्रणाली’च्या माध्यमातून राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची शिक्षक भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने ही मुदतवाढ दिली आहे. अनेक शाळा व्यवस्थापनांकडून बिंदुनामावलीची तपासणी पूर्ण न झाल्यामुळे रिक्त पदांच्या जाहिराती अद्याप संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेल्या नाहीत, असे निदर्शनास आले आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सर्व व्यवस्थापनांनी तातडीने बिंदुनामावलीची तपासणी पूर्ण करून ‘पवित्र’ संकेतस्थळावर जाहिराती नोंदविणे आवश्यक आहे. अधिकाधिक व्यवस्थापनांची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि भरती प्रक्रिया वेळेत मार्गी लागावी, यासाठी दि. १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुदतवाढीमुळे शाळा व्यवस्थापनांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि बिंदुनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरती प्रक्रिया अधिक वेगाने राबविण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026 Update
दरम्यान, मुदतवाढीमुळे शाळा व्यवस्थापनांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि बिदुनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरती प्रक्रिया अधिक वेगाने राबविण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षक भरती २०२५ अंतर्गत रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र राज्यातील अनेक संस्थांमध्ये आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टलवर रिक्त जागा अपलोड करण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून होत आहे. ”पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या रिक्त पदाच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक भरतीच्या पोर्टलवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदत आहे. असे असतानाच मोजक्याच आस्थापनांनी जाहिराती नोंदविल्याचे दिसून येते. याशिवाय, इयत्ता अकरावी आणि बारावीकरिता अद्याप संचमान्यता झालेली नसल्याने त्या जागा पोर्टलवर येणार नाहीत. त्यामुळे सर्व इयत्तांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील रिक्त जागा पोर्टलवर नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी उमेदवारांकडून होत आहे. ”
इयत्ता अकरावी आणि बारावीच्या संचमान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, बिंदूनामावली पडताळणी, संचमान्यता आणि कर्मचारी विषयक प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात यावेत. पदवीधर पदोन्नती, केंद्रप्रमुख भरती रिक्त होणारी पदे, विस्तार अधिकारी पदोन्नती याची कार्यवाही लवकर करण्याचे आदेश द्यावेत, १५ जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त जागांचा भरती प्रक्रियेत समावेश करण्यात यावा. राज्यातील एकही पात्र रिक्त जागा भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा मागण्या युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने ‘पवित्र पोर्टल’वरील भरती प्रक्रियेला वेग दिला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवे शिक्षक मिळावेत, या उद्देशाने शिक्षण विभागाने १ ते ३१ मे दरम्यान शाळांच्या व्यवस्थापनांना रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या अभियोग्यता धारकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेसाठी एकूण २,२८,००० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,११,३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पोर्टलवर आतापर्यंत १,७०,१०८ स्व-प्रमाणपत्रे उमेदवारांनी आपली (Self-certified) पूर्ण केली असून, केवळ हेच उमेदवार या भरती प्रक्रियेत पात्र ठरणार आहेत.
या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सध्याची रिक्त पदेच नव्हे, तर मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी संभाव्य पदेही गृहीत धरली जाणार आहेत. इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व गटांतील पदांसाठी ही जाहिरात प्रक्रिया असेल. मात्र, कोणत्याही संस्थेला जाहिरात देण्यापूर्वी आपली ‘बिंदूनामावली’ (Roaster) मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या मान्यतेनंतरच या जाहिराती पोर्टलवर झळकतील. प्रशासनाची पावले आणि पारदर्शकता पोर्टलवरील ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड होईल. पेसा (PESA) क्षेत्रातील रखडलेली भरती आणि स्थानिक रोजगाराचा प्रश्नही या प्रक्रियेमुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो ‘टीईटी’ पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा करत उमेदवारांना शाळा निवडीसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला आहे.
राज्य सरकारकडून २ एप्रिल रोजी जारी केलेल्या शुद्धिपत्रकानुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक संधी दिली आहे. यापूर्वी उमेदवारांना जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम निवडता येत होते. आता नव्या बदलानुसार उमेदवारांना १०० शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छित शाळा निवडण्याचे पर्याय वाढून नियुक्तीची शक्यता अधिक वाढणार आहे. पवित्र पोर्टलवर संस्थांकडून रिक्त जागांची माहिती भरल्यानंतर ‘टीईटी’ पात्र उमेदवारांची यादी अपलोड केली जाते. त्यानंतर उमेदवारांकडून पसंतीक्रम दिले जातात. मात्र, भरती प्रक्रियेचा वेग संथ असल्याची टीका होत आहे. मागील भरतीत शासनाने २५ हजार जागा भरण्याचा दावा केला, तरी प्रत्यक्षात दहा हजार जागा भरल्या गेल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पोर्टलमध्ये सुधारणा झाल्याने काही तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. तरीही सर्व रिक्त पदे भरली जाणार का? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी पवित्र पोर्टलवर नवी कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती या प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे, तसेच पोर्टलशिवाय संस्था स्तरावर भरतीला मान्यता देण्यात येणार नाही. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षक भरती अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टलमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय व विभागीय पातळीवर समित्या स्थापन करून शिक्षकांच्या सेवा माहितीची अचूक पडताळणी केली जाणार आहे. यामुळे चुकीची नोंद कमी होण्यास मदत होणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय नोडल अधिकारी आणि शिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबवली जाणार आहे. शिक्षकांच्या सेवाविषयक माहितीमध्ये बदल, नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे, तसेच अन्य तांत्रिक बाबींचे निर्णय संबंधित समित्यांच्या शिफारसीनुसार घेतले जातील. पवित्र पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढून उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ होईल. शासनाने या नव्या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे कोणते ?
- नवीन समित्यांद्वारे भरती प्रक्रियेवर काटेकोर नियंत्रण, पवित्र पोर्टलवर सेवा माहिती अद्ययावत अनिवार्य करण्यात येणार आहे.
- न्यायालय आदेशानुसार उच्चस्तरीय देखरेख यंत्रणा लागू करण्यात आली आहे. तसेच तक्रारी कमी करण्यासाठी पारदर्शकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
- भरती प्रक्रियेत संचमान्यतेनुसार रिक्त जागांची संख्या आणि बिंदुनामावली अद्ययावत करून अधिकाऱ्यांनी खात्री करावी लागणार आहे.
- पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश दिलेल्या मुदतीत जारी होणार असून त्याची पोर्टलवर नोंद सक्तीची करण्यात आली आहे.
- शिक्षण उपसंचालकांसह, शैक्षणिक संस्था, शिक्षणाधिकारी यांच्याकडून परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना कामकाज अहवाल पाठवणे अत्यावश्यक करण्यात आले असल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले.
भावी शिक्षकांनो, बातमी समोर आली आहे, शिक्षक भरती-TAIT साठी उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. या संर्भातील पूर्ण माहीत आम्ही खाली दिलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या वेबसाइटला आपण बघू शकता.
उमेदवारांसाठी सूचना
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.
- १. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही दिनांक २७/०५/२०२५ ते दिनांक ३०/५/२०२५ आणि ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती.
- २. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
- ३. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
- ४. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी निवडप्रक्रियेत सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- ५. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक १५/१२/२०२५ ते दिनांक २९/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
- ६. TET/CTET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉगीनवर Request for Change in Data या मेनूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे.
|
Published On : 15-Dec-2025 |
|
Published On : 15-Dec-2025 |
|
Published On : 15-Dec-2025 |