Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » पवित्र पोर्टल वर निवड यादी जाहीर – शिक्षक भरती ! – Pavitra Portal Merit List 2025-2026, Document Verification List
Last Updated:

पवित्र पोर्टल वर निवड यादी जाहीर – शिक्षक भरती ! – Pavitra Portal Merit List 2025-2026, Document Verification List

Pavitra Portal Selection List Result 2025 – 2026@ https://tait2025.mahateacherrecruitment.org.in

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
  • सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले त्यातील उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले १,७०,१०८ आहेत.
  • मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०८/२०२६ या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या आहेत.
    त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.
  • पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी ७.०० वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

या कागदपत्रांची होणार पडताळणी
• सर्व प्रकारची मूळ प्रमाणपत्रे आणि साक्षांकित केलेली एक झेरॉक्स प्रत
• पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीची स्व प्रमाणपत्राची प्रत
• सध्याचे छायाचित्र
• शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र • रहिवासी दाखला
आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, चालक परवाना यापैकी एक स्वतःच्या ओळखीसाठी पुरावा
आवश्यक
• जात पडताळणी दाखला

शिक्षक पदभरतीच्या “मुलाखतीसह” या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरीदेखील या संदर्भात अभियोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास, अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committe) कडे [email protected] या ई-मेलवर सबळ पुराव्यांसह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ईमेल पाठवू नयेत. उमेदवारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनीही या ईमेलवर पाठविल्यास असे ई-मेल दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गानी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा.