Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल; आता केवळ एनएसपी पोर्टलवरून अर्ज | NPS Portal Apply Online
Last Updated:

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल; आता केवळ एनएसपी पोर्टलवरून अर्ज | NPS Portal Apply Online

NPS Portal Apply Online

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण बदल केले असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरताना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. केंद्र शासनाच्या पीएम यशस्वी प्री-मॅट्रिक आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आता पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (एनएसपी) भरावे लागणार आहेत. या बदलांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याची संधी उपलब्ध झाली असून, अर्ज करताना उत्पन्नाची अट आणि योग्य पोर्टलची निवड करणे महत्त्वाचे ठरणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पीएम यशस्वी पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र मुलगे आणि मुली या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीचे अर्ज केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (एनएसपी) भरावे लागणार आहेत.

Advertisement

दरम्यान, पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या इयत्ता नववी आणि दहावीतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीतील मुलींच्या शिष्यवृत्तीचे अर्जही पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गानुसार, प्रवर्गानुसार आणि पालकांच्या उत्पन्नानुसार लागू असलेल्या योजनेची माहिती घेऊन योग्य पोर्टलवर अर्ज करावा.

NPS Portal Apply Online