१६० नवीन पदांना मंजुरी नवीन जाहिरात लवकरच येणार – ‘NMRDA’च्या कामांना येणार गती!! | NMRDA Nagpur Recruitment 2026
NMRDA Nagpur Bharti 2026
नागपूर शहराचा झपाट्याने होणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एनएमआरडीए) १६० तांत्रिक आणि अतांत्रिक पदांच्या आकृतिबंधाला शासनाने मंजुरी दिली आहे. वाढते कामकाज लक्षात घेता मनुष्यबळाची क्षमता वाढविण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या विविध विकासकामांचे नियोजन, प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. नागपूर महानगराचा विस्तार शहराच्या हद्दीपलीकडे होत असताना नियोजनबद्ध विकासासाठी सक्षम यंत्रणा आवश्यक आहे. एनएमआरडीएच्या कामकाजाचा विस्तार लक्षात घेऊनच १६० पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. आता या पदांना शासनाने मान्यता दिली असून त्यासंदर्भातील निर्णयदेखील जारी करण्यात आला आहे. यामुळे प्राधिकरणाच्या विविध विभागांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पुढे नेता येणार आहे.
यामध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक पदांचा समावेश असल्याने केवळ कार्यालयीन कामकाजच नव्हे, तर प्राधिकरणाच्या तांत्रिक स्वरूपाच्या जबाबदाऱ्यांसाठीही मनुष्यबळाची क्षमता वाढणार आहे. १६० मंजूर पदांमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे विकासकामांच्या तांत्रिक बाजू हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रादेशिक स्तरावरील विकासनियोजन, पायाभूत सुविधांशी संबंधित प्रस्ताव आणि तांत्रिक परीक्षण यासाठी सक्षम यंत्रणा असणे आवश्यक असते.१६० पदांना शासनाची मंजुरी मिळणे हा पहिला टप्पा आहे. या पदांवर आवश्यकतेनुसार नियुक्त्या होणे आणि संबंधित विभाग कार्यान्वित होणे तितकेच महत्त्वाचे आहे. शासन निर्णयात या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि नियुक्तीच्या अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत.
NMRDA Nagpur Bharti 2026 : The recruitment notificaction has been declared from the Nagpur Metropolitan Region Development Authority for the interested and eligible candidates. There are 03 vacancies available to fill the posts. The name of the posts is “Naib Tehsildar (Retired), Head Clerk (Retired), Talathi (Retired)”. The employment place for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date for receipt of the application will be 08th of July 2026 . More details are as follows:-
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत “नायब तहसिलदार (सेवानिवृत्त), अव्वल कारकुन (सेवानिवृत्त), तलाठी (सेवानिवृत्त)” पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
- पदाचे नाव – नायब तहसिलदार (सेवानिवृत्त), अव्वल कारकुन (सेवानिवृत्त), तलाठी (सेवानिवृत्त)
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी, आस्थापना विभाग मुख्य कार्यालय, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सदर नागपूर -440001.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जुलै २०२६
- अधिकृत वेबसाईट – http://www.nmrda.org/
NMRDA Nagpur Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| नायब तहसिलदार (सेवानिवृत्त) | 01 पद |
| अव्वल कारकुन (सेवानिवृत्त) | 01 पद |
| तलाठी (सेवानिवृत्त) | 01 पद |
How To Apply For NMRDA Nagpur Notification 2026
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.nmrda.org Job 2026 |
|
|
📑 PDF जाहिरात
|
https://lnk.ua/XVs1eSxvw |
| ✅ अधिकृत वेबसाईट | http://www.nmrda.org |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
८ जुलै २०२६
अर्ज पद्धती काय आहे?
ऑफलाईन
वयोमर्यादा किती आहे?
65 वर्षे