NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2026-27 शिष्यवृत्तीची संपूर्ण माहिती जाहीर! – NMMS Exam 2026 Application Form Link | NMMS Scholarship Exam Date
NMMS Scholarship Exam 2026
NMMS योजना हि शैक्षणिक उमेदवारांसाठी एक महत्वाची योजना आहे. या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (National Means-cum-Merit Scholarship – NMMS) राबविण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत इयत्ता 8 वीमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेद्वारे निवड केली जाते. परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या मुले लाखो विद्यार्थाना या योजनेचा लाभ मिळतो आणि त्यांचे शिक्षण वेळेवर पूर्ण होत. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा हा आहे. महाराष्ट्रात NMMS परीक्षा राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. या लेखामध्ये NMMS परीक्षा म्हणजे काय, पात्रता निकष, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत, MAT आणि SAT अभ्यासक्रम, शिष्यवृत्तीची रक्कम, पात्रता गुण, आवश्यक कागदपत्रे तसेच परीक्षेची तयारी कशी करावी याबाबतची संपूर्ण आणि अद्ययावत माहिती सोप्या भाषेत आम्ही दिली आहे. तसेच खालील लिंक वरून अर्ज लिंक सुद्धा दिली आहे. NMMS परीक्षा 2026-27 साठी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याची सुविधा दि.08/09/2026 पासून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
चला तर या योजनेबद्दल [पुढील माहिती बघूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 8 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वीपासून इयत्ता 12 वीपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. महाराष्ट्रात NMMS परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. या परीक्षेत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता (Mental Ability Test – MAT) आणि शैक्षणिक क्षमता (Scholastic Aptitude Test – SAT) यांचे मूल्यमापन केले जाते. पात्रता निकष पूर्ण करून गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
आता जाणून घेऊया NMMS शिष्यवृत्ती रक्कम किती आहे?
जसेकी सांगितल्या प्रमाणे NMMS (National Means-cum-Merit Scholarship) ही केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजना असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविली जाते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 8 वीमध्ये आयोजित करण्यात येणारी NMMS परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या योजे अंतर्गत परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वीपासून इयत्ता 12 वीपर्यंत दरमहा ₹1,000 प्रमाणे वार्षिक ₹12,000 शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, शिष्यवृत्तीचा लाभ पुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षात सुरू ठेवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या शैक्षणिक अटी पूर्ण करणे आवश्यक असते.
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक पात्रता काय आहे?
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. इयत्ता, शैक्षणिक गुणवत्ता, पालकांचे वार्षिक उत्पन्न आणि शाळेचा प्रकार या निकषांच्या आधारे पात्रता निश्चित केली जाते. अधिकृत नियमांनुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येतो. परीक्षेसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- इयत्ता: विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 8 वीमध्ये नियमित शिक्षण घेत असावा.
- शैक्षणिक अर्हता: इयत्ता 7 वीच्या वार्षिक परीक्षेत किमान 55 टक्के गुण मिळालेले असावेत. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के गुणांची सवलत असून त्यांना किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत.
- वार्षिक उत्पन्न: विद्यार्थ्याच्या पालकांचे सर्व स्रोतांमधून मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न ₹3,50,000 पेक्षा जास्त नसावे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची अट किती (उत्पन्न नेमके किती असावे?)
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांचे सर्व स्रोतांमधून मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न ₹3,50,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास विद्यार्थ्याला या योजनेसाठी पात्र मानले जात नाही. अर्ज करताना सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले वैध उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उत्पन्नाची पडताळणी अधिकृत कागदपत्रांच्या आधारे केली जाते. त्यामुळे अर्ज भरताना उत्पन्नासंबंधीची माहिती अचूक नमूद करावी आणि आवश्यक प्रमाणपत्र निश्चित मुदतीत अपलोड करावे.
NMMS साठी अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे (List of Documents fot NMMS 2026)
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. अर्जाची पडताळणी आणि पात्रता निश्चित करण्यासाठी ही कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. संबंधित शैक्षणिक वर्षासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या सूचनांनुसार कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो.
अर्जासाठी साधारणपणे पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.
- विद्यार्थ्याचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
- विद्यार्थ्याची स्वाक्षरी
- इयत्ता 7 वीची गुणपत्रिका
- शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र (सूचनेनुसार)
- ऑनलाइन अर्जामध्ये नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज भरताना सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि निर्धारित आकारात अपलोड करावीत. चुकीची, अपूर्ण किंवा अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केल्यास अर्ज पडताळणीदरम्यान नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज अंतिम सादर करण्यापूर्वी सर्व माहिती आणि कागदपत्रे एकदा तपासून घेणे आवश्यक आहे
आता परीक्षेविषयी माहिती बघूया
❇️
बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी या दोन विषयांसाठी परीक्षा होणार
❇️
प्रत्येक विषयाला ९० गुण असणार
❇️
२८ डिसेंबरला सकाळी साडेदहा ते दुपारी बारा आणि दुपारी दीड ते तीन या वेळेत परीक्षा होणार
❇️
शिष्यवृत्तीस पात्र होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३२ टक्के गुण मिळविणे बंधनकारक
NMMS ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. (How to Apply For NMMS 2026 Exam)
- सर्वप्रथम खालील लिंक वर किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mscepune.in/ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- NMMS Exam 2026-27 Online Form या लिंकवर क्लिक करा.
- या ठिकाणी नवीन नोंदणी (Registration) करून आवश्यक माहिती भरा.
- या स्टेप मध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती, शाळेची माहिती आणि इतर आवश्यक तपशील अचूक नमूद करा.
- लक्षात ठेवा दिलेल्या साईझ मध्ये फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे निर्धारित स्वरूपात अपलोड करा.
- अर्ज शुल्क लागू असल्यास ऑनलाइन पद्धतीने भरावे.
- भरलेली सर्व माहिती पुन्हा तपासून अर्ज अंतिम (Final Submit) करा.
- अर्ज सादर झाल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF प्रत भविष्यातील वापरासाठी सेव करून ठेवा.