Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » विविध बँकांमध्ये ११ हजार पदांची मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित,UCO,महाबँक, BOB अन्य बँकेत नोकरीची संधी!
Last Updated:

विविध बँकांमध्ये ११ हजार पदांची मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित,UCO,महाबँक, BOB अन्य बँकेत नोकरीची संधी!

New Bank Recruitment Application Form Details – मित्रांनो, बँकेत नोकरी करू पाहणाऱ्या तरुणांना एक आनंदाची बातमी आहे. हि मोठी नोकरीची संधी पदवीधर उमेदवारांसाठी आहे. या अंतर्गत तब्बल ११ हजार जागा भरण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात IBPS मार्फत तब्बल ११ हजार ४०३ लिपिक पदांसाठी मेगाभरती काढण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाली असून अखेरची तारीख २१ ऑगस्ट २०२६ आहे. या भरतीसाठी पूर्व परीक्षा ऑक्टोबर २०२६ तर मुख्य परीक्षा डिसेंबर २०२६ ला घेतली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाइट https://ibpsreg.ibps.in वर देण्यात आली आहे. लिपिक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेला असावा. त्याच्याकडे संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे, म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र /डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२६ रोजी २० ते २८ वर्षे दरम्यान असावे. एससी, एसटीतील उमेदवारांना ५ वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे. सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना ८५० रुपये तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये फी भरणे आवश्यक आहे. या भरतीच्या जाहिराती लिंक आणि अर्ज करण्याची लिंक आम्ही खाली दिली आहे.

IBPS Clerk Bharti 2026 Update

  • पदाचे नाव – लिपिक
  • पदसंख्या – 11403 पदे (महाराष्ट्र १०५१ पदांची भरती होणार आहे)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – भारत भर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन लिंक वरून अर्ज सादर करू शकता
  • वेतनश्रेणी – 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480 (20 Years)
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 1 ऑगस्ट  2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट  2026
Advertisement

या नवीन भरतीच्या जाहिरातीमुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन’कडून २-टप्प्यांच्या (2-Tier) निवड प्रक्रियेद्वारे सहभागी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील ‘कस्टमर सर्व्हिस असोसिएट’ (सीएसए – लिपिक संवर्ग) पदांच्या ११,४०३ रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची पुणे विस्तृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे आर्थिक वर्ष २०२७-२८ साठी उमेदवारांची निवड केली जाईल. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क ८५० रूपये आहे, तर SC, ST आणि PwD उमेदवारांना फक्त १७५ रुपये शुल्क लागू आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. बँकिंग क्षेत्रात सुरक्षित आणि चांगल्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही आयबीपीएस क्लर्क भरती खरोखरच एक मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट नियमित तपासून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. उमेदवार गुणवत्तेनुसार व पसंतीक्रमानुसार या बँकांमध्ये नियुक्त केले जातील. हि भरती म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे!

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (एससी/एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार इतर राखीव प्रवर्गांनाही लागू असलेल्या सवलती मिळतील. निवड झालेल्या उमेदवारांना २४ हजार ५० रुपये ते ६४ हजार ४८० रुपये प्रतिमहिना इतके वेतन मिळणार आहे. याशिवाय विविध भत्ते आणि बँकिंग सेवेत उपलब्ध असलेल्या इतर सुविधांचाही लाभ मिळणार असल्याने ही भरती तरुणांसाठी आकर्षक ठरत आहे. तसेच मित्रांनो लक्षात ठेवा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक माहिती आणि वैयक्तिक तपशील अचूक भरावेत. अर्जामध्ये कोणतीही चूक राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. बँकिंग भरतीसाठी १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट २०२६ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदसंख्या किती आहे?

11403 पदे (महाराष्ट्र १०५१ पदांची भरती होणार आहे)

अर्ज पद्धती काय आहे?

ऑनलाईन लिंक वरून अर्ज सादर करू शकता

Advertisement
शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण कुठे आहे?

भारत भर

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

21 ऑगस्ट 2026