Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » खुशखबर! नोकर भरतीचे सुधारित आरक्षण, आरोग्य व्यवस्था; राज्य मंत्रिमंडळाचे ७ धडाकेबाज निर्णय – New Arakshan GR Maharashtra State
Last Updated:

खुशखबर! नोकर भरतीचे सुधारित आरक्षण, आरोग्य व्यवस्था; राज्य मंत्रिमंडळाचे ७ धडाकेबाज निर्णय – New Arakshan GR Maharashtra State

New Arakshan GR Maharashtra State – सरकारी ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक म्हत्वाचाच अपडेट समोर आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात बैठकीत आज सात धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडा, आरोग्य, वस्त्रोद्योग आणि विधी व न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यात सरकारी नोकरी संदर्भातील काही महत्वाचे आरक्षण नियम सुद्धा जाहीर झाले आहे. राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू करण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहकार्याने नवा प्रकल्प राबवण्यास आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे नवीन सत्र न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणावरही या बैठकीत चर्चा झाली. आता या बैठकीत खेळाडूंच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर करण्यात आले आहे. खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द करण्यात आले आहेत.

New Arakshan GR Maharashtra State
तसेच मित्रांनो, क्रीडा क्षेत्रात जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षणाबाबतचे सुधारित धोरण लागू करण्यात येत आहे. हे आरक्षण मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महानगरपालिका, शासकीय उपक्रम, मंडळे, महामंडळे अशा सर्व प्रकारच्या संस्था, मंडळांच्या आस्थापनेवर गट-अ, ब, क आणि ड मधील सरळसेवेच्या पदांसाठी खेळाडूंना पाच टक्के समांतर आरक्षण लागू राहणार आहे. आरक्षणाबाबत धोरणात सुसूत्रता आणि एकसंधता आणण्यासाठी यापूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले असून एकत्रित सुधारित धोरणासंबंधीचा शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Advertisement

सोबतच सरकार द्वारे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी “प्रगती (PRAGATI – Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration)” प्रकल्प. प्रकल्प सन २०२६-२०३१ या कालावधीत राबविण्यात येणार. त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास व त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास मान्यता दिलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणावरही या बैठकीत चर्चा झाली. आता या बैठकीत खेळाडूंच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, विधि व न्याय विभागाशी संंबंधितही काही निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एकूण सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी “प्रगती (PRAGATI – Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration)” प्रकल्प. प्रकल्प सन २०२६-२०३१ या कालावधीत राबविण्यात येणार. त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास व त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास मान्यता. (सार्वजनिक आरोग्य विभाग)