Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » नीट-यूजी परीक्षेसाठी वेळेआधीच केंद्रावर पोहोचा! -NEET UG 2026 Exam Update
Last Updated:

नीट-यूजी परीक्षेसाठी वेळेआधीच केंद्रावर पोहोचा! -NEET UG 2026 Exam Update

NEET UG 2026 Exam Update

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट-पीजी परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. येत्या रविवारी, ३० ऑगस्ट रोजी देशभरात ही परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कोणतीही घाईगडबड टाळण्यासाठी निर्धारित वेळेपूर्वीच पोहोचावे, असे आवाहन राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने केले आहे.

नीट-यूजीच्या परीक्षेला उशीर म्हणजे थेट प्रवेश नाकारला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधीच पोहोचणे अत्यावश्यक आहे. परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी अहवाल कक्ष बंद करण्यात येणार असून, त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेसाठी रंगीत छायांकित हॉल तिकिटाची प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. याशिवाय वैध सरकारी छायाचित्र ओळखपत्रही आवश्यक असून, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना किंवा छायाचित्रासह आधारकार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

Advertisement

परीक्षा केंद्रात काय न्यावे आणि काय नेऊ नये, याबाबत विद्यार्थ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात मोबाइल, टॅबलेट, कॅल्क्युलेटर, पेनड्राइव्ह, इअरफोन, ब्लूटूथ उपकरणे, स्मार्टवॉच, कॅमेरा, पेजर, कृत्रिम प्रज्ञायुक्त चष्मे, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर यांसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच छापील किंवा हस्तलिखित साहित्य, नोट्स, प्लास्टिक पाऊच, पेन, पेन्सिल, रफ पेपर, लेखन पॅड, खोडरबर, पाकीट, गॉगल, हँडबॅग, पट्टा, टोपी, हातमोजे आदी वस्तूंनाही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर पाण्याची बाटली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी बायो-ब्रेकची परवानगी नसणार असून, परीक्षा सुरू झाल्यानंतरच आवश्यकतेनुसार बायो-ब्रेक घेता येणार आहे.

NEET UG 2026 Exam Update


The National Testing Agency (NTA) has officially scheduled the NEET UG 2026 re-examination for June 21, 2026. Those candidates who need to change their preferred city of examination on account change in their present address may do so by visiting NTA Official Website https://neet.nta.nic.in from 15th May to 21st May 2026. The window for updation of present address and choice of city shall be available till 21st May 2026 (Upto 23:50 hrs) only. For students who do not opt for this facility, their existing choice of city will be retained. No requests for any change will be entertained thereafter.

एमबीबीएस व निमवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची ‘राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदवी’ अर्थात ‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील परीक्षार्थी व पालक वर्ग संतप्त झाला असतानाच आता २१ जून २०२६ रोजी फेरपरीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी केली. ‘नीट-यूजी’ परीक्षेत प्रचंड अनियमितता व गैरप्रकार घडत असल्याचे आरोप होत असल्यामुळे आगामी वर्षापासून ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा संगणकावर आधारित घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

NEET UG Admit Card 2026

NEET UG Admit Card 2026 : National Testing Agency (NTA) has declared the hall tickets of NEET UG 2026. The exam will be conducted on the 03rd of May 2026. Candidates visit neet.nta.nic.in to download the admit card.

देशासह राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएमार्फत नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट : अंडरग्रॅज्युएट २०२६ (नीट यूजी) परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या २२ लाख विद्यार्थ्यांसाठी नीट-यूजी हॉल तिकीट एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन तपशील टाकून हॉल तिकीट मिळवता येणार ३ मे रोजी राज्यात राज नीट परीक्षा आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन प्रवेशपत्र पाठविले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. नीट-यूजी परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे ३ मे २०२६ रोजी लेखी स्वरूपात एकाच दिवशी आणि एकाच सत्रात घेतली जाईल. यंदा, नीट-यूजी परीक्षा देशभरातील ५५२ शहरांत आणि १४ परदेशी केंद्रांवर होणार आहे. परीक्षेची वेळ दुपारी २ ते सायं. ५ पर्यंत असेल. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम neet. nta. nic. in या वेबसाइटला भेट द्यावी.

How to Download NEET UG Admit Card

  • नीट एनटीएची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा.
  • होमपेजवर, ‘नीट यूजी 2026 प्रवेशपत्र डाउनलोड करा’ लिंक वर क्लिक करा
  • एक नवीन पेज खुले होईल.
  • अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा.
  • तुमचे नीट यूजी 2026 प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

नीट-यूजी परीक्षेसाठी वेळेआधीच केंद्रावर पोहोचा! -NEET UG 2026 Exam Update

Download NEET Admit Card 2026


NEET UG Admit Card 2025

NEET UG Admit Card 2022 : National Testing Agency (NTA) has declared the hall tickets of NEET UG 2025. The exam will be conducted on the 4th of May 2025. Candidates visit neet.nta.nic.in to download the admit card. Further details are as follows:-

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांसाठी देशपातळीवर घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट यूजी) रविवार, ४ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना १ मे रोजी प्रवेशपत्र उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीतर्फे (एनटीए) जाहीर करण्यात आली. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही सामाईक परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी २३ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली होती. यंदा ही परीक्षा ४ मे रोजी एनटीएतर्फे एकाच दिवसात आणि एकाच सत्रात घेतली जाणार आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर दुपारी दोन ते पाच या वेळेत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

Download NEET Admit Card 2025

NEET UG 2025 Admit Card

विद्यार्थ्यांना एनटीएच्या https://www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्रे डाउनलोड करता येणार आहे. संकेतस्थळावर जाऊन होम पेजवरील प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून विद्यार्थ्यांना लॉग इन करावे लागेल. विद्यार्थ्यांच्या लॉग इनवर प्रवेशपत्र उपलब्ध होणार असून ते डाउनलोड किंवा त्याची प्रिंट घेता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • नीट यूजी 2025 देणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्वाची अपडेट आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) कडून नीट यूजी 2025 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.
  • परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना विद्यार्थी प्रवेशपत्राची वाट पाहत होते.
  • नीट प्रवेशपत्र जाहीर केल्यानंतर, उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट -neet.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतील.

How to Download NEET UG Admit Card

  • नीट एनटीएची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा.
  • होमपेजवर, ‘नीट यूजी 2025 प्रवेशपत्र डाउनलोड करा’ लिंक वर क्लिक करा
  • एक नवीन पेज खुले होईल.
  • अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा.
  • तुमचे नीट यूजी 2025 प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
Download NEET Admit Card 2025