Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » सावधान! नाशिक पशुसंवर्धन विभागाच्या भरतीच्या जाहिराती बनावट! – Nashik Pashusavardhan Vibhag Bharti
Last Updated:

सावधान! नाशिक पशुसंवर्धन विभागाच्या भरतीच्या जाहिराती बनावट! – Nashik Pashusavardhan Vibhag Bharti

Nashik Pashusavardhan Vibhag Bharti – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची सूचना! मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील विविध पदांच्या भरतीबाबत समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या जाहिराती बनावट व अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुषंगाने समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातींमुळे बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अनधिकृत जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. त्या मुळे उमेदवारांनी सावध होऊन अशा जाहिरातीवर कोणताही आर्थिक व्यवहार किंवा कोणतीही माहिती शेयर करू नये.

Nashik Pashusavardhan Vibhag Bharti

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना आणि सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसंदर्भात शासनस्तरावर प्रक्रिया सुरू असली, तरी शासनाने अथवा पशुसंवर्धन विभागाने अद्याप अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. समाजमाध्यमांद्वारे प्रसारित झालेले पदभरतीचे पत्रक बोगस व अनधिकृत आहे.

Advertisement

शासनाची पदभरती शासनाने दिलेल्या पोर्टलवरच होते. त्यामुळे सध्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील पदभरतीच्या बोगस जाहितीस बळी पडू नये, असेही आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. बेडक्याळे यांनी केले आहे.