खुशखबर! मुंबईला नवीन नैना ज्वेलरी पार्कमध्ये १६ लाख नोकऱ्यांचा पाऊस! – NAINA Jewellery Park Jobs
NAINA Jewellery Park Jobs – महाराष्ट्रातील नोकरीच्या सगोधात असलेल्या उमेदवारांसाठी एन आनंदाची आणि महत्वाची बात्म्क समोर आली आहे. मित्रानो, महाराष्ट्राला जागतिक रत्न व आभूषण उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनविण्याच्या उद्देशाने नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला जागतिक दागिने उद्योगात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याची क्षमता असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. सुमारे २२ एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पातून २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. २०२८ च्या अखेरीस प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारताच्या एकूण रत्न व आभूषण निर्यातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक निर्यात महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबईतून होते, असे फडणवीस यांनी नमूद केले. मुंबईतील झवेरी बाजार आणि भारत डायमंड बोर्स यांसारख्या केंद्रांमुळे राज्यात या उद्योगाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. मात्र, जागतिक व्यापारातील बदल आणि अमेरिका व चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील घडामोडींमुळे उद्योगांसमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. या परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन प्रक्रल्पामुळे महाराष्ट्रात लाखो प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
This is a very significant day. Under the aegis of the Gem and Jewellery Export Promotion Council, a new India Jewellery Park is being developed in Mahape, Navi Mumbai. It will be the country’s largest and most modern facility of its kind. An investment of approximately Rs 50,000 crore is planned, creating employment opportunities for 100,000 people
मुंबई आणि महाराष्ट्राकडे कुशल कारागीर, अनुभवी उद्योजक, व्यापाराचे विस्तृत जाळे आणि अनुकूल औद्योगिक वातावरण आहे. या सामर्थ्याचा उपयोग करून राज्याला जागतिक दागिने उद्योगातील प्रमुख केंद्र बनविण्याची संधी इंडिया ज्वेलरी पार्कच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. हा प्रकल्प राज्यातील रत्न व आभूषण उद्योगाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल. आजपासून ३० ते ४० वर्षांनंतर या प्रकल्पाकडे मागे वळून पाहताना त्याचे महत्त्व लक्षात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. प्रकल्पाच्या उभारणीत यापुढे विलंब होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इंडिया ज्वेलरी पार्कची संकल्पना २०१७ मध्ये मांडण्यात आली होती. त्यानंतर जमीन उपलब्ध करून देणे, आवश्यक करार, सवलती आणि निविदा प्रक्रिया अशा विविध टप्प्यांतून हा प्रकल्प पुढे आला. मार्च २०१९ मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. आता प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण झाल्याने उभारणीच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याचे उद्दिष्ट असून, दागिने उत्पादन, संशोधन, रचना, कौशल्यविकास आणि निर्यातीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राने स्वतंत्र जेम्स अँड ज्वेलरी धोरण तयार केले असून, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून त्याची आखणी करण्यात आली आहे. लॅब-ग्रोन डायमंड उद्योगाच्या विस्तारासाठीही राज्यात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.