नागपूर महानगरपालिका भरती निकाल जाहीर! | Nagpur Mahanagarpalika Result
NMC Nagpur Bharti Result
NMC Nagpur Bharti Result : The Nagpur Municipal Corporation has officially declared the interview results for the contractual post of Technical Assistant under the Metropolitan Surveillance Unit (MSU).
नागपूर महानगरपालिकेच्या मेट्रोपॉलिटन सर्वेलन्स यूनिट (MSU) अंतर्गत ‘तांत्रिक सहाय्यक’ (Technical Assistant) कंत्राटी पदासाठी घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष मुलाखतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
NMC Nagpur Bharti Result – normalisation score
नागपूर महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द जाहीरात क्र.३९९/पी.आर दि.२२.०८.२०२५ मधील कनिष्ठ लिपीक, लेखापाल / रोखपाल, डेटा मॅनेजर, ग्रंथालय सहायक, सिस्टीम अॅनॉलिस्ट, विधी सहायक, कर संग्राहक, प्रोग्रामर तसेच हार्डवेअर इंजिनियर या पदांकरीता लेखी परीक्षा घेण्यात आलेली असून त्याअनुषंगाने उमेदवारांची प्रारुप निवड व प्रतिक्षा यादी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर Website:www.nmcnagpur.gov.in यावर दिनांक. २०/०२/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिका (NMC) दुसरी रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे. खालील लिंक वरून लॉगिन करून आपण डाउनलोड करू शकता. या साठी उमेदवारांनी प्रथम लॉगिन करून आपली PDF डाउनलोड करावी.
जाहिरात क्र. ८०४/पीआर दि. २३.१२.२०२४ अन्वये, नागपूर महानगरपालिकेतील’ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक, नर्स परीचारीका (जी.एन.एम) व वृक्ष अधिकारी या पदांची रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा दि. २०.०३.२०२५ ते दि. २७.०३.२०२५, या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. वरील पदांकरीता लेखी परीक्षेचा निकाल दि. १५.०५.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड/प्रतिक्षा यादी प्रमाणे ५२१ उमेदवाराचे सुचनापत्र दि. २५.०६.२०२५. अन्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादीमधील एकुण ५२१ उमेदवारांची खालील तक्ता-अ येथे नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या /प्रमाणपत्रांच्या पडताळणी दि. ०८.०७.२०२५ ते दि. १०.०७.२०२५ या कालावधीमध्ये खालील नमूद ठिकाणी सकाळी ९.३० ते सांयकाळी ०६.०० यावेळेत करण्यात येणार आहे. यास्तव, उमेदवारांस सर्व संबंधित कागदपत्रांसह खालील नमूद ठिकाणी तक्ता-अ येथे नमूद दिनांक व वेळेस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. उमेदवाराने खालील तक्त्यात नमुद केलेल्या वेळेस व दिनांकाचे दिवशी पडताळणीकरीता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पडताळणीकरीता अनुपस्थित राहणा-या उमेदवारांचे नाव निवडयादीमधून कमी करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
कागदपत्रे पडताळणीकरीता उपस्थित राहावयाचे ठिकाण
नागपूर महानगरपालिका, नागपूर छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१
NMC भरती कागदपत्र पडताळणी यादी लिंक
NMC निवड आणि प्रतीक्षा यादी लिंक
मागील निकाल
कनिष्ठ अभियंता Final Merit list
Junior Engineer Civil – Ranked by Normalized Marks
Civil Engineer Assistant – Normalized Marks with Rank
Check Normalisation List of Candidates
Check Normalisation List of Candidates Link 2
Nagpur Mahanagarpalika Result : नागपूर महानगरपालिका अंतर्गत एन सी डीसी दिल्ली यांचेद्वारे Metropolitan Surveillance Unit प्रस्तावित आहे. त्यानुसार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी पदभरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. पुढील पदे प्राध्यान्याने Metropolitan Surveillance Units मधील विविध कामकाज सुरुवात करणे करिता भरती करणे आवश्यक असल्याने प्रसिध्द जाहिरात मधील आवश्यक अटी व शर्ती नुसार अर्ज व जोडलेले कागदपत्र यांची पडताळणी करून दिनांक २६ नोवेंबर २०२४ रोजी प्रसिध्द करून आक्षेप मागविण्यात आलेले होते. एकूण ६ आक्षेप प्राप्त झाले होते. त्याबाबत दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी कागदपत्र पडताळणी समिती द्वारे प्राप्त आक्षेप यांचे पडताळणी करण्यात आली व १ आक्षेप मान्य होवून ते उमेदवार पात्र ठरलेले आहे. तसेच ईतर पात्र उमेदवार यांचे कागदपत्रांची पुनःच्छ फेर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये Admin Officer या पदाच्या उमेदवार डॉ. प्राची रोडे यांना PG पश्चात आवश्यक ५ वर्षाचा अनुभव नसल्याने अपात्र करण्यात आले. त्यानुसार अंतिम पात्र अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत असून पात्र उमेदवार यांची मुलाखत दिनांक 18./1/२०२४ रोजी ठेवण्यात आलेली आहे. या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| 1 | 16/12/2024 | Metropolitan Surveillance Unit 4 Posts Interview Notice with Final Eligible Non-Eligible List Interview 18 Dec.2024 | Download |
Nagpur Mahanagarpalika Result PDF
Nagpur Mahanagarpalika Result : आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील अंतर्गत ठराविक एकत्रित मानधनावर करार पध्दतीवर पुर्णतः कंत्राटी स्वरुपात एक्स-रे टेक्निशीअन ही पदे भरण्याकरीता जाहिरात वर्तमानपत्रात व ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज स्विकृतीचा कालावधी दि. ०३/१२/२०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत होता. कार्यालयात एकुण ३९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारांना आक्षेप असल्यास किंवा माहितीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास त्यांनी दि. १६/१२/२०२४ ते १८/१२/२०२४ या कालावधीत सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत आक्षेप कार्यालयात सादर करावे. नमुद वेळेनंतर प्राप्त आक्षेप ग्राहय धरता येणार नाही. आक्षेप समक्ष कार्यालयात सादर करावे. ई-मेल द्वारे प्राप्त आक्षेपांचा विचार केल्या जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घेण्यात यावी. या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| 1 | Result | NMC NAGPUR X-RAY TECHNICIAN ELIGIBLE & NOT ELIGIBLE LIST | Download |