Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » नागपूर सुधार प्रन्यास मध्ये ५० टक्के पदे रिक्त; अनुभवी अभियंत्यांते त्रस्त!! | NIT Nagpur Bharti 2026
Last Updated:

नागपूर सुधार प्रन्यास मध्ये ५० टक्के पदे रिक्त; अनुभवी अभियंत्यांते त्रस्त!! | NIT Nagpur Bharti 2026

Nagpur Improvement Trust Bharti 2026

नागपूर शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) मधील तांत्रिक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विभागातील तब्बल ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना, २०१३ च्या बॅचमधील अभियंत्यांची पदोन्नती गेल्या पाच वर्षापासून रखडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे अनुभवी अभियंत्यांची कमतरता आणि दुसरीकडे पात्र अभियंत्यांच्या पदोन्नतीला विलंब, अशा विरोधाभासी स्थितीमुळे शहराच्या विकासकामांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अंतर्गत मंजूर तांत्रिक सेवा नियमांनुसार, २०१३ च्या बॅचमधील वरिष्ठ अभियंते २०२०-२१ पासून ‘सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (गट-अ)’ या पदासाठी पात्र आहेत. या संवर्गातील २६ पैकी १९ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पात्र अभियंत्यांमध्ये असंतोष वाढला आहे. या विलंबामुळे महाराष्ट्र शासनाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयासह केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावाही संबंधित वरिष्ठ अभियंत्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, जुलै २०२२ ते मार्च २०२६ या कालावधीत विभागीय पदोन्नती समितीच्या (डीपीसी) पाच बैठका झाल्याची माहिती आहे. २३ एप्रिल २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयाला लेखी आश्वासनही देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही पदोन्नतीचे अंतिम आदेश निघालेले नसल्याने प्रशासनाच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही अधिकाऱ्यांना कागदोपत्री पदोन्नती देण्यात आली असली, तरी त्यांन पदस्थापना आणि संबंधित कामकाजाची जबाबदारी (पोर्टफोलिओ) देण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

अनुभवी आणि तांत्रिकदृष्ट्य सक्षम अभियंत्यांना जबाबदारीच्य पदांवर संधी देण्याऐवजी पदोन्नतीची प्रक्रिया लांबणीवर पडत असेल, तर त्याचा फटका केवळ संबंधित कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर संस्थेच्य कार्यक्षमतेलाही बसू शकतो. शहरातील पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाच्य प्रकल्पांसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि सक्षम नेतृत्व आवश्यक असताना, रिक्त पदे व रखडलेल्या पदोन्नतींचा हा पेच नासुप्रच्या प्रशासकीय कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतो.


Nagpur Improvement Trust Bharti 2026 : Nagpur Improvement Trust Nagpur , Applications are invited for the post of “Legal advisor”. There are 14 vacant post available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for application submission is 2nd February 2026 . For more details about Nagpur Improvement Trust Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .

नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर अंतर्गत “विधी सल्लागार” पदांच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०२६ आहे.

Advertisement

Nagpur Improvement Trust Recruitment 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, सदर, नागपूर 440001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ फेब्रुवारी २०२६
  • अधिकृत वेबसाईट -www.nitnagpur.org

NIT Nagpur Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
विधी सल्लागार 14

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For NIT Nagpur Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी सल्लागार Law degree

Salary Details For NIT Nagpur Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी सल्लागार रु. 40,000/-

How To Apply For Nagpur Improvement Trust Application 2026

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/CK7FP
✅ अधिकृत वेबसाईट www.nitnagpur.org

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अर्ज पद्धती काय आहे?

ऑफलाईन

नोकरी ठिकाण कुठे आहे?

नागपूर

पदाचे नाव काय आहे?

विधी सल्लागार

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)