अग्निशामक विभागातील भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करा!! – Nagpur Fire Brigade Bharti 2026
Nagpur Agnishamak Vibhag Bharti 2026
महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागातील अग्निशामक (फायरमन-रेस्क्यूअर) पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून विदर्भातील पात्र युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक अतुल कोटेचा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेने अग्निशामक पदांची भरती त्यावेळी लागू असलेल्या शासनमान्य सेवा प्रवेश नियमांनुसार सुरू केली होती. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटी) तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयएलएसजी) यांच्या अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रमांना वैध शैक्षणिक पात्रता म्हणून मान्यता होती. या निकषांनुसार मोठ्या संख्येने उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. मात्र, ९ जूनला शासनाने सुधारित सेवा प्रवेश नियम लागू करीत अग्निशामक पदाच्या शैक्षणिक पात्रतेत बदल केला. या बदलामुळे एमएसबीटी आणि एआयएलएसजीच्या अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रमांना मान्यता दिली नाही. परिणामी, भरती जाहिरातीनुसार पात्र असलेले अनेक उमेदवार नव्या नियमांनुसार अपात्र ठरत आहेत, याकडेही कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता
७ जानेवारीला नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एमएसबीटी आणि एआयएलएसजी अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीनंतर दोन वर्षांच्या आत राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा आवश्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अटीवर संधी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
थेट भरतीद्वारे भरणार पदे
अग्निशामक विमोचकची (गट-क) पदे थेट भरतीने भरली जातील. यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण व अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. रुजू झाल्यानंतर १ वर्षाच्या आत हलके वाहन चालवण्याचा परवाना बंधनकारक राहील. मुख्य अग्निशमन अधिकारी (गट-अ) हे पद पदोन्नतीने किंवा प्रतिनियुक्तीने भरले जाईल, तर विभागीय अग्निशमन अधिकारी (गट-ब) पदासाठी २० टक्के थेट भरती आणि ८० टक्के पदोन्नती राहील. थेट भरतीतील उमेदवारांसाठी २ वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी असेल.
नवीन नियमावलीनुसार थेट भरतीसाठी घालण्यात आलेल्या अटी व शर्थी
- छोटे कुटुंब घोषणापत्र : नियुक्त होणाऱ्या
-
उमेदवारांना छोटे कुटुंब घोषणापत्र देणे बंधनकारक असेल. दोनपेक्षा जास्त अपत्ये असणारे उमेदवार शासकीय सेवेसाठी अपात्र ठरतील.
शारीरिक पात्रता : थेट भरतीसाठी पुरुष - उमेदवाराची उंची १६५ से.मी. व वजन ५० कि.ग्रॅ., तर महिला उमेदवाराची उंची १५७ से.मी. व वजन ४६ कि.ग्रॅ. असणे आवश्यक आहे. दृष्टी चषयाशिवाय ६/६ असावी.
वयोमर्यादा व प्रशिक्षण : खुल्या वर्गासाठी ३८ वर्षे, तर मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे वयोमर्यादा असेल. तसेच सध्या कार्यरत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी विहित अग्निशामक प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही, त्यांना ते पूर्ण करण्यासाठी २ वर्षांची मुदत दिली आहे.
नागपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन विभागास मोठ्या मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बराहाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागात मंजूर ८७२ पदांपैकी केवळ ११९ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ७५३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने ३५० तांत्रिक पदांच्या भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये २९७ अग्निशामक, २८ चालक-ऑपरेटर, १३ उपअधिकारी आणि ७ सहाय्यक स्टेशन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम नियुक्तीसाठी आणखी तीन ते चार महिने लागू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या चार वर्षांत नागपुरात सुमारे ८५ हजार नवीन घरांची भर पडली असून शहराची लोकसंख्या ३६ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन विभागाची क्षमता वाढविणे अत्यावश्यक असल्याचे नागरिक आणि सामाजिक संघटनांनी म्हटले आहे.
Nagpur Agnishamak Vibhag Bharti 2026
Nagpur Municipal Corporation has approved 807 posts for 12 centers of Fire Brigade Now. The Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2026for various vacancies will be final in next 7 days. it will be good Job Opportunity for locals in Nagpur. Currently, only 126 employees and officers are working. The Disaster Management Department is working on the basis of 55 contractual employees and 45 trainees at the Kalamana Training Center for assistance. The Fire Department is working on the basis of 7 times less employees. For the same reason, the decision to recruit trainee firefighters for 4 months was taken as per the government rules on the eve of the monsoon season. Keep visiting us for more updates about Nagpur Agnishamak Vibhag Bharti 2026.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज असून, त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. जुलै महिन्यात ८० अग्निशमन विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचे कंत्राट संपत आहे. त्यामुळे नवीन १०० कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती अग्निशमन व विद्युत समितीच्या सभापती रूपाली ठाकूर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या चर्चेदरम्यान मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते उपस्थित होते. ठाकूर यांनी सांगितले की, अग्निशमन विभागातील रिक्त पदांसंदर्भात आवश्यक तो पत्रव्यवहार केला जात आहे. लवकरच ३५० पदांच्या भरती प्रक्रियेचा जीआर (शासकीय आदेश) जारी होईल, तुषार बाराहाते यांनी सांगितले की, ३५० पदांच्या भरतीमधील अडचणी जवळपास दूर झाल्या आहेत. संबंधित पदभरतीचा जीआर लवकरच निघण्याची शक्यता असून, मान्सूनदरम्यान ही प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज आहे.
शहराचा वाढता विस्तार पाहता २२ अग्निशमन केंद्रांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, शहरात असे काही भाग आहेत, जिथे आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. ही स्थिती पाहता आणखी ४ नवीन केंद्रांसह एकूण २६ केंद्रांचा प्रस्ताव तयार केला जात आहे. शहरातील १३ अग्निशमन केंद्रांसाठी ८७० मंजूर पदे आहेत. परंतु, सध्या केवळ १२० कायमस्वरूपी कर्मचारी, ५५ कंत्राटी कर्मचारी, मनपाच्या विविध विभागांचे ६५ कर्मचारी आणि ८० अग्निशमन सेवेशी जोडलेले विद्यार्थी यांच्या भरवशावर अग्निशमन विभागाचे कामकाज सुरू आहे. तुषार बाराहाते यांनी मान्य केले की, विभाग सध्या कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहे; तरीही कार्यरत कर्मचारी ८ तासांची ड्युटी संपल्यानंतरही अतिरिक्त काम करून पूर्ण निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
लोकसंख्येच्या अनुपातानुसार २ लाख लोकसंख्येसाठी १ अग्निशमन केंद्राची गरज आहे. अशात उपराजधानीची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यानुसार २० अग्निशमन केंद्रांची आणि १३०० वर कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, सध्या ११ अग्निशमन केंद्रांद्वारे १२० कर्मचाऱ्यांच्या बळावर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अग्निशमन विभागात ८७२ पदे मंजूर असून, कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता आणि कामाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिकारी स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कार्यरत असलेल्या १२० कर्मचाऱ्यांपैकी येत्या दोन महिन्यांत २० कर्मचारी निवृत्त होणार आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून अग्निशमन विभागातील पदभरतीचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाने अडवून ठेवला असल्याने कर्मचारीच नाहीत, तर कामे कशी करायची? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते. गेल्या सहा महिन्यांत आगीच्या २०० च्यावर घटना घडल्या असून, रेस्क्यू कॉलही ५०० च्यावर आहेत.
भरतीचा प्रस्ताव नगरविकास विभागात धूळखात – मनपाच्या अग्निशमन विभागात ३५० भरतीची जाहिरातही प्रकाशित झाली होती. महिलांच्या उंचीवरून पेच निर्माण झाल्याने अग्निशमन सेवा शर्तीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव मनपाने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे गेल्या ८ महिन्यांपूर्वी पाठविला होता. परंतु, नगरविकास विभागाच्या लालफितशाहीमुळे हा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. विशेष म्हणजे, नगरविकास विभागाने राज्यातील इतर महानगरांना भरतीची परवानगी दिली. नागपूरची मात्र प्रलंबित ठेवली आहे.