Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » मुंबई रेल्वे पोलिस आणि RPF मध्ये तब्बल २,५५९ पदे रिक्त!! – Mumbai Railway Police Bharti
Last Updated:

मुंबई रेल्वे पोलिस आणि RPF मध्ये तब्बल २,५५९ पदे रिक्त!! – Mumbai Railway Police Bharti

Mumbai Railway Police Bharti 2026

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून रोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात, मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी रेल्वे सुरक्षा यंत्रणाच अपुऱ्या मनुष्यबळामुळे कमकुवत झाली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यंत्रणांमध्येच तब्बल दोन हजार ५५९ पदे रिक्त आहेत. रेल्वे पोलिस आणि आरपीएफमधील मनुष्यबळाच्या गंभीर तुटवड्यामुळे स्थानके, फलाट आणि लोकलमधील सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अलीकडील दोन हत्यांच्या घटनांनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकलमध्ये गर्दी वाढत असताना दुसरीकडे घटत्या सुरक्षाव्यवस्थेने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

अलीकडील दोन खूनांच्या घटनांनंतर लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जानेवारी २०२६ मध्ये चर्चगेट–बोरिवली लोकलमध्ये झालेल्या वादातून प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांची हत्या झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत २३ जून रोजी चर्चगेट–नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून प्रवासी मयंक लोहार यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या सलग घटनांमुळे लोकलमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisement

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकात लोहमार्ग (रेल्वे) पोलिस प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळतात. रेल्वे परिसर आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफवर असते. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील आरपीएफमध्ये मिळून ७,०४२ मंजूर पदांपैकी केवळ ५,२२६ कर्मचारी कार्यरत असून १,८१६ पदे रिक्त आहेत. पश्चिम रेल्वेवरील मुंबई आरपीएफसाठी एकूण १,८९४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १,३७४ जागा भरल्या असून उर्वरित ५२० रिक्त आहेत. मध्य रेल्वेसाठी एकूण ५,१४८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३,८५२ जागा भरल्या असून उर्वरित १,२९६ रिक्त आहेत. त्यामुळे रेल्वे फलाट, स्थानके, लोकल गाड्या, पादचारी पूल आणि संवेदनशील ठिकाणी पुरेशा प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करणे मोठे आव्हान ठरत आहे. रेल्वे पोलिस आणि आरपीएफ यांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दल आणि होमगार्ड यांची मदत घेण्यात येते. ते केवळ सहाय्यक स्वरूपात काम करतात. त्यांना आरपीएफ किंवा पोलिसांप्रमाणे कायदेशीर अधिकार नसल्यामुळे ते गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करू शकत नाहीत.
दुसरीकडे, मुंबई रेल्वे पोलिसांकडे एकूण ४,२०० मंजूर पदांपैकी केवळ ३,५०० कर्मचारी कार्यरत आहेत. ७४३ रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नव्याने भरती कर्मचाऱ्यांचे सध्या नऊ महिन्यांचे प्रशिक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच त्यांची नियुक्ती होणार आहे, असे मुंबई रेल्वे पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, रिक्त पदांचा परिणाम कार्यरत कर्मचाऱ्यांवर होतो. त्यांना अनेकदा १२-१२ तास ड्युटी करावी लागत असल्याने त्यांच्यावरील ताण वाढ असल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी दिली.

रेल्वे प्रवासी सुरक्षेची जवाबदारी असलेल्या सुरक्षा यंत्रणांत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सध्या प्रत्येक आरपीएफ चौकीत २५ ते ३० पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिक्रमण रोखणे, प्रवाशांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करणे आणि नियमित गस्त घालणे यावर मोठा परिणाम होतो. रिक्त पदे तातडीने भरून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही रेल्वे प्रशसनाची जबाबदारी आहे,’ अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते आणि निर्धार विकलांग विकास संघाचे अध्यक्ष नितीन अ. गायकवाड यांनी दिली.

मुंबई रेल्वे पोलिस आणि RPF मध्ये तब्बल २,५५९ पदे रिक्त!! – Mumbai Railway Police Bharti


Mumbai Railway Police Bharti 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

हे उमेदवार वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी व समांतर आरक्षण पडताळणीमध्ये पोलीस शिपाई पदावर नियुक्तीसाठी पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया राबवली आहे, असेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस नियमावली १९९९ भाग-१ मधील नियम ६३ मधील अधिकारानुसार या उमेदवारांना रेल्वे पोलीस दलात पोलीस शिपाई (गट-क) या संवर्गात (सातव्या वेतन आयोगातील) मॅट्रिक्समधील वेतन स्तर एस-७रुपये २१ हजार ७००-६९ हजार १०० व विशेष वेतन ७५० रुपये (अधिक नियमानुसार वेतन व भत्ते) या वेतनावर लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर येथे सदर नियुक्ती केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या नियुक्तीबाबत काही अटी व शर्ती असून, नियुक्ती ही पूर्णतः अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची राहील. शासनास आपल्या सेवेची आवश्यकता नसल्यास कोणत्याही प्रकारचे कारण न दर्शवता अथवा आगाऊ सूचना न देता केव्हाही सेवेतून सेवामुक्त करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.


Mumbai Railway Police Recruitment 2025 – Applications are invited from candidates who are eligible according to the post to fill the total 743 vacancies of police constable posts under Mumbai Railway Police Bharti 2025. The application is to be done online. Online application will start on 29th October 2025 . The last Date to Apply for this Mumbai Railway Police Recruitment is 30th November 2025. T he official website of the Mumbai Railway Police Department is mumbairlypolice.gov.in. More details about Mumbai Railway Police Bharti 2025 are given below:-

मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 743 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

Mumbai Railway Police Bharti 2025

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

  • पदाचे नाव पोलीस शिपाई
  • पद संख्या 743 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण मुंबई
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – mumbairlypolice.gov.in

Important Information Regarding Mumbai Railway Police Bharti Exam 2025

पोलीस भरती 2025 महत्वाच्या लिंक्स

✅ पोलीस भरती २०२५ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
✅ पोलीस भरती २०२५ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅ पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅ पोलीस भरती २०२५ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती
✅ पोलीस भरती २०२५ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच
✅ Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2025
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2025 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Mumbai Railway Police Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या
पोलीस शिपाई 743

How to Apply For Mumbai Lohmarg Police Jobs 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने http://policerecruitment2025.mahait.org/ पोर्टल द्वारे करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

Mumbai Railway Police Recruitment – Selection Process

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.

👉 ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
https://shorturl.at/XJiml
📑 PDF जाहिरात शिपाई
https://t.co/z03s6GmWkw
✅ अधिकृत वेबसाईट
www.mumbairailwaypolice.gov.in

Mumbai Lohmarg Police Bharti 2025 Details

Mumbai Railway Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is Started Now. The Mumbai District Police Bharti Official PDF advertisement link is given above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentioned here. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?

पुढील मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे

Police Bharti 2021

Maharashtra Police Bharti 2025

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम
20 गुण
एकूण गुण – 100

Physical Eligibility For Mumbai Railway Police Driver Bharti 2025

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1550 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks

Mumbai Railway Police Driver Recruitment 2025

Mumbai Railway Police Driver Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Mumbai Railway Police Bharti

  • General Category Age Details
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details
18 to 33 Years

Physical Eligibility For Mumbai Railway Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वयोमर्यादा किती आहे?

खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती काय आहे?

ऑनलाइन

पदाचे नाव काय आहे?

पोलीस शिपाई

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

30 नोव्हेंबर 2025

Selection Procedure For Mumbai Railway Police Recruitment 2025

  • Mumbai Lohmarg Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1550 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.

पोलीस भरती महत्त्वाचे कागदपत्रे

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
    ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

Police Bharti Required Documents List

  • Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
  • Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
  • MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
  • The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
    Identity card, updated bank passbook, Aadhaar card
  • Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
  • Attested photocopies of certificates
  • Caste certificate validity
  • Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
  • Certificate of Financially Backward
  • Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players