Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महापालिकेतील उद्यान विभागात विविध अनेक पदे रिक्त, नवीन भरती जाहिरात..!! – Mumbai Mahanagar Palika Bharti 2026
Last Updated:

महापालिकेतील उद्यान विभागात विविध अनेक पदे रिक्त, नवीन भरती जाहिरात..!! – Mumbai Mahanagar Palika Bharti 2026

Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

मुंबईत झाडे पडून आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असूनही, महापालिकेच्या उद्यान विभागाला कर्मचारी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. विभागातील ३६ महत्त्वाची पदे बऱ्याच काळापासून रिक्त आहेत. यामुळे शहरातील धोकादायक आणि सडत चाललेल्या झाडांची ओळख, तपासणी आणि त्यांच्यावर वेळेवर कारवाई करण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे आणि त्यांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडतात. या घटनांमध्ये अनेकदा वाहनांचे नुकसान होते, तर काही प्रकरणांमध्ये नागरिकांचा मृत्यूही होतो. असे असूनही, झाडांची नियमित तपासणी आणि धोकादायक झाडांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. मिळालेल्या माहितीनुसार, उद्यान विभागातील विविध महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या कर्मचारी तुटवड्यामुळे उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार वाढत आहे. मुंबईसारख्या विशाल महानगरात हजारो झाडांवर देखरेख ठेवण्यासाठी, त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी पुरेसे तज्ञ आणि कर्मचारी आवश्यक आहेत.

अगोदरच प्रभावी यंत्रणा विकसित करावी
पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे झाडे पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेळेवर झाडांचे सर्वेक्षण करणे आणि आवश्यक कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, जर विभागात पदे रिक्त असतील, तर वेळेवर तपासणी आणि कारवाई कशी केली जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, अपघात झाल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी प्रशासनाने अगोदरच प्रभावी यंत्रणा विकसित केली पाहिजे. धोकादायक झाडे कोण ओळखणार आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे.

Advertisement

जुहू येथील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात जाहीर झालेल्या ३९ पदांच्या भरतीमुळे महापालिकेच्या रोजगार धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही भरती प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीसाठी नसून कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून अल्पावधीत सेवा समाप्त करण्याच्या धोरणाचा भाग असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या भरतीमध्ये एमबीबीएस व एमडी डॉक्टर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, ईसीजी व एक्स-रे तंत्रज्ञ तसेच इतर तांत्रिक पदांचा समावेश आहे. मात्र, सर्वच पदांसाठी केवळ ८९ दिवसांच्या तात्पुरत्या करारावर नियुक्ती देण्यात येणार असून, कायमस्वरूपी नोकरी, सेवेत सातत्य किंवा भविष्यातील सुरक्षिततेची कोणतीही हमी देण्यात आलेली नाही.

नियुक्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवली जाणार असून, एका दिवसाच्या अनुपस्थितीवरही वेतन कपात करण्याची अट ठेवण्यात आली आहे. तसेच काम समाधानकारक नसल्याचे कारण देत कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवला आहे.

Advertisement

या भरतीसाठी उमेदवारांकडून ९३४ रुपयांचे अर्ज शुल्क आकारले जात असून, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारावर स्वाक्षरी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार अप्रत्यक्षपणे मर्यादित केला जात असल्याचा आरोप होत आहे.

कूपर रुग्णालयातील ही भरती मोहीम केवळ तरुणांच्या भवितव्याला धक्का देणारी नसून, सरकारी रुग्णालयांना कंत्राटी व्यवस्थेच्या कारखान्यांमध्ये रूपांतरित करण्याचा धोकादायक पायंडा ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये एकूण मंजूर पदांपैकी सुमारे ४५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. जन स्वास्थ्य अभियानाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहायक, लॅब आणि एक्स-रे तंत्रज्ञ, परिचारिका, वॉर्ड बॉय तसेच स्वच्छता कर्मचारी अशा सर्वच स्तरांवर मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. यामुळे तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया आणि दैनंदिन सेवा यांचा वेग मंदावला आहे.

या तीनही रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज बारा हजारांहून अधिक रुग्ण येतात, त्यापैकी पाचशे ते सहाशे रुग्णांना दररोज दाखल करावे लागते. केईएम रुग्णालयात प्रयोगशाळा सहायकांची सर्व पदे रिक्त आहेत. सायन रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापकांची संख्या अत्यल्प असून नायर रुग्णालयातही विविध विभागांत मोठी पोकळी आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका गरीब आणि गरजू रुग्णांना बसत असल्याचे चित्र आहे. स्थायी भरती करण्याऐवजी ठेक्यांवर भर देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू आहे, असे मत जन स्वास्थ्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले आहे. आरक्षण धोरणातील बदलांमुळे प्राध्यापका भरतीला विलंब झाला असून लवकरच नियुक्त्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालक डॉ. नीलम अंदाडे यांनी दिली आहे.

सायन रुग्णालयातील रिक्त पदे: सायन रुग्णालयात ९९ मंजूर प्राध्यापक पदांपैकी ५४ पदे रिक्त आहेत. १३८ सहयोगी प्राध्यापक पदांपैकी ४० पदे रिक्त आहेत. २२५ सहाय्यक प्राध्यापक पदांपैकी १५३ पदे रिक्त आहेत. सर्व २३ प्रयोगशाळा सहाय्यक पदे रिक्त आहेत. ७१ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांपैकी दहा पदे, ४४ एक्स-रे तंत्रज्ञ पदांपैकी १९ पदे रिक्त आहेत. शिवाय, ४४ औषध वितरक पदांपैकी २३ पदे रिक्त आहेत

नायरमधील रिक्त पदे :नायर रुग्णालयात, प्राध्यापकांच्या ७८ पैकी ३१ पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या ११५ पैकी २९ पदे रिक्त आहेत आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या १८४ पैकी १३२ पदे रिक्त आहेत. लॅब टेक्निशियनच्या ६६ पैकी ३० पदे, एक्स-रे टेक्निशियनच्या ४५ पैकी २८ पदे आणि परिचारिकांच्या ९९ पैकी २७ पदे रिक्त आहेत

केईएममध्ये प्रयोगशाळा सहायकांची सर्व पदे रिक्त :केईएम रुग्णालयातील प्राध्यापकांच्या १०६ मंजूर पदांपैकी ४० रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या १६८ पदांपैकी ५० पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहायकांच्या ३३ पैकी सर्व पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या २७ पैकी १० पदे रिक्त आहेत. सहायक तंत्रज्ञांच्या ७२ पैकी ६१ पदे रिक्त आहेत. एक्स-रे तंत्रज्ञांच्या ५२ पैकी ३० पदे रिक्त असून परिचारिकांची १३ पदे रिक्त आहेत


Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयांमध्ये कार्यकारी अभियंत्यांची कमतरता भासत होती. परिणामी अनेक वॉर्डांत सहाय्यक अभियंत्यांकडून प्रभारी पद्धतीने कामकाज चालवले जात होते. मात्र, आता या रिक्त पदांच्या भरतीसाठी मोठी पावले उचलण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाने मॅकेनिकल संवर्गातील ५६ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सिव्हिल संवर्गातील २९ दुय्यम अभियंत्यांनाही सहाय्यक अभियंता पदावर बढती मिळणार आहे. एकूण ८५ अभियंत्यांच्या पदोन्नतीसाठी झालेल्या बैठकीला नुकतीच महापालिका पदोन्नती समितीने हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती नगर अभियंता विभागातील सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या अनेक विभागांमध्ये कार्यकारी अभियंता आणि पदनिर्देशक अधिकारी (डी.ओ.) ही पदे बराच काळ रिक्त होती. त्यामुळे विकासकामांवर परिणाम झाला असून, बेकायदा बांधकामांच्या प्रकरणात वाढ झाली होती. प्रभारी अभियंते या समस्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याने प्रशासनावर टीका होत होती.

आता पुर्णवेळ कार्यकारी अभियंते नियुक्त झाल्याने विभागीय कामकाजात गती येणार असून, विकास प्रकल्प आणि बेकायदा बांधकामांवरील कारवाईला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या ए ते टी अशा २४ विभाग कार्यालयांपैकी जवळपास १५ ते २० विभागात ही रिक्तता जाणवत होती. काही ठिकाणी सहाय्यक अभियंतेच कार्यकारी पदावर काम पाहत होते, तर काही वॉर्डांत ही जबाबदारी सहाय्यक आयुक्तांकडे होती. नव्या पदोन्नतीनंतर हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.

यांना अद्यापही ब्रेक
सिव्हिल संवर्गातील सहाय्यक अभियंता पदावरील १६० पदांची न्यायालयीन प्रक्रिया अर्थात केस सुरु असल्याने या संवर्गातील अभियंत्यांच्या कार्यकारी अभियंता पदावरील पदोन्नतीला ब्रेक लागला आहे. यामुळे ज्याची न्यायालयात केस सुरु नाही, अशा अभियंत्यांचे प्रमोशन करण्याचा निर्णय पालिका प्रशासकाने घेतल्याने ८५ अभियंत्यांच्या प्रमोशनाचा मार्ग मोकळा झाला आहे

या विभागात होणार नियुक्ती
विभाग कार्यालय (परिरक्षण) विभाग
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग
घनकचरा व्यवस्थापन विभाग
जलकामे, गार्डन, रस्ते विभाग
इमारत व प्रस्ताव विभाग


Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

या रिक्त जागांमुळे कार्यरत कर्मचारी, कामगारांवर कामाचा ताण पडत आहे. काही कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहात आहेत. नवीन पाइपलाइन जोडणी, पाणीगळती तपासणे व रोखणे, पाणी वितरणाच्या कामावरही या रिक्त जागांमुळे परिणाम होत आहे. पाणी विभागाच्या कामात जेथे चार कामगार लागतात तेथे दोन कामगारांवरच काम करावे लागत असल्याचे दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले. त्यामुळे अनेक जण पदोन्नतीपासून वंचित राहात आहेत. रिक्त व पदोन्नतीची पदे भरणे, पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा फायदा देणे, अतिकालिन भत्ता योग्य पद्धतीने देणे, कामगारांच्या चौक्यांची पुनर्बाधणी करून आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात याव्यात. चौकीवरून कामाच्या जाण्या-येण्यासाठी वाहन उपलब्ध करणे इत्यादी मागण्या मुंबई महापालिकेच्या विभागाकडे केल्या आहेत. या मागण्यांसाठी जल अभियंता विभागातील कामगारांनी नुकतेच महापालिकेच्या वरळी हब येथे आंदोलनही केले.


मुंबई महानगरपालिका हद्दीतील ७८२ अतिरिक्त शिक्षकांना मुंबईतच नियुक्ती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी शिक्षण उपसंचालकांनी पालिकेला शिक्षकांची यादी दिली असून, लवकरच हे शिक्षक कार्यरत असतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.मुंबईतच शिक्षकांची मोठी टंचाई असून, १,१२६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे हे अतिरिक्त शिक्षक त्या रिक्त जागांवर समायोजित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे पालिकेतील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे.

पालिकेच्या मागणीला मिळाला प्रतिसाद

महानगरपालिकेने शिक्षक टंचाईचा मुद्दा शिक्षण उपसंचालक राजेंद्र केंकळे यांच्याकडे उपस्थित केला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने तात्काळ ७८२ शिक्षक मुंबईत समायोजित करण्यास मंजुरी दिली.

शिक्षण गुणवत्तेसाठी महत्वाचा निर्णय

या निर्णयामुळे पालिका शाळांमध्ये विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर सुधारेल. अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. आता मुंबईतील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार असल्याने शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.

अधिकाऱ्यांची होती मागणी

शिक्षक भरती न झाल्याने अतिरिक्त शिक्षकांचा योग्य वापर कसा करता येईल, यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी दबाव वाढवला होता. त्यानुसार आता मुंबईतच समायोजन करून तात्काळ सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शिक्षक समायोजनामुळे मुंबईच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, लवकरच शाळांमध्ये नव्याने शिक्षक वर्गात हजेरी लावतील.


Mumbai Mahanagarpalika Staff Nurse Salary Update

मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांत प्राध्यापकांच्या आणि अन्य अधिकाऱ्यांच्या ८२१ मंजूर जागांपैकी ५८७ जागा रिक्त आहेत. ही पदे लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरली जाणार आहेत. तोपर्यंत ३४७ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयांमधील रिक्त जागांबद्दल भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईत चार वैद्यकीय महाविद्यालये असून एक नायर दंतमहाविद्यालय आहे. एकूण ८२१ पदापैकी ५८७ पदे रिक्त आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

आता ‘ई-डिजिटल’ ग्रंथालय
राज्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या १० वैद्यकीय महाविद्यालयांसह १२ महाविद्यालयांमध्ये ई-डिजिटल ग्रंथालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आशियाई विकास बँकेकडून मिळणाऱ्या योजना आधारित कर्जाच्या मंजूर अनुदानातून ४७ कोटी १२ लाख ४२ रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.


मुंबई महापालिकेने पर्यावरण वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ अहवाल प्रकाशित केला. यासाठी भांडवली खर्च १७,०६६.१२ कोटी, तर महसुली खर्च ३,२६८.९७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. मात्र काही वर्षांपासून अभियांत्रिकी संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, पर्यावरण व वातावरणीय विभागाला कामे करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ती भरण्यासाठी वारंवार नगर अभियंता विभागाकडे प्रस्ताव व स्मरणपत्रे देण्यात आली आहेत, परंतु नगर अभियंता विभागाकडून त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पर्यावरण विभागाकडून करण्यात येत आहे.

मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात झालेल्या बदलांवर अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु या विभागातील रिक्त पदांवर अभियंते भरण्यासाठी नगर अभियंता विभाग आदेश निर्गमित करत नसल्याने पर्यावरण व वातावरणीय विभागाला आहे त्या अभियंत्यांच्या जीवावर काम करावे लागत आहे. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे
लागत आहे. महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या पर्यावरण वातावरणीय बदल विभागात सध्या उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता ही महत्त्वाची पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरण विभागात
पालिकेच्या २४ वॉडाँसाठी ३७ दुय्यम अभियंता पदे मंजूर झाली आहेत. मात्र ती नगर अभियंता विभागाने अद्यापही भरलेली नाहीत. यासंदर्भात पर्यावरण विभागाने पाठविलेल्या प्रस्तावांकडे नगर अभियंता विभाग दुर्लक्ष करत आहे.


महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमधील नवनियुक्त कर्मचारी परिचारिकांपैकी बहुतांश परिचारिकांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. पगार मिळविण्यासाठी रुग्णालयातील प्रशासकीय विभाग आणि महापालिका मुख्यालयात चकरा मारूनही त्यांना पगार कधी मिळणार याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने परिचारिका हतबल झाल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात स्टाफ नर्सच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी ३४ हून अधिक नवनियुक्त परिचारिकांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या समस्येबाबत नोबल नर्सिंग युनियनच्या माध्यमातून परिचारिकांचा एक गट शुक्रवारी महापालिका मुख्यालयात गेला होता. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते. युनियनच्या अध्यक्षा कल्पना गजुला म्हणाल्या की, यापूर्वी आचारसंहितेमुळे प्रशासनाने कर्मचारी नसल्याचे कारण दिले होते आणि जानेवारीत ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही अनेकांना पगार मिळू शकलेला नाही. महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकारीही वेतनाबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर देत नसल्याचे त्यांनी सांगितले.


Mumbai Mahanagar Palika Bharti 2025 : आरोग्य केंद्रांमध्ये जून महिन्यात नियुक्त झालेल्या १७८ परिचारिकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३९ परिचारिकांचे वेतन जानेवारी महिन्यात दिले जाईल, तर उर्वरित ३९ परिचारिकांचे वेतन फेब्रुवारी महिन्यात दिले जाणार आहे. शुक्रवारी आरोग्य विभागातील विविध कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये त्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिकांची कमतरता लक्षात घेऊन प्रशासनाने जून महिन्यात १७८ सहाय्यक परिचारिका प्रसविकांची नियुक्ती केली होती. मात्र, सांकेतांक क्रमांक तयार करण्यास झालेल्या विलंबामुळे या परिचारिकांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून रखडले होते. परिणामी, अनेक परिचारिकांना उपासमारीचा सामना करावा लागत होता.

याशिवाय स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अवेक्षक रिक्त पदे भरणे, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे, तसेच संनिरीक्षण विभाग, क्षयरोग विभाग, कुटुंब कल्याण व माता-बाल संगोपन विभागातील प्रलंबित पदभरती यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्त्वाखाली कर्मचाऱ्यांनी एफ दक्षिण विभाग कार्यालयावर मोर्चा काढला.

बैठकीतील निर्णय:

  • १७८ परिचारिकांपैकी १३९ परिचारिकांचे सहा महिन्यांचे थकीत वेतन आणि डिसेंबरचे वेतन जानेवारीत दिले जाईल.
  • उर्वरित ३९ परिचारिकांच्या कागदपत्रांतील अडचणी दूर करून त्यांचे वेतन फेब्रुवारीत देण्याचे आश्वासन आरोग्य विभागाने दिले.
  • स्वच्छता निरीक्षक व कनिष्ठ अवेक्षक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत २६ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे ठरले.
  • ‘ड’ वर्गातील ड्रेसर कर्मचाऱ्यांना संगणकीय कामातून व ‘क’ वर्गातील कर्मचाऱ्यांना औषधनिर्माण विभागातील कामातून मुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी बैठकीतील या निर्णयांबाबत माहिती दिली