एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२६ चे सविस्तर वेळापत्रक जाहीर !! | MSBAE 2026
MSBAE 2026
The official schedule for the Government Drawing Grade (Elementary and Intermediate) Examinations 2026 has been announced by the Maharashtra State Board of Art Education . This year, the examinations will be conducted from September 28 to October 1 , 2026, wherein the Elementary exam will take place on September 28 and 29, followed by the Intermediate exam on September 30 and October 1. The examinations will test students across various subjects, including Object Drawing, Memory Drawing, Design, Geometry, and Lettering. According to Vinod Dandge, Director of the Directorate of Arts, all center registrations, school updates, and student applications must be submitted online along with the exam fee. The online registration process is set to begin on July 10, with the deadline for regular applications open until August 20. Interested students, parents, and participating schools are advised to visit the official website at msbae.org.in for registration and further details.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा ही परीक्षा २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडणार असून, एलिमेंटरी परीक्षा २८ व २९ सप्टेंबर रोजी तर इंटरमिजिएट परीक्षा ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी घेतली जाईल. या परीक्षांमध्ये वस्तुचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र आणि भूमिती व अक्षरलेखन अशा विविध विषयांचा समावेश असेल. मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षांसाठीची सर्व केंद्र नोंदणी, शाळांची माहिती आणि विद्यार्थ्यांचे अर्ज परीक्षा फीसह ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. यासाठी १० जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून, नियमित अर्ज भरण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शाळांनी अधिकृत माहितीसाठी आणि नोंदणीसाठी msbae.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.