Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ : मुलाखतीस पात्र दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी !! | MPSC Update for Divyang Candidates
Last Updated:

राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ : मुलाखतीस पात्र दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी !! | MPSC Update for Divyang Candidates

MPSC Update for Divyang Candidates

राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५ मधून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी आता पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील विशेष वैद्यकीय मंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलाखतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांनी संबंधित वैद्यकीय तपासणीबाबतची माहिती लक्षात घेणे आवश्यक आहे.

mpsc divyang news

mpsc divyang news-1


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ मध्ये दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत अथवा भरपाई वेळ मिळवण्यासाठी ५ जूनपर्यंत पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. केवळ ऑनलाइन मुख्य अर्जात या सवलतीचा दावा करणे पुरेसे नसून, आयोगाची स्वतंत्र लेखी परवानगी असल्याशिवाय परीक्षा केंद्रावर ही सवलत दिली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. आयोगाने सोमवारी (ता. १) परिपत्रक प्रसिद्ध केले. लेखनिकाची मदत किंवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या उमेदवारांनी विनंती अर्ज आवश्यक कागदपत्रांसह [email protected] या ई-मेल आयडीवर ५ जूनपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

Advertisement

आयोगाच्या परिपत्रकानुसार, दिव्यांग उमेदवाराने परीक्षेसाठी सोबत आणलेल्या लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता केवळ १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना प्रपत्र १ किंवा प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि नमुना क्रमांक ११ ही कागदपत्रे ई-मेलद्वारे सादर करावी लागतील.

मात्र, अंधत्व, दोन्ही हात बाधित असलेले किंवा दोन्ही हात नसलेले शारीरिक दिव्यांगत्व आणि मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांना नमुना क्रमांक ११ सादर करण्यापासून सूट दिली आहे. उमेदवारांसाठी आवश्यक असणारे विहित प्रपत्र १, प्रपत्र २ आणि नमुना क्रमांक ११ आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mpsc.gov.in उपलब्ध करून दिले आहेत. या प्रक्रियेसंदर्भात काही शंका असल्यास, आयोगाच्या ०२२-६९३८५९८३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिव्यांग उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ मे २०२५ पासून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरती जाहिरातींसाठी, दिव्यांग उमेदवारांनी त्यांचा दिव्यांग तपशील केंद्र सरकारच्या ‘स्वावलंबन’ पोर्टलवरून विधिग्राह्य (व्हॅलिडेट) केलेला असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा, अशा उमेदवारांना पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश एमपीएससीने दिले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी एक मोठा बदल करण्यात आलाय. 1 मे 2025 पासून जे कोणी दिव्यांग उमेदवार अर्ज करत असतील, त्यांना केंद्र सरकारच्या स्वावलंबन पोर्टल वरून मिळणारं दिव्यांग सर्टिफिकेट आणि वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड बंधनकारक झालं आहे.

Advertisement

राज्य शासनाच्या २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार, दिव्यांग व्यक्तींना आरक्षण व अन्य सुविधांचा लाभ देण्यासाठी ‘स्वावलंबन’ पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व ‘यूडीआयडी’ (UDID) कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एमपीएससीने देखील त्याच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये दिव्यांग उमेदवारांना त्यांचा यूडीआयडी क्रमांक व संबंधित तपशील भरता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

उमेदवारांनी त्यांच्या खात्यामधील दिव्यांग तपशील स्वावलंबन पोर्टलवरून अचूक तपासून ‘व्हॅलिडेट’ करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, दिव्यांगत्वाची टक्केवारी, यूडीआयडी क्रमांक व वितरण दिनांक असे सर्व तपशील अचूकपणे भरावे लागतील. तपशील एकदा अचूक भरल्यावर ‘Validate’ बटणावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.

विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांकडे केंद्र शासनाचे प्रमाणपत्र नाही , पण राज्य शासनाच्या एसएडीएम (SADM) पोर्टलवरून मिळवलेले प्रमाणपत्र आहे, त्यांनी देखील यूडीआयडीसाठीचा नोंदणी क्रमांक अनिवार्यपणे नोंदवावा लागेल. तसेच, मुलाखतीपूर्वी यूडीआयडी कार्ड सादर करणे बंधनकारक असेल.

एमपीएससीने सर्व दिव्यांग उमेदवारांना लवकरात लवकर आपले तपशील व्हॅलिडेट करून घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अर्ज करताना किंवा निवड प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही.

तपासणी कडक होणार

  • उमेदवाराचं नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार, आणि UDID कार्डवरील व खात्यातील जन्मतारीख ही सगळी माहिती एकमेकांशी जुळली पाहिजे.
  • ही माहिती योग्य असल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • म्हणूनच MPSC ने उमेदवारांना सांगितलंय की, ही प्रोसेस वेळेत पूर्ण करा.