Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » News » एमपीएससीच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर !! | MPSC State Services Examination Result
Last Updated:

एमपीएससीच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर !! | MPSC State Services Examination Result

MPSC State Services Exam

Advt.No.001/2026 State Services Main Examination 2025 – Results of written exam. For the information of the candidates, the present result—along with the  category wise (cut-off marks)—has been published on the Commission’s website.Applicants can check their result through below link.

जाहिरात क्र. ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ – लेखी परीक्षेचा निकाल. उमेदवारांच्या माहितीसाठी, हा निकाल आणि त्यासोबत प्रवर्गनिहाय ‘कट-ऑफ’ गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवार खालील लिंकद्वारे आपला निकाल पाहू शकतात.

Advertisement

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ – निकालाबाबतची घोषणा


अंतिम निवड होऊनही एमपीएससीच्या दिरंगाईमुळे ७६ भावी निरीक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. एकाच उमेदवाराच्या वैद्यकीय अहवालामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अडकल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी पदासाठी अंतिम निकाल जाहीर होऊन अनेक महिने उलटून गेले तरी आयोगाकडून अद्याप शिफारसपत्रे देण्यात आलेली नाहीत.

प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखतींच्या टप्प्यांनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाते. त्यानंतर आयोगाकडून शिफारसपत्रे संबंधित विभागांना पाठविल्यानंतर उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होतो. मात्र, यावर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत ही प्रक्रिया रखडली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर निरीक्षण अधिकारी पुरवठा या संवर्गातील ७६ उमेदवारांना अद्याप कोणतीही सूचना देण्यात आली नाही. वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी, कागदपत्रांची शासकीय छाननी आणि नियुक्ती आदेश या सर्व प्रक्रिया आयोगाच्या शिफारशीवर अवलंबून आहेत. मात्र, आयोगाच्या विलंबामुळे त्यांना मानसिक ताण सहन करावा लागत आहे.

एका उमेदवारामुळे प्रक्रिया रखडली?
पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी पदाच्या निवड यादीतील एका उमेदवाराचे दोन वेगवेगळे वैद्यकीय अहवाल समोर आल्यामुळे आयोगाने संपूर्ण संवर्गाची शिफारस प्रक्रिया थांबवून ठेवल्याची चर्चा आहे. आयोगाने यासंदर्भात पारदर्शक भूमिका घेऊन तातडीने निर्णय जाहीर करावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

Advertisement

MPSC State Services Main Exam Result

महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे दिनांक २७ ते २९ मे, २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल दिनांक ८ एप्रिल, २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.

MPSC Rajyaseva Result

MPSC State Services Result : The final result of the State Service (Main) Examination-2024, conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC) from May 27 to May 29, 2025, has been published on the Commission’s website on April 8, 2026. Accordingly, candidates are being recommended for a total of 461 posts across 20 different cadres. For the information of the candidates, the present result—along with the marks obtained by the last recommended candidate in each category (cut-off marks)—has been published on the Commission’s website.

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२४ – अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) दिनांक २७ मे ते २९ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४’ चा अंतिम निकाल दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, २० विविध संवर्गांमधील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी, सदर निकाल—तसेच प्रत्येक प्रवर्गातील शिफारसपात्र ठरलेल्या अंतिम उमेदवाराने प्राप्त केलेले गुण (कट-ऑफ गुण)—आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ – निकालाबाबतची घोषणा


MPSC State Services Result : MPSC  State Services Main Examination 2025 Results are out for various Posts. Revised List of candidates eligible for Scribe and/or Compensatory time  Check the result from following given Link.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

पात्र उमेदवारांची सुधारित लिस्ट डाउनलोड करा


MPSC Rajyaseva Result : Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025, State Services List of Qualified Candidate has been Published. Candidate can check their result from below link.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, राज्यसेवा परीक्षेची पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण PDF डाउनलोड करू शकता.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ पात्र उमेदवारांची यादी


MPSC Rajyaseva Prelims Result 2025

मित्रांनो, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ढिसाळपणाचा फटका पुन्हा एकदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे. अनेक उमेदवार आपल्या निकालाची प्रतीक्षा बघत आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतात मात्र आयोगाकडून वेळेत निकाल जाहीर केला जात नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदा नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यसेवा परीक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ होऊन तीन महिने झाले तरी अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. वेळेत निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली आहे. मात्र खात्रीशीर सूत्रने दिलेला माहितीनुसार, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २५ ते २८ तारखेपर्यंत राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळणारच नाही या तारखांमध्ये हे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आयोगाच्या या धोरणामुळे मुख्य परीक्षेच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, यूपीएससीची परीक्षा पद्धत स्वीकारणाऱ्या आयोगाला त्यांची तत्परता का स्वीकारता येत नाही? असा संतप्‍त सवाल आता विचारला जात आहे. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही अंतिम निकालाबाबत आयोग मूग गिळून गप्प आहे. विशेष म्हणजे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित आहे. निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती सखोल अभ्यासासाठी केवळ ४० दिवसांचा कालावधी उरणार आहे.

वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याचे सांगत, आयोग जाणीवपूर्वक उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर ढकलत असल्याचा आरोप परीक्षार्थी करत आहेत. पुण्यासारख्या शहरात राहून मेस, खासगी रुमचा खर्च सोसणाऱ्या उमेदवारांवर आर्थिक-मानसिक तणाव वाढत असल्‍याचे चित्र आहे. गेल्या वर्षीही मुख्य परीक्षेसाठी वेळ मिळत नाही म्हणून आंदोलन करावे लागले होते, यंदाही तीच परिस्थिती ओढवली आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थी नितीन आंधळे यांनी दिली. आयोगाने तातडीने निकाल जाहीर करावा आणि या विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्याने केली. अन्यथा, हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा परीक्षार्थी देत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ च्या तात्पुरत्या वेळापत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, जाहिरात न आल्याने राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५ राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. निकाल तयार करण्यासाठी प्रचंड विलंब झाल्याने आता लवकरच निकाल जाहीर करण्याची तयारी आयोगाने केली आहे. यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार असून मुख्य परीक्षेत येणाऱ्या उमेदवारांना केवळ एकच महिना मिळणार असल्याने त्यांनाही दिलासा देण्याचा विचार आयोगाचा असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२४ – सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मेरिट लिस्ट डाउनलोड लिंक

MPSC Result Main 2025

Advt. No. 040/2024 Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination 2022 – Announcement regarding Final Result  – जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ – गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


MPSCआयोगा द्वारे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 – गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणी ची लिंक सुरु झाली आहे. उमेदवार खालील लिंक वरून लॉगिन करून फेरपाडताळणीची प्रक्रिया करू शकतात.

MPSC फेरपाडताळणी लिंक

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एका उमेदवारामुळे प्रक्रिया रखडली?

पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी पदाच्या निवड यादीतील एका उमेदवाराचे दोन वेगवेगळे वैद्यकीय अहवाल समोर आल्यामुळे आयोगाने संपूर्ण संवर्गाची शिफारस प्रक्रिया थांबवून ठेवल्याची चर्चा आहे. आयोगाने यासंदर्भात पारदर्शक भूमिका घेऊन तातडीने निर्णय जाहीर करावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.