MPSC पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा २०२३ : गुणपत्रक, उत्तरपत्रिका व फेरमोजणीबाबत महत्त्वाची सूचना !! | MPSC PSI Result 2026
MPSC PSI Result 2026
MPSC PSI Result 2026 – Advt. No. 047/2024 Police Sub Inspector Limited Departmental Competitive Mains Examination – 2023 – Announcement Regarding Marks Statement, Scanned Answer sheet and Retotalling of Mark.
जाहिरात क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा – २०२३ – गुणपत्रक, स्कॅन केलेली उत्तरपत्रिका आणि गुणांची फेर-मोजणी (Retotalling) यांबाबतची सूचना.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- २०२३ च्या परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल दिनांक १७ ऑगस्ट, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे.प्रस्तुत निकालाद्वारे अंतिम शिफारशीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES” मधील “View Marksheet” या वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करू इच्छिणा-या उमेदवारांना फेर पडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.
Advertisementया संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSI PSI Merit List : Advt. No. 047/2024 Police Sub Inspector Limited Departmental Competitive Mains Examination – 2023 – Final Merit List Published. Candidate can check their result from below link.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३, निकाल आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांपैकी ०१ पदाचा निकाल प्रशासकीय कारणास्तव राखुन ठेवण्यात आला असून उर्वरित ६१४ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक २० मे, २०२६ रोजी जाहीर करण्यात येत आहे.
सदर निकालात राखुन ठेवलेल्या एका पदाचा निकाल जाहीर केल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या शिफारस यादीतील गणवत्ताक्रम अंतिम करण्यात येईल, त्यानसार उमेदवारांच्या गणवत्ता क्रमामध्ये बदल होईल.