Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC राज्यसेवा पुन्हा वस्तुनिष्ठ पद्धतीने? परीक्षा पद्धतीतील बदलांबाबत नवीन अपडेट.. – MPSC Objective Exam Update
Last Updated:

MPSC राज्यसेवा पुन्हा वस्तुनिष्ठ पद्धतीने? परीक्षा पद्धतीतील बदलांबाबत नवीन अपडेट.. – MPSC Objective Exam Update

MPSC Objective Exam Update – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Exam Update Details Latest Update News) २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी लागू केलेल्या वर्णनात्मक पद्धतीला आता पुन्हा विरोध सुरू झाला आहे. ही परीक्षा पूर्वीप्रमाणे वस्तुनिष्ठ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात घ्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून करण्यात येत आहे. शासकीय भरती परीक्षांमधील सुधारणा सुचवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समिती समोरही हा मुद्दा मांडण्यात आला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात पुन्हा बदल होणार का, याकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले असताना परीक्षा बाबत काय निर्णय होणार यावर लोकसत्ताशी बोलताना थेटच सांगितल. राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या राज्यातील विविध विभागीय केंद्रांवर झालेल्या बैठकांमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्याची मागणी पुढे आली आहे. वर्णनात्मक परीक्षेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित करत परीक्षेचे स्वरूप बदलण्याची सूचना काही परीक्षार्थी आणि प्रतिनिधींनी केली आहे.

MPSC Objective Exam Update

MPSC ने २०२२ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. ही पद्धत २०२३ पासून लागू करण्याचे नियोजन होते. मात्र, या निर्णयाला परीक्षार्थ्यांकडून विरोध झाल्याने अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. अखेर २०२५ पासून वर्णनात्मक पद्धतीने मुख्य परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. आता या पद्धतीच्या अंमलबजावणीनंतर पुन्हा वस्तुनिष्ठ परीक्षेची मागणी पुढे आल्याने आयोगाच्या परीक्षा पद्धतीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीचे फायदे-तोटे, परीक्षार्थ्यांच्या अडचणी आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्य परीक्षेच्या स्वरूपाबाबत चर्चा सुरू आहे. सुधारणा समितीसमोर वस्तुनिष्ठ पद्धतीच्या बाजूने मागण्या मांडल्या जात असल्या, तरी समितीच्या अंतिम शिफारसशीवर निर्णय अवलंबून राहणार आहे.

Advertisement

राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने घ्यावी की वर्णनात्मक पद्धतीने, याबाबत राज्यातील स्पर्धा परीक्षार्थ्यांचे व्यापक मत जाणून घेण्यासाठी एमपीएससीच्या अधिकृत एक्स खात्यावर ‘मतदान’ घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आयोगाच्या या एक्स खात्यावर मोठ्या संख्येने विद्यार्थी जोडलेले असल्याने त्यांच्या मतांचा थेट कौल घेण्यासाठी हे माध्यम उपयुक्त ठरू शकते, असे परीक्षार्थ्यांचे म्हणणे आहे. ट्विटरच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी यावर सर्वांचे मत जाणून घेतली. परीक्षा वर्णनात्मक हवी की वस्तुनिष्ठ यावर चर्चाही करण्यात आली. राज्यातील प्रचलित विविध परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. समिती केवळ एमपीएससी न्हवे तर सर्वच परीक्षांचा राज्यभरातील परीक्षा पद्धतींचा अभ्यास करत आहे. अनेक वर्षानंतर परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची संधी मिळाल्याने सर्व विचार करूनच परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे, असे राधा यांनी सांगितले. एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक होणार की वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार यासंदर्भात हजारो सूचना आलेल्या आहेत. वर्तमान परिस्थितीवरील परीक्षा पद्धतीचा विचार करता युपीएससीच्या धर्तीवरच ही परीक्षा राहणार असल्याची शक्यता आहे.