MPSC चा मोठा निर्णय! २ हजार ६१९ पदांची ‘गट-क’ पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा बदलल्या,परीक्षा आता ऑफलाईनच!- MPSC New Update 2026 Exam
MPSC New Update 2026 Exam – मित्रांनो, MPSC संदर्भात एक महत्वाचा नवीन अपडेट समोर आला आहे. या साठी MPSC द्वारे एक नवीन परिपत्रक जाहीर केले. काळ महजे १६ जुलै २०२६ रोजी हे नवीन परिपत्रक जाहीर केले आहे. MPSC म्हणजेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ आता ऑनलाईन (सीबीटी) ऐवजी जुन्या आणि प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन (ओएमआर आधारित) घेण्यात येईल. यासोबतच पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या नियोजित तारखांमध्येही मोठे बदल करण्यात आले असून उमेदवारांना दिलासा देत अर्ज सादर करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत शुद्धिपत्रकानुसार, गट-क सेवा अंतर्गत उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, कर सहायक आणि तांत्रिक सहायक यांसारख्या विविध विभागांतील एकूण २,६१९ रिक्त पदांसाठी ही मेगा भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यापूर्वी २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये सदर परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (सीबीटी – ऑनलाइन) पद्धतीने घेतली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.मात्र, परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयाला उमेदवारांकडून मोठा विरोध झाला होता. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागण्या आणि आयोगाकडे प्राप्त झालेली निवेदने विचारात घेऊन, प्रशासनाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय थेट जुलै २०२७ अखेरपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यामुळे यंदाची म्हणजेच २०२६ ची पूर्व परीक्षा संपूर्ण राज्यात ऑफलाईन पद्धतीनेच ओएमआर शीटवर घेतली जाईल.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून एकूण २६१९ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक २५ जून, २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित (CBT परीक्षा) पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेली मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै, २०२७ अखेर पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२६ प्रचलित पद्धतीने (Offline) OMR आधारित घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पूर्वी घोषित केलेल्या दिनांक २७ सप्टेंबर, २०२६ ऐवजी सुधारित दिनांकास, दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २०२६ दिनांक २७ डिसेंबर, २०२६ रोजी घेण्यात येईल.
MPSC Group C New Exam Date October 2026 नवे वेळापत्रक आणि सुधारित तारखा
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ : आता रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे (यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार होती).
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२६: सुधारित नियोजनानुसार रविवार, २७ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल.
MPSC Group C application form last date extended: अर्ज प्रक्रिया व शुल्क भरण्यास मुदतवाढ
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: ३१ जुलै, २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे).
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: ०३ ऑगस्ट, २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत).