Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC परीक्षेत मुलाखतीचे २७५ गुण कायम राहणार कि कमी होणार? महत्वाचा अपडेट- MPSC Interview Marks Update
Last Updated:

MPSC परीक्षेत मुलाखतीचे २७५ गुण कायम राहणार कि कमी होणार? महत्वाचा अपडेट- MPSC Interview Marks Update

MPSC Interview Marks Update – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्य परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. या बदलानंतर मुख्य परीक्षेचे गुण १,७५० वरून १,५२५ इतके करताना मुलाखतीचे २७५ गुण मात्र, कायम ठेवण्यात आले आहेत. परिणामी, अंतिम गुणवत्ता यादीत मुलाखतीच्या गुणांचा वाटा तुलनेने वाढणार असल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या संदर्भात आयोग काय बदल करणार हे बगण्यासारखे आहे. करंज इतर हे गुण फक्त २५ ते १५० च्या दरम्यान आहेत फक्त महाराष्ट्रात मुलखीतला जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. म्हणून हे महत्व कमी करण्याची मागणी होत आहे. आता यावर आयोग नेमका काय निर्णय गेली हे लवकरच समजेल..

MPSC Latest Update Details

आयोगाने हा निर्णय इतर राज्यांच्या लोकसेवा आयोगांच्या धर्तीवर घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, अनेक राज्यांत मुलाखतीचे गुण एकूण गुणांच्या तुलनेत कमी प्रमाणात ठेवण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे या निर्णयाबाबतही शंका व्यक्त होत आहे. तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीमधून वैकल्पिक, ऐच्छिक विषय वगळून त्याऐवजी अधिक एकसमान आणि प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेत सात अनिवार्य प्रश्नपत्रिका असतील. वैकल्पिक विषयांचे ५०० गुण पूर्णपणे वगळण्यात आल्याने लेखी परीक्षेचे गुण १,२५० इतके राहतील. त्यात मुलाखतीचे २७५ गुण जोडल्यास अंतिम गुणवत्ता यादी १,५२५ गुणांच्या आधारे तयार होणार आहे. अभ्यासकांच्या मते, वैकल्पिक विषय रद्द करणे स्वागतार्ह असले, तरी मुलाखतीच्या गुणांत समतोल बदल अपेक्षित होता.

Advertisement

आक्षेप का ? तज्ज्ञांच्या मते,
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित असते; तर मुलाखत ही स्वभावतः व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे लेखी परीक्षेचे गुण कमी करून मुलाखतीचे गुण पूर्ववत ठेवल्यास अंतिम गुणवत्ता यादीवर मुलाखतीचा प्रभाव वाढू शकतो. यामुळे पारदर्शकता, समान संधी आणि गुणवत्ताधारित निवडीच्या तत्त्वांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आक्षेप का ?

तज्ज्ञांच्या मते, लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित असते; तर मुलाखत ही स्वभावतः व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे लेखी परीक्षेचे गुण कमी करून मुलाखतीचे गुण पूर्ववत ठेवल्यास अंतिम गुणवत्ता यादीवर मुलाखतीचा प्रभाव वाढू शकतो. यामुळे पारदर्शकता, समान संधी आणि गुणवत्ताधारित निवडीच्या तत्त्वांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.