Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महत्वाचा अपडेट- MPSC CBT रद्द, आयोग कडून नवीन परिपत्रक जाहीर! – MPSC Group B, C Online Exam CBD
Last Updated:

महत्वाचा अपडेट- MPSC CBT रद्द, आयोग कडून नवीन परिपत्रक जाहीर! – MPSC Group B, C Online Exam CBD

MPSC Group C Online Exam – The Maharashtra Public Service Commission (MPSC Online Prelims Exam Papers) has announced a major shift to a Computer-Based Test ( MPSC CBT 2026 ) format for the Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2026. Scheduled to begin on September 27, 2026, this recruitment drive aims to fill a total of 2,619 vacancies across various state government departments. The recruitment includes 1,864 posts for Clerk-Typist, 461 for Assistant Motor Vehicle Inspector (Group C Papers 2026), 282 for Tax Assistant, 9 for Industry Inspector, and 3 for Technical Assistant. According to the Commission, transitioning to an online format will accelerate the declaration of results, ensure absolute transparency, and eliminate human intervention, thereby making the entire selection process highly secure and efficient. For coming Examinations we have given online practice Papers link below. You can practice papers in following sections.

MPSC आयोगाद्वारे एक महत्वाचा अपडेट जाहीर केले आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून एकूण २६१९ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक २५ जून, २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेली मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै, २०२७ अखेर पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२६ प्रचलित पद्धतीने (Offline) OMR आधारित घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पूर्वी घोषित केलेल्या दिनांक २७ सप्टेंबर, २०२६ ऐवजी सुधारित दिनांकास, दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २०२६ दिनांक २७ डिसेंबर, २०२६ रोजी घेण्यात येईल.

MPSC CBT Cancelled


टीसीएस/आयबीपीएस पॅटर्नमधील ‘नॉर्मलायझेशन’ ही प्रक्रिया अत्यंत अपारदर्शक आणि संशयास्पद आहे. तेव्हा वेगवेगळ्या शिफ्टमधील पेपरच्या कठीणपातळीचे कारण पुढे करून हुशार, प्रामाणिक आणि वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हक्काचे गुण कमी केले जातात. ही पद्धत विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी आहे. ऑनलाइन परीक्षांमुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटर दूरची शहरी परीक्षा केंद्रे दिली जातात. यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास, निवास आणि वाढीव शुल्काचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यातच ऐन परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाऊन होणे किंवा संगणक बंद पडणे अशा तांत्रिक अडचणी येतात. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होते. यावर ठोस उपाय काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे एमपीएससीने याआधी गट-कची मोठी परीक्षा ‘ऑफलाइन’ (ओएमआर शीट) पद्धतीने अत्यंत यशस्वी, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पाडली होती. मग कोणतीही त्रुटी नसताना किंवा विद्यार्थ्यांकडून कोणतीही मागणी नसताना अचानक यावर्षी ऑनलाइन परीक्षेचा घाट कोणाच्या फायद्यासाठी घातला जात आहे?

शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये; हा ऑनलाइन परीक्षेचा निर्णय तात्काळ रद्द करून आगामी सर्व भरती परीक्षा केवळ आणि केवळ एमपीएससीमार्फत ‘ऑफलाइन’ पद्धतीनेच घ्याव्यात, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा स्पर्धा परीक्षार्थी तथा विद्यार्थी संघटना प्रतिनिधी नितीन आंधळे यांनी दिला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Exam Papers 2026) महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६ संगणक आधारित (MPSC CBT Online Exam 2026) पद्धतीने घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेद्वारे २ हजार ६१९ पदांची भरती होणार असून, पूर्व परीक्षा २७सप्टेंबर पासून घेतली जाणार आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षेमुळे पदभरती प्रक्रिया गतिमान, पारदर्शक, मानवी हस्तक्षेपरहित होणार असल्याचे ‘MPSC’ चे म्हणणे असून, परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास विरोध करण्यात येऊ लागला आहे. ‘एमपीएससी’ने या बाबतची माहिती दिली. उद्योग निरीक्षक पदाच्या ९ जागा, तांत्रिक सहायक पदाच्या तीन जागा, कर सहायक पदाच्या २८२ जागा, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या ४६१ जागा, तर लिपिक-टंकलेखक पदाच्या १ हजार ८६४ जागांसाठीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना २७ जून ते १७ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी १७ जुलैपर्यंत, तर चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २० जुलै ही अंतिम मुदत आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘MPSC Exam CBT 2026’ ने दिली. तसेच, संबंधित पदांसाठीची पात्रता, उमेदवारांना अर्ज करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच याच स्वरूपाचे सराव पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत .

MPSC Group C Online Exam
‘MPSC’ने ही परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. ‘राज्य शासनाने सर्व पदांची भरती ‘एमपीएससी’कडे वर्ग करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

  • Maharashtra Group C Services Exam Pattern And Syllabus-परीक्षा तीन टप्प्यांत, MPSC गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड करा
  • MPSC AMVI Bharti New Exam Pattern And Syllabus PDF – 461 पदांची संगणक प्रणालीवर आधारित (Computer-Based Test) परीक्षा | सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व, मुख्य परीक्षेचा पॅटर्न