कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक व इतर 2619 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!! | MPSC Group C Services Combined Preliminary Examination 2026
MPSC Group C Services Combined Preliminary Examination 2026
MPSC Group C Services Combined Preliminary Examination 2026 : MPSC Group C (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Maharashtra Group-C (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2026”. There are total of 2619 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can apply before the last date. Applications will start from 27th June 2026 . Also, the last date to apply is 17th July 2026 . More details are as follows about MPSC Group C Services Combined Preliminary Examination 2026, visit our website policebharati.co.in.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क अंतर्गत “उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक” पदांच्या एकूण 2619 रिक्त जागा, भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज २७ जून २०२६ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ आहे.मागील वर्षीचा गट क भरतीचा पूर्ण सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
- पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक
- पदसंख्या – 2619 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.
- वयोमर्यादा – 19 – 38 वर्षे
-
अर्ज शुल्क –
- खुला वर्ग – रु. 394/-
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २७ जून २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
MPSC Group C Services Combined Preliminary Examination Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| उद्योग निरीक्षक | 09 |
| तांत्रिक सहायक | 03 |
| कर सहायक | 282 |
| सहायक मोटार वाहन निरीक्षक | 461 |
| गट-क लिपिक-टंकलेखक | 1864 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For MPSC Group C Services Combined Preliminary Examination Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| उद्योग निरीक्षक |
(अ) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
(ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. |
| तांत्रिक सहायक | — |
| कर सहायक | मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
| सहायक मोटार वाहन निरीक्षक |
(१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि
(२) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील किमान ३ वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. (३) स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील. (4) स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी/अत्युच्च अर्हता अथवा वरीलप्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळामध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक. (5) अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अॅप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहित धरला जाऊ शकेल. (6) मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान एक वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परिवीक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. |
| गट-क लिपिक-टंकलेखक | मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
Salary For MPSC Group B Services Combined Preliminary Examination Job 2026
Important Documents for MPSC Group C Prelims Bharti 2026- महत्त्वाची कागदपत्रे
How To Apply For MPSC Group C Services Combined Preliminary Examination Advertisement 2026
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Group C Bharti 2026
|
|
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/DE2pZU65A |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ocFTc |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अर्ज शुल्क किती आहे?
खुला वर्ग – रु. 394/- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294/-
वयोमर्यादा किती आहे?
19 – 38 वर्षे
पदसंख्या किती आहे?
2619 जागा
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)