Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC पशुधन विकास अधिकारी मुलाखती पोस्टपोन, नवीन वेळापत्रक जाहीर!!। MPSC Exam Interview Schedule
Last Updated:

MPSC पशुधन विकास अधिकारी मुलाखती पोस्टपोन, नवीन वेळापत्रक जाहीर!!। MPSC Exam Interview Schedule

MPSC Maharashtra Engineering Teacher Service Interview Schedule

जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, पशुधन विकास अधिकारी या पदाचा दिनांक ३ व ४ ऑगस्ट, २०२६ रोजीचा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. उपरोक्त नमुद संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या चाळणीपरीक्षेअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा पहिला टप्पा दिनांक २७ जुलै, २०२६ ते ८ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर टप्प्यातील दिनांक ३ व ४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित (मुलाखत क्रमांक २७१-२८५ व मुलाखत क्रमांक २८६-३००) या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक २४ व २५ ऑगस्ट, २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत. सदर उमेदवारांचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल. याची संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.

MPSC पशुधन विकास अधिकारी मुलाखती पोस्टपोन, नवीन वेळापत्रक जाहीर!!। MPSC Exam Interview Schedule

सेवाप्रवेश नियमांचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठी सेवा नियमांमधील शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राधान्य, तसेच कौशल्य व इतर अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. शासन निर्णयाद्वारे ५५३ संवर्गाच सेवाप्रवेश नियम सुधारित करण्यात आले आहेत. या सुधारणांचा समावेश करून सर्व विभागांनी संबंधित सेवाप्रवेश नियम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील १५ दिवसांत पुनःप्रकाशित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत विविध प्रशासकीय विभागांमधील समान संवर्गांसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने मागणीपत्र पाठवण्यापासून ते नियुक्ती देण्यापर्यंतची गुंतागुंतीची व दीर्घकाळ सुरू राहणारी स्वतंत्र्य भरतीप्रक्रिया राबवली जात होती. संयुक्त परीक्षेसाठी समान संवर्गांचे वर्गीकरण करण्यात आल्यामुळे आता एमपीएससीच्या गट- अव गट- ब मधील सहा सेवांव्यतिरिक्त १८ नवीन सेवा निर्माण करण्यात आल्या आहेत.

Advertisement

लवकरच जाहिराती येणार
नवीन नियम जाहिरात निघाल्यानंतरच्या पदांसाठी लागू असतील. आधीच सुरू असलेल्या भरतीवर ते परिणाम करणार नाहीत. काही विशेष भरती (जसे शिक्षक, पोलिस) पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

पदोन्नती आणि प्र तिनियुक्तीला प्राधान्य
काही राजपत्रित व अराजपत्रित १ पदे थेट मुलाखतीने भरण्याऐवजी पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरली जातील. यामुळे विभागीय कर्मचाऱ्यांना प्रगतीची अधिक संधी मिळणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेल्या प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर कालबाह्य ठरलेली पदे ही मृत संवर्ग म्हणून घोषित केली जातील. त्या पदांवर आधीपासून असलेल्या कर्मचाऱ्यांचे हक्क मात्र अबाधित राहणार आहेत.

मुलाखती पूर्णपणे रद्द
गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क पदांसाठी मुलाखती पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलाखतींच्या आडून होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना चाप बसेल.
निवड प्रक्रिया केवळ लेखी परीक्षेवर आधारित असेल. यामुळे पारदर्शकता वाढणार असून, पक्षपाताच्या शक्यता कमी होतील.


MPSC Exam Interview Schedule : The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the Revised interview date for Professor, Computer Engineering, Maharashtra Engineering Teachers Service, Group-A, Advertisement No. 88/2024.

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २१ एप्रिल, २०२६ ते २३ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. तथापि प्रशासकीय कारणास्तव उपरोक्त संवर्गाच्या मुलाखती दिनांक २१ ते २३ एप्रिल, २०२६ ऐवजी दिनांक २२ एप्रिल, २०२६ ते २४ एप्रिल, २०२६ या कालावधीत घेण्यात येतील याची संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

MPSC पशुधन विकास अधिकारी मुलाखती पोस्टपोन, नवीन वेळापत्रक जाहीर!!। MPSC Exam Interview Schedule


MPSC Interview Time Table PDF

MPSC Exam Interview Schedule : The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the interview schedule for the post of Assistant Town Planner, Grade-I, Group-B Advt. No 051/2024 in the Maharashtra Town Planning and Valuation Service in the Directorate of Town Planning and Valuation.

जाहिरात क्र. ०५१/२०२४ अंतर्गत नगर नियोजन आणि मूल्यांकन संचालनालयांतर्गत महाराष्ट्र नगर नियोजन आणि मूल्यांकन सेवेमधील सहाय्यक नगर नियोजक, श्रेणी-१, गट-ब या पदासाठी पात्र उमेदवारांची यादी व  मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पात्र उमेदवारांनी निर्धारित वेळेत आवश्यक मूळ कागदपत्रे व मुलाखत पत्रासह उपस्थित राहावे, असे आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

📅 Interview Date : 07 April 2026
Reporting Time : 9:00 AM

📍 Venue: MPSC Office, Trishul Gold Field Building, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614

पात्र उमेदवारांची यादी व  मुलाखतीचे वेळापत्रक


MPSC Interview Time Table PDF

MPSC Exam Interview Schedule : The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the interview schedule for the post of Assistant Professor (Kaumarbhrutya) under Advt. No. 108/2023 in the Maharashtra Ayurvedic Service, Group-B, for Government Medical Colleges.

जाहिरात क्र. १०८/२०२३ अंतर्गत महाराष्ट्र आयुर्वेद सेवा, गट-ब मधील कौमारभृत्य विषयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकरिता असून संबंधित उमेदवारांची मुलाखत दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीचे ठिकाण एमपीएससी कार्यालय, त्रिशूल गोल्ड फील्ड इमारत, प्लॉट क्र. ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४ येथे निश्चित करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी निर्धारित वेळेत आवश्यक मूळ कागदपत्रे व मुलाखत पत्रासह उपस्थित राहावे, असे आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

📅 Interview Date : 24 February 2026
Reporting Time : 9:00 AM

📍 Venue: MPSC Office, Trishul Gold Field Building, Plot No. 34, Opp. Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur,Navi Mumbai – 400614

Candidates are advised to report at the venue on time along with all required original documents, certificates, and interview call letter. Late reporting may lead to disqualification as per commission rules. Applicants should regularly check the official MPSC website for any updates or further instructions regarding the interview process.

1 108/2023 Advt. No. 108/2023 – Assistant Professor – Kaumarbhrutya, Maharashtra Ayurvedic Service, Group – B in the Government Medical College – Interview Schedule 12-02-2026 Download
2 107/2023 Advt. No. 107/2023 – Associate Professor – ShalyaTantra, Maharashtra Ayurvedic Service, Group – B in the Government Medical College – Interview Schedule 12-02-2026 Download
3 106/2023 Advt. No. 106/2023 – Assistant Professor- ShalakyaTantra, Maharashtra Ayurvedic Service,Group-B in the Government Medical College – Interview Schedule 12-02-2026 Download

MPSC Krushi Seva Mains Exam Interview Date

जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२४ – पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण PDF मध्ये बघू शकता.

मुलाखत वेळापत्रक PDF लिंक


  • जा. क्र. १०५/२०२३ सहायक प्राध्यापक कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब – मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
  • जा. क्र. ०९९/२०२३ सहायक प्राध्यापक शरीरक्रिया, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब – मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
  • जा. क्र. ०६४/२०२५ सहायक प्राध्यापक शरीररचनाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
  • जा. क्र. ०८४/२०२३ सहयोगी प्राध्यापक शरीररचना, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ – मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
  • जा. क्र. ०८७/२०२५ सहायक प्राध्यापक, हृदयवाहिका व उरोविकृतीशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब – मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा खालील नमुद संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती/चाळणीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ०९ डिसेंबर, २०२५ ते दिनांक १८ डिसेंबर, २०२५ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

MPSC पशुधन विकास अधिकारी मुलाखती पोस्टपोन, नवीन वेळापत्रक जाहीर!!। MPSC Exam Interview Schedule